गॅजेट अपडेट केव्हा कराल?

मोबाइल , टॅबलेट , लॅपटॉप खराब झाला , चोरीला गेला ,हरवला तर नवीन घेणे आपसूकच येते . पण काहींना नवेकोरे गॅजेटही अपडेट करण्याची घाई झालेली असते . केवळ काही मोजक्या फिचर्सकडे आकर्षित होऊन हा निर्णय घेतला जातो . हे अपडेशन करताना बरेच पैसेही खर्च केले जातात . पण खरंच त्यांची गरज आहे का ? हा विचार केला जात नाही . अशांसाठी तुमचे गॅजेट अपडेट केव्हा करायचे याच्या टिप्स ...  सर्वसाधारणपणे कुठल्याही उपकरणात ३ - ४ वर्षाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात बदल होतात . सामान्य नागरिकांनी तेव्हाच त्यात बदल करावा , असा सल्ला गार्टनरचे विश्लेषक मायकेल गार्टेनबर्ग यांनी दिला आहे .सुरुवातीच्या काळात लॅपटॉपही लोकांना हँडी वाटत होते . आता अल्ट्रा बुक आल्यावर त्याची गरज वाटू लागली .किंवा २जी आणि ३जी मोबाइलमधील फरकही स्विकारण्यासारखा आहे . पण थोडेफार बदल केलेलं मॉडेल , कमी- जास्त फिचर्स , कलर्स यासारख्या गोष्टींसाठी बदल करणे तितकेसे परवडणारे नाही . नवीन गॅजेट घेताना एक सूत्र कायम लक्षात ठेवायला हवे की , तुम्ही त्यासाठी मोजलेला पैसा पूर्ण वसूल झाला आहे याची खात्री तुम्हाला पटायला हवी .  स्मार्टफोन : प्रवासात मेल चेक करण्यासाठी तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तीनेक वर्ष तुम्ही तो अपडेट केला नाही तरी चालेल . पण सदासर्वदा तुम्ही स्मार्टफोनसोबत राहत असाल तर मग तुम्ही २० महिन्यात फोन अपडेट करण्याची गरज आहे . काही मोबाइल कंपन्यांच्या सिमकार्डसोबतच हँडसेटही विकतात . काही महिन्यांनी पुन्हा त्यांच्याकडे नवीन मॉडेल आलेले असते . पण अशावेळी जुन्या मॉडेलची गरज खरंच संपली का , नव्या हँडसेटसाठी किंमत मोजावी एवढे अपडेट्स त्यात आहेत का हे प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे .  टॅबलेट : टॅबलेट्सचा प्रमुख सर्फिंग , वापर गेम खेळणे , इ - बुक वाचन किंवा चित्रपट पाहण्यासाठी केला जातो .त्यामुळे तो वारंवार अपग्रेड करू नये असा सल्ला तज्ञ देतात . मॅकरुमर्स साइटचे संस्थापक अरनॉल्ड किम म्हणतात, आयपॅडच्या प्रत्येक नव्या मॉडेलमध्ये फारसे काही मोठे बदल नसतात . त्यामुळे तुमचा जुना आयपॅडच चांगलाआहे . आणि कितीही म्हटलं तरी मोबाइल , टॅबलेट आणि लॅपटॉप परस्परांचं काम पूर्ण क्षमतेने करू शकत नाही .त्यामुळे प्रत्येकाची गरज ही भासतेच .  लॅपटॉप : तुमचा दिवसातील पूर्ण वेळ लॅपटॉपसमोर जात असेल तर दर ३ वर्षांनी तुम्ही नवा लॅपटॉप घेण्यास हरकत नाही . पण दिवसातील काही तास किंवा फक्त फेसबुक , ट्विटर , चॅटिंगसाठी तुम्हाला लॅपटॉपची गरज असेल तर सध्या वापरत असलेला लॅपटॉप काय वाईट आहे ? किंवा सरळ कम्प्युटर वापरा . कम्युटरचा एखादा पार्ट खराब झाला तर बदलता येतो . स्पीड कमी झाला असेल तर रॅम वाढवून घ्या . संपूर्ण लॅपटॉपच बदलण्यापेक्षा ते कधीही परवडते .  .......................................  -------महाराष्ट्र टाइम्स  

काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल ??

गेल्या काही दिवसांत गुगलच्या शेअरमध्ये १० टक्क्यांहूनअधिक घसरण झाली आहे . त्यामुळे कंपनीच्या मालमत्तेत २४ अब्ज डॉलरने घट झाली आहे . ही घट अशीच सुरू राहिली , तर येत्या काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल , अशी शक्यता विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत .  गेल्या तिमाहीमध्ये गुगलच्या महसूलात केवळ १७ टक्क्यांची वाढ दिसून आली . २००९ नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या महसूलात २० टक्क्यांपेक्षा कमी वाढ दिसून आली आहे .एकेकाळी सर्च इंजिन क्षेत्रात याहूची आघाडी होती . पण हळुहळू या स्पर्धेतून याहू बाद झाले . येत्या ५ - ८ वर्षांत गुगलवरही तीच वेळ येऊ शकते , असे आयर्न कॅपिटल या हेज फंडाचे संस्थापक एरिक जॅक्सन यांनी म्हटले आहे . युजरने जाहिरातींवर क्लिक केल्यास गुगलला महसूल मिळतो . गेल्या तीन महिन्यांत त्यात १५ टक्के घट झाली आहे . त्यामुळे भविष्यात गुगलचा नफा आणखी कमी होईल , अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . अधिकाधिक ग्राहक मोबाइल अॅप्लिकेशन्सना प्राधान्य देत असल्याने जाहिरातदारही इंटरनेटवर आधारित जाहिरातींसाठी पैसे मोजण्यास तयार नाहीत .  त्यातच जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये बायडूला प्राधान्य दिले जाते . मायक्रोसॉफ्टनेही काही महिन्यांपूर्वीच बिंगची नवीन आवृत्ती सादर केली होती . त्याचवेळी गुगलची रशियातील स्पर्धक यान्डेक्सने विकसनशील मार्केटमध्ये गुगलला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे . स्वतःकडील तज्ज्ञांचा वापर करून गुगलला आव्हान देण्याचे कंपनीने ठरविले आहे . त्यासाठी कंपनीने तुर्कस्तानपासून सुरुवात केली आहे . गेल्याच महिन्यात कंपनीने गुगलच्या क्रोमला आव्हान देण्यासाठी नवा ब्राऊझर लॉँच केला . त्यामुळे ऑपेरा तयार करणाऱ्या नॉर्वेजियन कंपनीने यान्डेक्ससोबत ब्राऊझर तंत्रज्ञान शेअर करण्यासाठी करार केला आहे . या ब्राऊझरवर कामकरण्यासाठी यान्डेक्स विविध अॅप्लिकेशन्स तयार करत असून सर्चच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल गोळा करण्याचा त्यांचा मानस आहे .  एकेकाळी सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात ऑर्कुटचेच साम्राज्य होते . पण फेसबुकच्या उदयाबरोबरच ऑर्कूटचे साम्राज्य कमी झाले . आता ते जवळपास दिसेनासे झाले आहे . फेसबुकलाही आता ट्विटर , लिंक्डइनचा धोका जाणवतोआहे . फेसबुकच्या शेअरमध्ये होत असलेली घसरण थांबलेली नाही . त्यामुळे इतके दिवस टिकून असलेली गुगलचीसद्दी जाऊन गुगलला पर्याय निर्माण होईल आणि गुगल इतिहासजमा होईल , अशी विश्लेषक वर्तवत असलेली शक्यता पूर्णपणे खोटी ठरवता येणार नाही . शेवटी हे तंत्रज्ञानाचे जग आहे . त्यात दररोज नवीन काही येणारच ... 

फेसबुकसाठीही पैसे भरा : इव्हेंटच्या प्रसिद्धीसाठी

फेसबुकसाठीही पैसे भरा : इव्हेंटच्या प्रसिद्धीसाठी

फेसबुकच्या शेअरच्या किमतीत सुरू असलेली घसरण अजूनही कायम आहे. त्यामुळे युझर्सची संख्या वाढत असली तरी कंपनीचा महसूल घसरत चालला आहे....

बखर ई-मेलची

आपल्या कार्यालयीन दिवसाची सुरुवात आणि शेवट ही ई-मेलनेच होते. म्हणता म्हणता आपल्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनलेला या ई-मेलला नुकतेच...

गुगल झाले १४ वर्षाचे!

कॉलेज प्रोजेक्ट असो किंवा एखादा पत्ता शोधणे ,नेटकनेक्शन जोडल्या जोडल्या डोक्यात पहिल्यांदा क्लिकहोणारे आणि ए टू झेड सर्व माहिती पुरवणारे गुगल १५व्या वर्षात पदार्पण करत आहे . जगातील कोणतीही माहिती हवी असल्यास तिच्या पर्यंतपोहचण्यासाठी मदत करण्यात गुगल या सर्च इंजिनचाकोणीच हात धरु शकत नाही . भारतात गुगल डॉट को डॉटइन ही सेवा मराठी , हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्धआहे . त्यामुळेच प्रोजेक्टची कामे करताना तरुण पीढीने 'गुगल तर उगल ' अशी एक म्हणच तयार केली आहे . विशेषम्हणजे इंटरनेटकरांच्या या विश्वासाला गुगलने नेहमीच सार्थकेले आहे . गुगलने अॅनिमेटेड होमपेज तयार केले. या पेजवर गेल्यागेल्या गुगलच्या नावाऐवजी एकामोठ्या आयताकृती चॉकलेट केकवर असणा - या १४ मेणबत्त्या  काही क्षणातच केक गुगल लोगोच्या रंगांचा होत . मेणबत्या टॅलीच्या भाषेत १४ आकडा तयार करतात . गुगल कंपनी ७ सप्टेंबर १९९८ रोजी स्थापन झाली . स्थापनेपासून २००४ पर्यंत कंपनीने सात सप्टेंबर याचदिवशी आपला वाढदिवस केला होता . मात्र २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हाच आपला वाढदिवस असल्याचेजाहीर केले . सर्वात जास्त पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्याची तारीख आणि वाढदिवस एकाच दिवशी असावाया हट्टापायी गुगलने ही सर्व उठाठेव केली . गुगलच्या जन्माची गोष्ट कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्ड विद्यापीठात शिकणा - या लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी सात सप्टेंबर १९९८ रोजीगुगल कंपनीची स्थापना केली . या कंपनीने इंटरनेटकडे पहाण्याचा जगाचा दृष्टीकोनच बदलला .

Page 60 of 63 1 59 60 61 63
ADVERTISEMENT
error: Content is protected!