ADVERTISEMENT

गेमिंग

जगातील सर्वांत महागडा व्हिडिओ गेम ग्रँड थेफ्ट ऑटो -5 बाजारात सादर

जगातील सर्वांत महागडा व्हिडिओ गेम ग्रँड थेफ्ट ऑटो -5 मंगळवारी लाँच करण्यात आला. ब्रिटिश कंपनी रॉकस्टार गेमिंगने तो तयार केला...

व्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप सोनीचा PlayStation 4 लॉन्च

जापानमधील अग्रेसर इलेक्ट्रॉनिक कंपनी 'सोनी'ने न्यूयॉर्कमध्ये बुधवारी PlayStation 4 लॉन्च केले. सोनीचा PlayStation 4 हा व्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप असल्याची...

मोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स

कम्प्युटर गेम्सनी गेमिंग मार्केटमध्ये झालेल्या भरगच्च उलाढालीनंतर आता टॅबलेट्स आणि स्मार्ट फोनमध्ये गेमिंगची लाट सुरू झाली. सरत्या वर्षांत या गेम्सनी...

वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

इंटरनेटच्या महाजालातील वेबसाइट मल्टिडायमेन्शनल व्हाव्यात , यासाठी मोठ्या प्रमाणावर चाललेल्या प्रयत्नांना लवकरच मूर्त रूप मिळणार असून ' मल्टिडायमेन्शनल वेबसाइट्स ' ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे .२६ ऑक्टोबरला सादर होणारे इंटरनेट एक्स्प्लोअरर १० आणि विंडोज ८ यांच्या वेगवेगळ्या फीचर्सची झलक 'कॉन्टर जूर ' या गेमने नुकतीच दाखवली . केवळ स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्येच असणाऱ्या या गेमने आता वेबवर एन्ट्री केली आहे . त्यामुळे अॅप्सना वेबचे दरवाजे खुले झाले आहेत . टचस्क्रीनचा समावेश असल्याने वेबवर हा गेमखेळताना नक्कीच वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटेल .  ' कॉन्टर जूर ' हा खेळ म्हणजे वेबची मजल कुठपर्यंत जाईल याची झलक आहे , अशी प्रतिक्रिया इंटरनेट एक्स्प्लोअररचे जनरल मॅनेजर रायान गाविन यांनी दिली . अॅप्सप्रमाणेच वेबसाइट या अधिक ' यूजफूल ' असतात, हे दाखवण्यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ने ' आयफोन ' आणि ' आयपॅड ' वरील ' कॉन्टर जूर ' हा गेम ' ऑनलाइन 'स्वरुपात आणला आहे . इंटरनेट एक्स्प्लोअरर १० चे वेब ब्राउझिंग कसे असेल , याचाही अंदाज त्यांनी त्यामधूनदिला आहे .  हा गेम भौतिकशास्त्रावर आणि ' द लिटल प्रिन्स ' या कादंबरीवर आधारित आहे . व्हिडिओ गेमच्या धर्तीवर असलेल्या बटनांद्वारे त्यांनी खेळ खेळून दाखवला . जमिनीचा काही भाग वर किंवा खाली करून त्यांनी यागेममधील ' पेटिट ' या कॅरॅक्टरला त्या अडथळ्यांवरून जायला सांगितले . विंडोज ८ वर आयई १०च्या सहाय्यानेया गेमचे अतिशय उत्कृष्ट असे सादरीकरण झाले . जवळपास दोन्ही हातांच्या सर्व म्हणजे दहा बोटांनी एकाच वेळी कमांड दिली , तरी त्याची अमलबजावणी करण्याची क्षमता या प्रोग्रॅममध्ये आहे . गेमच्या तिसऱ्या लेव्हलला खेळताना प्लेयरला टच स्क्रीनवर किमान तीन बोटांचा वापर करावा लागतो . हा खेळ ऑनलाइन होणे म्हणजे स्मार्टफोन आणि टॅब्लेटमधील ' अॅप्स ' ना वेबचे दरवाजे खुले होण्यासारखेच आहे . यासंदर्भात गाविन म्हणाले ,आजचे वेब हे उद्याचे नसेल . अधिकाधिक सुंदर , आकर्षक वेबसाइट्स लोक पाहत जातील . यामध्ये टच स्क्रीनचाही समावेश असेल . वेब हे आजच्यासारखे ' वन डायमेन्शनल ' नसेल , हे लोकांना दाखवून देण्याचेच आमचे काम आहे. मात्र टच स्क्रीनचा वापर आला , तरी ब्राउझिंगसाठी माऊसवर अवलंबून राहावे लागणार आहे , अशी खंत त्यांनी व्यक्त केली .

Page 10 of 10 1 9 10

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected !!