टेलिकॉम

4जी पेक्षाही वेगवान; अवघ्‍या 40 सेकंदात डाऊनलोड होणार चित्रपट

दक्षिण कोरियाची सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर 'एसके टेलिकॉम' कंपनी या आठवडयात जगातील सर्वात वेगवान वायरलेस नेटवर्क लॉंच करणार आहे. एलटीई...

टाटा डोकोमोच्या इंटरनेट दरात मोठी कपात एअरटेलने फोर-जी प्लॅन केला स्वस्त

टाटा डोकोमो या कंपनीने इंटरनेट दरात सुमारे ९० टक्क्यांनी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ जु्लैपासून प्रति एककिलोबाईट...

इंटरनेटची पाचवी पिढी – 5G Network invented by Samsung Korea

माणसाच्या इंटरनेटसोबतच्या नात्याची वीण दिवसेंदिवस घट्ट होऊ लागली आहे . इंटरनेट सुरू झाल्यापासूनचा प्रवास सर्वांनाच परिचित आहे . कम्प्युटरवर केबलच्या माध्यमातून चालणाऱ्या इंटरनेटने केव्हाच कात टाकली आणि वायरलेस कम्युनिकेशनने जोर पकडला . त्यातही आता मोठ्याप्रमाणावर प्रगती झाली आहे .  ' वाय - फाय ' मुळे इंटरनेट वेगवेगळ्या संवादसाधनांवर वापरता येऊलागले . लॅपटॉप , हँडसेटवरही इंटरनेट सुरू झाले आणि मग स्पर्धा सुरू झाली , ती इंटरनेटच्यावेगाची . या वेगाच्या सूत्राला अनुसरून मग पहिल्या पिढीचे ( फर्स्ट जनरेशन ), दुसऱ्या पिढीचे (सेकंड जनरेशन ) तंत्रज्ञान बाजारात आले . पहिल्यापेक्षा दुसरे अधिक फास्ट असे हे सूत्र . वेग वाढवण्यातही मोठी स्पर्धा चालू असून अधिकाधिक वेग कसा वाढवता येईल , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .  ' सॅमसंग ' ने याबाबतीत मोठी झेप घेतली असून अतिजलद पाचव्या पिढीच्या ( ५जी ) वायरलेस तंत्रज्ञानाची चाचणी घेतली आहे . ' सॅमसंग ' च्या नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट आणि मोबाइल क्षेत्रात क्रांती घडणार आहे . यामुळे एखादा मोठा चित्रपटसुद्धा एका सेकंदात डाऊनलोड करता येईल . दोन किमीच्या अंतरामध्ये सेकंदाला एक गिगाबाइट एवढा डेटा डाउनलोड करण्याची चाचणी यशस्वी झाल्याचे दक्षिण कोरियाच्या या कंपनीने सांगितले आहे . हे तंत्रज्ञान त्वरित बाजारात उपलब्ध होणार नाही . त्यासाठी आणखी किमान पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागेल . २०२० पर्यंत हे तंत्रज्ञान बाजारात येईल . तोपर्यंत कंपनी ' ट्रान्समीटिंग स्पीड ' उपलब्ध करणार आहे . सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या चौथ्या पिढीच्या ( ४जी ) तंत्रज्ञानापेक्षा याचा वेग शंभर पटीने अधिक असेल , असा दावा कंपनीने केला आहे . अनेक ' हेवी फाइल्स ' फारसा त्रास न घेता मूव्ह करता येणार आहे . या तंत्रज्ञानामुळे ३डी चित्रपट , गेम्स , अल्ट्रा हाय डेफिनिशन कंटेन्ट ( यूएचडी ) या सेवांचा वापर यूजर विनासायास करू शकतील . मिलिमीटर वेव्हबँडचा वापर करून घेण्याचे तंत्रज्ञानही कंपनीकडे आहे . त्याचा फायदा मोबाइल इंडस्ट्रीला होईल . ' सॅमसंग ' तर्फे घेण्यात आलेल्या चाचणीत ' ६४अँटेना एलिमेंट ' चा वापर करण्यात आला . यामुळे लांब अंतरावरून येणाऱ्या ' डेटा ' ला अडथळा झाला नाही . जगामध्ये सर्वाधिक वायर नेटवर्क असलेल्या दक्षिण कोरियासारख्या देशात आत्ताच ४जीतंत्रज्ञान वापरणारे दोन कोटी लोक आहेत . ज्या मानवी मेंदूतून पाचव्या पिढीपर्यंतच्या ( ५जी ) तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे आणि इतर अनेक क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर मानव आकाशाला गवसणी घालत आहे , त्या या मेंदूच्या ' स्पीड ' चाउपयोग प्रत्यक्षात करण्यात आला , तर ती जागतिक क्रांती ठरेल . अर्थात त्यासाठी आणखी कितीपिढ्यांचे ( ४जी , ५जी , ६जी , ७जी ...) तंत्रज्ञान बाजारात येईल , कोण जाणे ! 

