MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

पोर्टेबल ड्राइव्ह :: पेन ड्राइव्ह

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 5, 2012
in News



ऑपरेटिंग सिस्टीम 
उबूंटू आणि फेडेरासह लिनक्सच्या बहुतांश ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे पेन ड्राइव्हवर चालू शकतात . अगदी तुमच्या हार्डडिस्कवर इन्स्टॉल केल्याप्रमाणे ही सिस्टीम तुम्हाला वापरता येते . त्यात वेब ब्राऊझिंग , वर्ड – एक्सेल फाइल्स एडिट करता येतात पण स्पीड फक्त थोडा कमी असतो . याचा एक फायदा म्हणजे , तुम्ही कम्प्युटर खिशात घेऊन फिरू शकता . सध्या विंडोज आणि मॅकचा असा वापर करता येत नाही पण मायक्रोसॉफ्ट या दृष्टीने विचार करत आहे . 

पोर्टेबल प्रोग्रॅम्स 
पोर्टेबल ऑपरेटिंग सिस्टीमप्रमाणे काही पोर्टेबल सॉफ्टवेअर असतात . ती थेट पेन ड्राइव्हवर वापरता येतात .फायरफॉक्स , क्रोम हे ब्राऊझर , वर्डवेब हे डिक्शनरी सॉफ्टवेअर , इरफान व्ह्यू हे इमेज एडिटींग सॉफ्टवेअरयासारखी अनेक सॉफ्टवेअर पोर्टेबल स्वरूपात पेनड्राइव्हमधून वापरता येतात . त्यामुळे अॅडमिनिस्ट्रेटरची परवानगी नसतानाही तुम्ही गरजेच्यावेळी हे सॉफ्टवेअर वापरू शकता . www.portableapps.com, www.portablefreeware.com, 

www.pendriveapps.com या वेबसाइटवर तुम्हाला पोर्टेबल प्रोग्रॅम मिळू शकतील . 


फक्त डिलीट करू नका 

विंडोजमध्ये तुम्ही डिलीट केलेली फाइल रिसायलकल बिन मध्ये जाते . त्यामुळे चुकून डिलीट झालेली फाइल पुन्हा मिळवण्याची संधी तुमच्यासमोर कायम असते . पण पेन ड्राइव्हमध्ये ही सोय नाही . पण आयबिन हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरत असाल तर तो प्रॉब्लेमही सुटला . आयबिन हे पोर्टेबल रिसायल बिन असून ते डाऊनलोड करून पेन ड्राइव्हमध्ये एक्स्ट्रॅक्ट केल्यास पुढील वेळेपासून ते आपोआप काम सुरू करते . एखादी फाइल तुम्ही डिलीट करण्याचा प्रयत्न केल्यास ती आयबिनमध्ये ट्रान्सफर करायची का असा प्रश्न हे सॉफ्टवेअर विचारते ,परवानगी दिल्यावर तुमची फाइल थेट आयबिनमध्ये जाते . सध्याच्या काळात पेन ड्राइव्हचे आकार वाढत असल्याने तुम्ही आयबिन वापरू शकता आणि जागा कमी पडल्यास त्यातील फाइल्स डिलीट करू शकता . 

व्हायरसपासून सुरक्षा 
एखाद्या कम्प्युटरमधील व्हायरस तुमच्या पेन ड्राइव्हमध्ये आणि नंतर घरच्या कम्प्युटरमध्ये पोहोचू शकतो .त्यामुळे तुमच्या पेन ड्राइव्हला केवळ रिड ओन्ली मोडमध्ये ठेवणे योग्य . युएसबी राइट प्रोटेक्टर हे सॉफ्टवेअर 

www.gaijin.at/dlusbwp.-php याठिकाणाहून डाऊनलोड करून तुम्ही वापरू शकता . पेन ड्राइव्हमध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यावर ते ऑन किंवा ऑफ करून तुम्ही पेन ड्राइव्हचा रिड ओन्डी मोड ऑन / ऑफ करू शकता . पण हे सॉफ्टवेअर ऑन / ऑफ केल्यावर पेन ड्राइव्ह बाहेर काढून पुन्हा जोडावा लागतो . तेव्हाच सॉफ्टवेअर काम करते . 

पासवर्ड सुरक्षा 
तुमच्या पेनड्राइव्हमधील काही डेटा इतरांनी वापरू नये अशी तुमची इच्छा असेल तर Rohos Mini Drive Portable (www.rohos.com/products/rohos-minidrive ) हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही तुमच्या पेनड्राइव्हमध्ये छुपे हिस्से तयार करू शकतात . या पार्टिशनला पासवर्ड सुरक्षाही देता येते . संपूर्ण पेन ड्राइव्हला पासवर्ड प्रोटेक्शन द्यायचे असेल तर 
Cryptainer LE (www.cypherix.com/cryptainer_le_download_center.htm). या सॉफ्टवेअरचा वापर करता येईल . 
अॅटोमॅटिक बॅकअप 

USB Flash Copy (www.usbflashcopy.com) हे सॉफ्टवेअर तुम्हाला पेन ड्राइव्हचा अॅटोमॅटिक बॅक अप घेण्याची सुविधा देते . यात तुम्ही फाइलचा प्रकार वगैरेही ठरवून फक्त त्याचा बॅकअप घेऊ शकता . यामध्ये तुम्हाला प्रोफाइल तयार करण्याचीही सुविधा आहे . त्यामुळे घरच्यासाठी आणि ऑफिससाठी स्वतंत्र प्रोफाइल तयार करून ठेवू शकता . 

ADVERTISEMENT
Tags: Flash DrivesPendriveUSB
ShareTweetSend
Previous Post

धोका ‘फेक मेसेजिंग अॅप्स’चा

Next Post

संगणकाचा बादशहा मायकल डेल

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Type C India

भारतातसुद्धा सर्व फोन्ससोबत USB Type C पोर्ट देणं बंधनकारक होणार!

December 28, 2022
USB4 जाहीर : 40Gbps ट्रान्सफर स्पीड मिळेल!

USB4 जाहीर : 40Gbps ट्रान्सफर स्पीड मिळेल!

March 6, 2019
आता स्मार्टफोनसाठीही पेनड्राइव्ह!

आता स्मार्टफोनसाठीही पेनड्राइव्ह!

January 3, 2014
हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’

हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’

January 18, 2013
Next Post

संगणकाचा बादशहा मायकल डेल

Comments 2

  1. Anonymous says:
    8 years ago

    Hey! I just wanted to ask if you ever have any problems with hackers?
    My last blg (wordpress) was hacked and I ended up losing many
    months of hard work due tto no data backup. Do you have any methods to prevent hackers?

    Reply
    • Admin says:
      8 years ago

      Use Two Step Verification on Every online account you have

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech