आता हवेत लिहा

आतापर्यंत कागदावर लिहिणे , मोबाइलमध्ये टाइप करणेकिंवा इलेक्ट्रॉनिक पेनचा वापर करून लिहिणे , कम्प्युटर टायपिंग यासारख्या गोष्टी सर्वसामान्यांना ज्ञात होत्या .पण कधी हवेत लिहिता येईल आणि ते इमेलद्वारे पाठविता येईल , असा विचार कुणी गांभीर्याने केलाच नव्हता .केवळ काहीतरी हवेत बोटं फिरवून समोरच्याला तात्पुरत्या स्वरूपात संदेश पोहोचविण्यापर्यंत हे मर्यादित होतं .पण जर्मन संशोधकांनी हवेत लिहून इमेल , मेसेज पाठविण्याचे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणलं आहे . जर्मनीतील कार्ल्सरूह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील संशोधकांनी एक विशेष प्रकारचे हँडग्लोव्हज तयार केलेआहेत . यामुळे टचस्क्रीनवर , कीबोर्ड किंवा मोबाइलवर बोटांच्या आधारे एसएमएस टाइप करणे यासारख्यागोष्टी हद्दपार होतील , असा दावा या संशोधकांनी केला आहे . ख्रिस्तोफ अम्मा व सहकाऱ्यांनी तयार केलेल्याग्लोव्हजमध्ये अॅक्सिलरोमीटर आणि गायरोस्कोप बसविण्यात आले असून , या आधारे हाताच्या हालचालीटिपल्या जातात . ही उपकरणे नंतर हवेत काढलेली अक्षरे ओळखतात व त्यांना डिजिटल टेक्स्टमध्ये कन्व्हर्टकरतात . हा डिजिटल टेक्स्ट नंतर वायरलेस माध्यमाद्वारे इमेल , एसएमएस किंवा मोबाइल अॅपमध्ये पाठवलाजातो . पॅटर्न रिक्गनिशन सॉफ्टवेअर ही सिस्टीम अक्षरे ओळखते . यामध्ये जवळपास आठ हजार शब्द आणिवाक्य लक्षात ठेवण्याची क्षमता आहे . अगदी कॅपिटल आणि स्मॉल लिखाण ओळखण्याचीही सुविधा यात आहे . सध्या यामध्ये ११ टक्के वेळा त्रुटी आढळून आल्या . मात्र , लिहिणाऱ्याची पद्धत लक्षात आल्यानंतर या त्रुटी तीन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात . विशेष म्हणजे , हे ग्लोव्हज घालून एखादी व्यक्ती लिहीत आहे किंवा इतर काहीकाम करत आहे , हे ओळखण्याची सुविधा या तंत्रज्ञानामध्ये आहे .  त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता कमी होईल .या संशोधनाला ८१ हजार डॉलर्सचा गुगल फॅकल्टी रिसर्च अवॉर्ड मिळाला असून , या आधारे मोबाइल किंवा इतरमाध्यमातून हवेत टाइप करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास मदत होईल , अशी आशा संशोधकांना आहे . सध्या यावर संशोधन सुरू असून बाजारात विक्रीसाठी ते कधी खुले होईल , हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही . तरीभविष्यात जेव्हा केव्हा हे संशोधन सर्वसामान्यांच्या वापरात येईल तेव्हा , मात्र टायपिंगचा कंटाळा असणाऱ्यांचीसोय होईल . पण बोटांनी टाइप करण्यापेक्षा हवेत हात हलवून टाइप करण्याचा वेग निश्चितच कमी असणारअसल्याने टायपिंगचा वेग मात्र कमी होईल.

इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ‘ मायक्रोसॉफ्ट ‘

टेक्नॉलॉजी हा बदलता आणि सतत संधोधनाचा विषय आहे .टेक्नॉलॉजीमघील काही घडामोडी आणि संशोधन पाहिले , की हा ' जादूचाच कारखाना ' वाटावा , इतक्याघडामोडी अत्यंत वेगाने घडताना दिसत आहेत . स्मार्टफोन क्षेत्रात सध्या जी तीव्र स्पर्धा चालू आहे , त्यातून थोडेसेबाहेर डोकावून पाहिले , की सॉफ्टवेअर क्षेत्रातही नवनवे संशोधन चालू आहे आणि त्यासाठी अब्जावधी रुपयांचानिधी खर्च केला जात आहे , हे लक्षात येते . ' मायक्रोसॉफ्ट ' लवकरच ' इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' लाँच करणारआहे . या प्रॉडक्टची तयारी कंपनीत सध्या जोरात चालू आहे . ' लार्ज स्क्रीन टेक्नॉलॉजी ' प्रकारात हे संशोधन येत असून अशा प्रकारची विविध संशोधने कंपनीमध्ये चालू आहेत . ' मायक्रोसॉफ्ट ' कंपनी तयार करत असलेल्या या संवादात्मक बोर्डमुळे लोकांशी ' संवाद ' साधणे सोपे होणार आहे. हा संवाद म्हणजे संभाषण नव्हे , तर तो असेल प्रेझेंटेशनरूपी संवाद आणि त्यासाठी मदत होणार आहे स्केचेसची. युझरने काही स्केचेस काढले , तर त्यावरून पूर्ण ग्राफिक , चार्ट पूर्ण करता येईल . घरी , ऑफिसमध्ये ; तसेचजवळपास सगळ्याच ठिकाणी या ' इंटरअॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' चा वापर करता येईल . यूझरना त्यांना हव्याअसलेल्या डायग्राम्स तयार करता येतील . प्रेझेंटेशन अधिकाधिक ' इंटरअॅक्टिव्ह ' करण्यासाठी याचा उपयोगहोईल . सध्या ' मायक्रोसॉफ्ट ' चेच पॉवरपॉइंट हे सॉफ्टवेअर प्रेझेंटेशनसाठी अनेक ठिकाणी वापरले जाते . ' टेकफेस्ट ' या कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या मेळ्यामध्ये हे संशोधन सादर होईल . या ठिकाणी अनेक देशांतील शास्त्रज्ञत्यांचे संशोधन सादर करतात . ' मायक्रोसॉफ्ट ' ही आपले नवीन संशोधन सादर करणार आहे . वर्षातून एकदाहोणाऱ्या या ' टेकफेस्ट ' मध्ये व्हाइटबोर्डचे प्रोटोटाइप सादर केले जाणार आहे . या संशोधनासाठी कंपनीने इतरकंपन्यांच्या तुलनेत मोठा निधी खर्च केला आहे . अब्जावधी डॉलरची गुंतवणूक या संशोधनामागे आहे .  ' टेकफेस्ट ' मध्ये या बोर्डाचे प्रत्यक्ष काम कंपनीच्या वॉशिंग्टनमधील रेडमंड येथील हेडक्वार्टरच्या बोंगशिन लीसादर करतील . एका मोठ्या टचस्क्रीनवर एक इमेज काढली जाईल . ही इमेज आणि प्री - लोडेड डेटा यांचावापर करून ग्राफिक , चार्ट , डायग्राम , नकाशे तयार करता येतील . यासाठी ' डिजिटल कॅनव्हास ' तयार केलाआहे . हा बोर्ड बनवण्याचे काम मायक्रोसॉफ्ट करत असून ' लार्ज स्क्रीन टेक्नॉलॉजी ' मध्ये कंपनी करत असलेल्याअनेक प्रयोगांपैकी हा एक आहे . मायक्रोसॉफ्टच्या या प्रयत्नाला यश आले , तर तंत्रज्ञानामधील ती एक मोठीअचिव्हमेंट ठरणार आहे . 

सुपरकंप्युटर परम युवा २ : भारताचा सर्वात वेगवान

पुण्याच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कंप्युटिंग (C-DAC)_या विभागाने परम युवा २ हा सुपरकंप्युटर तयार केला आहे.  जगातल्या वेगवान कंप्युटरमध्ये...

प्रादेशिक भाषांतील ई-बुक

टेक्नोलॉजीच्या जमान्यात वाचन - लेखन आणि इतर अनेक बाबींमधील तंत्रेच बदलली . टेक्नोक्रांती झाल्यामुळे काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले . प्रत्यक्षात आता कुणीही कागदावर हाताने फारसे लिहित नाही . त्याची गरजच उरलेली नाही . पुस्तकांच्या बाबतीत ही छापील पुस्तकाची जागा ' ई - बुक ' घेऊ लागले आहे  दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक पुस्तक मेळाव्यातही ' ई - बुक ' ची दखल घेतली गेली . एक वेगळा विभाग 'ई - बुक ' च्या प्रकाशकांसाठी , निर्मात्यांसाठी ठेवण्यात आला होता . कम्प्युटर , इंटरनेटबरोबरच स्मार्टफोनवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध झाली . सुरुवातीला इंग्रजी भाषेपुरतेच मर्यादित असणारे हे क्षेत्र आता जवळपास सर्व भाषांमध्ये विस्तारले आहे . स्मार्टफोन , आयफोन , अन्ड्रॉइड यांसारख्या फोनवर अनेक अॅप्लिकेशन्स आहेत .त्यात आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तके डाउनलोड करण्याच्या अॅप्लिकेशनची भर पडणार आहे . टॅबलेट आणि मोबाइलसाठी ई - बुक आणि ई - मॅगझिन्स पुरवणाऱ्या ' रॉकस्टँड ' या कंपनीने दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांच्या पहिल्या संचाचे अनावरण केले आहे . यामुळे प्रादेशिक भाषांमधील ई - पुस्तकेही फोनवर वाचता येणार आहेत . विविध प्रकाशनांची इंग्रजी पुस्तके ' ई - बुक 'वर उपलब्ध आहेत . आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांची मागणी यामुळे वाढणार आहे . केवळ ' प्रिंट कॉपीं 'च्या विक्रीवर होणाऱ्या नफ्याची गणिते आता केव्हाच मागे पडली आहेत . ' अॅन्ड्रॉइड ' वर एका अॅप्लिकेशनद्वारेही पुस्तके डाउनलोड करता येतील . ' रॉक असाप रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ' चे संस्थापक संचालक प्रवीण राजपाल यांनी या अॅप्लिकेशनची माहिती दिली . ते म्हणाले , ' हिंदी , गुजराती , मराठी यांसारख्या प्रादेशिक भाषांमधील पुस्तके यामुळे सर्वांना मिळणारआहेत . एकूण १८ भाषांमध्ये आम्ही पुस्तके प्रसिद्ध करत आहोत .' यासाठी अॅन्ड्रॉइड फोनवर एक अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल . हे अॅप्लिकेशन मोफत डाउनलोड करता येईल . डाउनलोड केलेले पुस्तक कायमस्वरूपी वापरता येईल . इंटरनेट अॅक्सेस नसला , तरी डाउनलोड केलेले पुस्तक वाचता येणार आहे . नाइट रीडिंग मोड ,फॉण्ट साइजमध्ये बदल करणे , पुस्तक वाचताना नोट्स काढण्याची सोय यांसारखी वैशिष्ट्ये या अॅप्लिकेशनमध्ये आहेत . एवढेच नव्हे , तर वाचायचा आपल्याला कंटाळा आला , तर वाचून दाखवण्याची सोय या अॅपमध्ये आहे .पुस्तक डाउनलोड करण्याची किंमत ही छापील पुस्तकाच्या किमतीपेक्षा फार कमी आहे . सर्वांत स्वस्त पुस्तक हे 'चाचा चौधरी कॉमिक बुक ' असून पुस्तकाची किंमत केवळ एक रुपया आहे . कंपनीने नुकतेच देशातील पन्नास प्रकाशकांशी ' टाय - अप ' केलेले आहे . विविध भाषांमधील आणखी एक हजार पुस्तके त्यामुळे कंपनीच्या संग्रहात दाखल झाली आहेत . सध्या ' रॉकस्टँड ' कडे वीस लाख पुस्तके आहेत . आर्थिक फायद्यांबरोबरच वाचनसंस्कृती वाढीला लागावी हा या बदलत्या आणि प्रगतीशील तंत्रज्ञानाचा उद्देश आहे . हेसर्वांनी लक्षात घेऊन टेक्नॉलॉजीचा वापर वाचून समृद्ध होण्यासाठी करावा . 

Page 53 of 62 1 52 53 54 62
ADVERTISEMENT
error: Content is protected!