गूगलने लॉन्च केला बोलणारा, हसणारा तसेच रडणारा शूज
विकसीत तंत्रज्ञान, व्हर्चुअल जगात क्रांती घडवून 'गुगल'ने तरुणाईला अक्षरश: वेड लावलंय. स्वप्नवत वाटणार्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा गुगलने प्रयत्न सुरु केले...
विकसीत तंत्रज्ञान, व्हर्चुअल जगात क्रांती घडवून 'गुगल'ने तरुणाईला अक्षरश: वेड लावलंय. स्वप्नवत वाटणार्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा गुगलने प्रयत्न सुरु केले...
आतापर्यंत कागदावर लिहिणे , मोबाइलमध्ये टाइप करणेकिंवा इलेक्ट्रॉनिक पेनचा वापर करून लिहिणे , कम्प्युटर टायपिंग यासारख्या गोष्टी सर्वसामान्यांना ज्ञात होत्या .पण कधी हवेत लिहिता येईल आणि ते इमेलद्वारे पाठविता येईल , असा विचार कुणी गांभीर्याने केलाच नव्हता .केवळ काहीतरी हवेत बोटं फिरवून समोरच्याला तात्पुरत्या स्वरूपात संदेश पोहोचविण्यापर्यंत हे मर्यादित होतं .पण जर्मन संशोधकांनी हवेत लिहून इमेल , मेसेज पाठविण्याचे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणलं आहे . जर्मनीतील कार्ल्सरूह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील संशोधकांनी एक विशेष प्रकारचे हँडग्लोव्हज तयार केलेआहेत . यामुळे टचस्क्रीनवर , कीबोर्ड किंवा मोबाइलवर बोटांच्या आधारे एसएमएस टाइप करणे यासारख्यागोष्टी हद्दपार होतील , असा दावा या संशोधकांनी केला आहे . ख्रिस्तोफ अम्मा व सहकाऱ्यांनी तयार केलेल्याग्लोव्हजमध्ये अॅक्सिलरोमीटर आणि गायरोस्कोप बसविण्यात आले असून , या आधारे हाताच्या हालचालीटिपल्या जातात . ही उपकरणे नंतर हवेत काढलेली अक्षरे ओळखतात व त्यांना डिजिटल टेक्स्टमध्ये कन्व्हर्टकरतात . हा डिजिटल टेक्स्ट नंतर वायरलेस माध्यमाद्वारे इमेल , एसएमएस किंवा मोबाइल अॅपमध्ये पाठवलाजातो . पॅटर्न रिक्गनिशन सॉफ्टवेअर ही सिस्टीम अक्षरे ओळखते . यामध्ये जवळपास आठ हजार शब्द आणिवाक्य लक्षात ठेवण्याची क्षमता आहे . अगदी कॅपिटल आणि स्मॉल लिखाण ओळखण्याचीही सुविधा यात आहे . सध्या यामध्ये ११ टक्के वेळा त्रुटी आढळून आल्या . मात्र , लिहिणाऱ्याची पद्धत लक्षात आल्यानंतर या त्रुटी तीन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात . विशेष म्हणजे , हे ग्लोव्हज घालून एखादी व्यक्ती लिहीत आहे किंवा इतर काहीकाम करत आहे , हे ओळखण्याची सुविधा या तंत्रज्ञानामध्ये आहे . त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता कमी होईल .या संशोधनाला ८१ हजार डॉलर्सचा गुगल फॅकल्टी रिसर्च अवॉर्ड मिळाला असून , या आधारे मोबाइल किंवा इतरमाध्यमातून हवेत टाइप करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास मदत होईल , अशी आशा संशोधकांना आहे . सध्या यावर संशोधन सुरू असून बाजारात विक्रीसाठी ते कधी खुले होईल , हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही . तरीभविष्यात जेव्हा केव्हा हे संशोधन सर्वसामान्यांच्या वापरात येईल तेव्हा , मात्र टायपिंगचा कंटाळा असणाऱ्यांचीसोय होईल . पण बोटांनी टाइप करण्यापेक्षा हवेत हात हलवून टाइप करण्याचा वेग निश्चितच कमी असणारअसल्याने टायपिंगचा वेग मात्र कमी होईल.
टेक्नॉलॉजी हा बदलता आणि सतत संधोधनाचा विषय आहे .टेक्नॉलॉजीमघील काही घडामोडी आणि संशोधन पाहिले , की हा ' जादूचाच कारखाना ' वाटावा , इतक्याघडामोडी अत्यंत वेगाने घडताना दिसत आहेत . स्मार्टफोन क्षेत्रात सध्या जी तीव्र स्पर्धा चालू आहे , त्यातून थोडेसेबाहेर डोकावून पाहिले , की सॉफ्टवेअर क्षेत्रातही नवनवे संशोधन चालू आहे आणि त्यासाठी अब्जावधी रुपयांचानिधी खर्च केला जात आहे , हे लक्षात येते . ' मायक्रोसॉफ्ट ' लवकरच ' इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' लाँच करणारआहे . या प्रॉडक्टची तयारी कंपनीत सध्या जोरात चालू आहे . ' लार्ज स्क्रीन टेक्नॉलॉजी ' प्रकारात हे संशोधन येत असून अशा प्रकारची विविध संशोधने कंपनीमध्ये चालू आहेत . ' मायक्रोसॉफ्ट ' कंपनी तयार करत असलेल्या या संवादात्मक बोर्डमुळे लोकांशी ' संवाद ' साधणे सोपे होणार आहे. हा संवाद म्हणजे संभाषण नव्हे , तर तो असेल प्रेझेंटेशनरूपी संवाद आणि त्यासाठी मदत होणार आहे स्केचेसची. युझरने काही स्केचेस काढले , तर त्यावरून पूर्ण ग्राफिक , चार्ट पूर्ण करता येईल . घरी , ऑफिसमध्ये ; तसेचजवळपास सगळ्याच ठिकाणी या ' इंटरअॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' चा वापर करता येईल . यूझरना त्यांना हव्याअसलेल्या डायग्राम्स तयार करता येतील . प्रेझेंटेशन अधिकाधिक ' इंटरअॅक्टिव्ह ' करण्यासाठी याचा उपयोगहोईल . सध्या ' मायक्रोसॉफ्ट ' चेच पॉवरपॉइंट हे सॉफ्टवेअर प्रेझेंटेशनसाठी अनेक ठिकाणी वापरले जाते . ' टेकफेस्ट ' या कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या मेळ्यामध्ये हे संशोधन सादर होईल . या ठिकाणी अनेक देशांतील शास्त्रज्ञत्यांचे संशोधन सादर करतात . ' मायक्रोसॉफ्ट ' ही आपले नवीन संशोधन सादर करणार आहे . वर्षातून एकदाहोणाऱ्या या ' टेकफेस्ट ' मध्ये व्हाइटबोर्डचे प्रोटोटाइप सादर केले जाणार आहे . या संशोधनासाठी कंपनीने इतरकंपन्यांच्या तुलनेत मोठा निधी खर्च केला आहे . अब्जावधी डॉलरची गुंतवणूक या संशोधनामागे आहे . ' टेकफेस्ट ' मध्ये या बोर्डाचे प्रत्यक्ष काम कंपनीच्या वॉशिंग्टनमधील रेडमंड येथील हेडक्वार्टरच्या बोंगशिन लीसादर करतील . एका मोठ्या टचस्क्रीनवर एक इमेज काढली जाईल . ही इमेज आणि प्री - लोडेड डेटा यांचावापर करून ग्राफिक , चार्ट , डायग्राम , नकाशे तयार करता येतील . यासाठी ' डिजिटल कॅनव्हास ' तयार केलाआहे . हा बोर्ड बनवण्याचे काम मायक्रोसॉफ्ट करत असून ' लार्ज स्क्रीन टेक्नॉलॉजी ' मध्ये कंपनी करत असलेल्याअनेक प्रयोगांपैकी हा एक आहे . मायक्रोसॉफ्टच्या या प्रयत्नाला यश आले , तर तंत्रज्ञानामधील ती एक मोठीअचिव्हमेंट ठरणार आहे .
पुण्याच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कंप्युटिंग (C-DAC)_या विभागाने परम युवा २ हा सुपरकंप्युटर तयार केला आहे. जगातल्या वेगवान कंप्युटरमध्ये...
सततचे नवे मेसेज आणि मेलमुळे जुने ई-मेल आणि टेक्स्ट मेसेज मागे पडत राहतात किंवा जागेच्या कमतरतेमुळे ते डिलिट करावे लागतात....
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech