MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

एका एसएमएसवर मोबाइल चार्ज

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 21, 2013
in News
मोबाइल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे जेथे जाईल तेथे त्याची सोबत ठरलेलीच . असेअसताना कामाच्या गडबडीत , व्यापात मोबाइल चार्ज करणं चुकून राहून गेलं आणि अचानक बॅटरी डाउनझाल्यास मात्र धांदल उडते . मग मोबाइल चार्ज करण्याची पळापळ ठरलेलीच . आता मात्र या पळापळीला एकसोपा पर्याय उपलब्ध झाला आहे . फक्त एक टेक्स्ट एसएमएस पाठवायचा की बॅटरी चार्ज्ड ! 

बुचकळयात पडलात ना ? पण हे खरंच आहे . लंडनस्थित ‘ बफेलो ग्रिड ‘ नामक कंपनीने सौर ऊर्जेवर आधारितमोबाइल चार्जिंग स्टेशनची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे . या चार्जिंग स्टेशनचा वापर करण्यासाठी फक्त एकएसएमएस पाठविण्याची आवश्यकता आहे . मात्र हा पर्याय सध्या युगांडा येथील मोबाइलधारकांना उपलब्धअसून जगभरात पोहोचायचा आहे . 

आफ्रिका आ ​ णि आशिया खंडात दिवसेंदिवस मोबाइलधारकांचे प्रमाण वाढत आहे . त्यातही शहरी भागापेक्षाग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा असल्याने तेथील मोबाइलधारकांना हे स्टेशन वरदानच ठरणार आहे . ‘बफेलो ग्रिड ‘ ने या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम आफ्रिकेतील युगांडा या देशात केल्याचे वृत्त ‘ न्यू सायंटिस्ट ‘ नेदिले आहे . चार्जिंग स्टेशनमध्ये साठविण्यात आलेली उर्जा मोबाइलच्या बॅटरीला ‘ मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग ‘या ( एमपीपीटी ) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होणार असल्याचेही ‘ न्यू सायंटिस्ट ‘ ने म्हटले आहे . मात्र ,तत्पूर्वी वर म्हटल्याप्रमाणे एक टेक्स्ट एसएमएस या ‘ ग्रिड ‘ ला पाठविणे आवश्यक आहे . हे सौर स्टेशन ६० वॉटक्षमतेचे आहे . हे स्टेशन तयार करण्यासाठी सर्व प्रकारच्या पर्यावरणाच्या निकषांचे पालन करण्यात आल्याचेहीकंपनीने म्हटले आहे . मात्र , मोबाइलचे चार्ज होणे सर्वस्वी स्टेशनच्या परिसरातील तापमान आणि सूर्याचाप्रकाश यावर अवलंबून असल्याचे ‘ बफेलो ग्रिड ‘ ने स्पष्ट केले आहे . ‘ एमपीपीटी ‘ ला जोडण्यात आलेले कम्प्युटर्सतापमान आणि त्यातील बदल यांची निरीक्षणे नोंदवणार आहेत . जेणेकरून यूजरना बॅटरी चार्ज होण्यासाठीलागणारा वेळ आणि शक्यता यांची माहिती मिळणार आहे . 

कशी चार्ज होईल बॅटरी ? 

युगांडातील मोबाइलधारकांना बॅटरी चार्ज करण्यासाठी ( एका एसएमएससाठी ) ११० शिलिंग ( भारतीयचलनात दोन रुपये ) खर्च येतो . स्टेशनला मेसेज आल्यानंतर मोबाइलमधील बॅटरी सॉकेटशी स्टेशन जोडण्यातयेते आणि नेहमीप्रमाणे बॅटरी चार्ज होण्यासाठी तयार असल्याचा संकेत दिला जातो . पण संबंधित मोबाइलचीबॅटरी चार्ज होण्यासाठी दीड तासांचा अवधी लागत असल्याचेही ‘ न्यू सायंटिस्ट ‘ ने म्हटले आहे . युगांडामधील हेस्टेशन पूर्ण चार्ज झाल्यानंतर तीन दिवस कार्यरत राहू शकते आणि दिवसाला ३० ते ५० मोबाइल चार्जिंगचीत्याची क्षमता आहे . 

ADVERTISEMENT
Tags: ChargingSMS
ShareTweetSend
Previous Post

गूगलने लॉन्‍च केला बोलणारा, हसणारा तसेच रडणारा शूज

Next Post

गुगलला ७० लाख डॉलरचा दंड

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Oppo SuperVOOC

ओप्पोने आणलं अवघ्या ९ मिनिटात फोन १००% चार्जिंग करणारं तंत्रज्ञान!

March 3, 2022
शायोमीचं अवघ्या ८ मिनिटात फोन फुल चार्ज करणारं 200W तंत्रज्ञान!

शायोमीचं अवघ्या ८ मिनिटात फोन फुल चार्ज करणारं 200W तंत्रज्ञान!

June 1, 2021
realme X50 Pro 5G

realme X50 Pro सादर : भारतातला पहिला 5G फोन!

February 24, 2020
Vivo Super Flash Charge

विवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान!

June 21, 2019
Next Post

गुगलला ७० लाख डॉलरचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!