MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

नवे सुधारित फेसबुक कसे वापराल?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 22, 2012
in HowTo, News
ADVERTISEMENT

facebook how to use
सोशल नेटवर्किंग म्हणजे फेसबुक असं सध्या समीकरण झालेलं आहे. २००४ साली अमेरिकेतील एका कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी सुरू झालेल्या या संकेतस्थळाचं जाळं आता जगभर पसरलेलं आहे. विशेषत: गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सोशल नेटवर्किंगचं फॅड मोठय़ा प्रमाणात जोर धरू लागलं आणि त्यामध्ये अग्रस्थानी होते फेसबुक. फक्त तरुणांनाच नव्हे तर आता प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींनाही फेसबुक म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं असतं आणि त्यावर अ‍ॅक्टिव्ह व्हायचं असतं. म्हणूनच की काय गेल्याच आठवडय़ात फेसबुकने एक कोटी युजर्सचा आकडा पार केला. फेसबुकही आपल्यावर वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून ते कसं युजर फ्रेंडली करता येईल याच्या प्रयत्नात आहे. विशेषत: काही महिन्यांपूर्वी आलेल्या फेसबुक टाइमलाइननंतर अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी त्याच अनेकांना खूपच किचकट वाटू लागल्या आहेत. म्हणूनच ‘टेकइट’च्या वाचकांसाठी नव्याने दाखल झालेल्या वैशिष्टय़ांची आम्ही थोडक्यात ओळख करून देत आहोत.
मोबाइलसाठी फेसबुक टाइमलाइन
फेसबुक टाइमलाइन आता सर्वपरिचित झालं असलं तरी मोबाईलसाठी बनवण्यात आलेल्या फेसबुक टाइमलाइनवर मोठे लाइक बटण देण्यात आले आहे, जेणेकरून स्मार्टफोनच्या कुठल्याही आकाराच्या स्क्रीनवरही तुम्हाला ‘पोस्ट’ आरामात ‘लाइक’ करता येईल. फोटो गॅलरीमध्ये जाण्यासाठी लहान नेव्हिगेशन आयकॉन्स देण्यात आले आहेत. तसेच इव्हेन्ट्स आणि तुमचे फॅन्स किती आहेत यांचाही समावेश करण्यात आला आहे. स्क्रीनवर डाव्या वाजूला वर सर्च, फेव्हरेट्स, पेजेस, ग्रुप्स, अ‍ॅप्स, फ्रेन्ड्स, इंटरेस्ट असे वर्गीकरण करण्यात आले असल्यामुळे मोबाइलवर फेसबुक वापरणे अगदी सोप्पे झाले आहे.
जाहिरात तुमची प्रमोशन आमचे
फेसबुकने जाहिरातींवर मोठय़ा प्रमाणात लक्ष केंद्रित केलं असून विशेषत: जर तुमचं एखादं पेज असेल तर ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक तुम्हाला मदत करतं. तुम्ही टाकलेली पोस्ट किती लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि त्याचा तुमच्या पेजवर कसा परिणाम होत आहे याची आकडेवारी तुम्हाला ताबडतोब मिळते. तसेच तुमच्या पेजच्या उजव्या बाजूला एक उभ्या पट्टीमध्ये जाहिरातींसाठी विशेष जागा देण्यात आली असून तिचे प्रमोशन करण्यासाठी फेसबुक तुम्हाला मदत करतं. त्याचप्रमाणे प्रत्येक पोस्टला प्रमोट हा पर्याय देण्यात आला असून तुमच्या बजेटनुसार तुम्ही वेगवेगळे प्लॅन्स घेऊन तुमची पोस्ट प्रमोट करू शकता.
तुमच्या पोस्टला लोकेशन अ‍ॅड करा
सोशल नेटवर्किंगमुळे जग जवळ आले आहे असं म्हणतात. मग ते कसं जवळ आलं आहे त्याच्या अनेक व्याख्या आहेत. फेसबुकच्या नवीन लोकशन अ‍ॅड या पर्यायामुळे तुम्ही कोणत्या वेळेस, कुठे आहात ते ताबडतोब तुमच्या मित्र-मत्रिणींना कळू शकते. एखादा फोटो पोस्ट करताना तुम्ही त्याबरोबर ती जागा आणि वेळेचाही त्यामध्ये अंतर्भाव करू शकता, जेणेकरून टाइमलाइनध्ये मागे वळून पाहताना तुमच्यासमोर तो प्रसंग चटकन डोळयांसमोर येईल. जर तुम्ही भटके असाल तर तुमच्या ट्रॅव्हल मॅपवर ते मार्क होत राहील. तसेच व्यावसायिकदृष्टय़ा पाहिल्यास, तुम्ही कोणत्या प्रदर्शनाला, कार्यक्रमाला, मीटिंगला गेले आहात हे जागा आणि वेळेसह समोरच्या व्यक्तीस कळण्यास मदत होणार आहे.
डुप्लिकेट फेसबुक पेजबद्दल कळवा
जर तुम्ही कोणत्याही फेसबुक पेजचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर असाल तर तुम्ही डुप्लिकेट पान बंद करण्याची विनंती करू शकता. रिपोर्ट डुप्लिकेट बटण हे तुमच्या सेटिंगमधील डाव्या बाजूच्या कॉलममध्ये आहे. हे पान डुप्लिकेट आहे असे सिद्ध झाले तर ते त्याला खालच्या क्रमावर ढकलून त्यांची िलक तुमच्या मुख्य पानाला देता येते.
युजर्स आता ताबडतोब गेम्स खेळू शकतात
गेम खेळण्यासाठी आता तुम्ही कोणत्याही परवानगी किंवा विनंती प्रक्रियेतून न जाता लागलीच गेम खेळू शकता. हे वैशिष्टय़ िझगा, किझिए आणि इलेक्ट्रॉनिक आर्टसारख्या मोजक्याच खेळांच्या संकेतस्थळांवरील खेळांना लागू असले तरी त्याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे, त्यामुळे इतर कंपन्यांच्या लोकप्रिय खेळांनाही ते लवरच लागू हेण्याची शक्यता आहे.
तुमच्या ग्रुपला फोटोज पाठवा
जर तुम्ही नुकतेच तुमच्या मित्र-मत्रिणींसोबत सहलीला, पार्टीला जाऊन आला असाल तर तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातील सर्व फोटो एकाच वेळेस सर्वाना पाठवू शकता. तुम्हाला फक्त फोटो हा पर्याय निवडायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला ते फोटो कुणाबरोबर शेअर करायचे आहेत तो पर्याय देण्यात आला आहे. फेसबुक फोटो गॅलरीलाही वेगळा लूक देण्यात आला आहे. फोटोजमध्ये गेल्यावर तुम्हाला आता फोटोज आणि अल्बम असे दोन पर्याय दिसतात, त्यामुळे वॉल फोटो आणि अल्बम आपोआप वेगळे होतात. शिवाय अल्बम पाहण्यासाठी संपूर्ण अल्बम उघडण्याची गरज नाही तुम्ही फक्त अल्बम कव्हरवर माऊस नेलात की अल्बमधील सर्व फोटो एकएक करून दिसायला लागतात.
नोटिफिकेशन्स
नको आहेत पण इलाज नाही असेही अनेकजण आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये असतात, त्यांच्या पांचट आणि कंटाळवाण्या पोस्टमुळे उगाचच वॉल भरत असते आणि नोटिफिकेशन्स येत राहतात. आता त्यांच्यापासून सुटका झाली आहे. येथे तुम्हाला फक्त हव्या असणाऱ्या व्यक्तींचे आणि पेजेसचेच नोटिफिकेशन्स मिळण्याची सोय करून देण्यात आली आहे. तुम्हाला फक्त त्यांच्या पेजवर जाऊन आवश्यक तो पर्याय निवडायचा आहे.
डॉक्युमेन्ट्स आणि स्प्रेडशीट्स शेअर करा
एखादं डॉक्युमेंट पाठवण्यासाठी आता पुन्हा ईमेल उघडायची आवश्यकता नाही. तुमच्या क्लासनोट्स, गेम्स शेडय़ुल किंवा महत्त्वाच्या फाइल्स लागलीच शेअर करू शकता. तुमच्या मेसेज कंपोजरमध्ये अपलोड फाइल हा पर्याय निवडून तुम्ही कोणती फाइल पाठवायची आहे ती तुमच्या कॉम्प्युटर आणि मोबाइलमधून निवडून पाठवू शकता.
जुन्या चर्चा शोधा
जर तुम्ही एखादी महत्त्वाची चर्चा केली असेल आणि ती तुम्हाला पुन्हा वाचायची असेल तर ती शोधू शकता. तुम्हाला मेसेजमध्ये वरच्या बाजूस असलेल्या सर्च आयकॉनमध्ये जायचं आहे, तुम्हाला काय शोधायचे आहे ते तुमच्या टूलबारमध्ये टाकायचे आहे, त्यानंतर काही क्षणातच सदर चर्चा तुमच्यासमोर प्रकट होईल.
ग्रुप चॅट
आता नवीन फेसबुकमध्ये तुम्ही ग्रुप चॅट करू शकता, तुमच्या कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपला कॅमेरा असेल तर व्हिडीओ चॅटही करू शकता. नव्या मेसेंजरची अथवा स्काइपची आवश्यकता नाही.
मेनू बारमध्ये व्हॉइसचा समावेश
जर तुम्ही तुमच्या फेसबुक पेजचे अ‍ॅडमिन असाल आणि तुम्ही चुकून काही पोस्ट तुमच्या पेजची नाही तर तुमची म्हणून पोस्ट केलात तर व्हॉइस टॅब तुम्हाला त्याची आठवण करून देईल. तुम्ही व्हॉइसवर क्लिक केलात तर तो तुम्हाला सांगेल, तुम्ही स्वत: नव्हे तर ते पेज म्हणून पोस्ट करताय, कमेंट करताय आणि लाइक करताय. हा तुम्हाला गोंधळलेल्या स्थितीतून बाहेर काढायला मदत करेल.
Loksatta
Tags: Facebook
ShareTweetSend
Previous Post

स्टायलिश सोनी वायो इ१४ए

Next Post

आता विकिपिडियावरही व्हिडिओ अपलोड करा

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Faceeook Reels Earn Money

Reels आता फेसबुकवरही उपलब्ध : पैसेसुद्धा कमावता येणार!

February 23, 2022
Facebook Users Dropped

फेसबुकचे यूजर्स प्रथमच कमी झाले : मेटाचे शेयर २०% कोसळले!

February 3, 2022
Facebook Meta

फेसबुकचं नवं नाव मेटा (Meta) : मार्क झकरबर्गकडून नवी कंपनी जाहीर!

October 29, 2021
Next Post

आता विकिपिडियावरही व्हिडिओ अपलोड करा

Comments 1

  1. Anonymous says:
    10 years ago

    तुमच्या ब्लॉगसाठी अधिक वाचक मिळवा, ब्लॉगची जाहिरात करा, तेही अगदी मोफत
    http://MarathiForums.Wapka.Mobi या मराठी सोशल नेटवर्कवर खाते उघडा आणि तिथल्या सदस्यांना आपल्या ब्लॉगबद्दल सांगा. तसेच नव्या ब्लॉगपोस्टची लिन्क शेयर करा.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!