मोबाइलवर मिळेल हवे तेवढेच इंटरनेट

मोबाइलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे . मात्र , कनेक्ट होताना निर्माण होणाऱ्या अडचणी , वेग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिन्याच्या शेवटी येणारे अव्वाच्या सव्वा बिल , यामुळे मोबाइलवर इंटरनेट वापरताना बहुतेकांच्या पोटात गोळा येतोच . मात्र ,त्यावरही आता नामी उपाय पुढे आला असून , मोबाइलवरून इंटरनेट वापरताना पूर्ण कालावधीसाठी कनेक्शन असण्याची गरज उरणार नाही . एखादी माहिती हवी असल्यास , एका विशिष्ट नंबरवर एसएमएस पाठवा आणि हवी ती माहिती मिळवा , अशी कल्पना पुढे आली आहे . यातून विकीपिडिया, गुगल यांसारख्या वेबसाइटवरून मोबाइलवर माहिती मिळणे , शक्य होणार आहे . टेक्स्टवेब , गूगल आणि इनोजटेक्नॉलॉजीज् या कंपन्यांनी अशा प्रकारची सेवाही सुरू केली आहे .  समजा , आपल्याला टेक्स्ट वेबवरून एखादी माहिती हवी असल्यास , ९२४३३४२००० या क्रमांकावर एसएमएस पाठविणे गरजेचे आहे . दिवाळीविषयी माहिती हवी असल्यास @Wikipedia Diwali असा एसएमएस या क्रमांकावर पाठविता येईल . क्रिकेटविषयी माहिती हवी असल्यास @cricket असा एसएमएस पाठविल्यानंतर ,त्यावेळी सुरू असणा - या सर्व मॅचेसची माहिती सहज मिळू शकेल . अगदी एखाद्या शहरातील दोन ठिकाणांमध्ये जाण्यासाठी ऑटोरिक्षाने किती भाडे होईल , याचा अंदाजही या सेवेतून मिळू शकेल . तर गुगलच्या सेवेवरून तूर्तछोट्या शंकांची उत्तरे मिळत आहेत . कंपनीच्या ९७७३३००००० या क्रमांकावर शंका पाठविल्यास त्याचे उत्तर तुम्हाला येईल . यामध्ये डॉलरचा विनिमय दर , हवामान यासारख्या माहितीचा समावेश आहे . जर इनोजटेक्नॉलॉजीज्वरून माहिती हवी असेल तर अपेक्षित माहितीचा किवर्ड ५५४४४ या नंबरवर पाठवावा लागेल .  भारतामध्ये मोबाइलची संख्या वाढत आहे , या क्षेत्राच्या मार्केटनेही उड्डाणे घेतली आहेत . मात्र , इंटरनेटवापरातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे . बहुसंख्य हँडसेट हे फक्त कॉल आणि एसएमएस या वापरांसाठीच योग्य आहेत . स्मार्टफोनची संख्या वाढत असली , तरी इंटरनेटसाठीचे योग्य डाटाप्लॅन मिळत नाहीत . तसेच , या दोन्ही अडचणींचे समाधान झाल्यानंतरही , बँडविड्थ आणि महागडे दरयांमुळे या ग्राहकांचे समाधान झालेले नाही . या तीन मुख्य अडचणींमुळे मोबाइलचे इंटरनेट क्षेत्र या कंपन्यांना खुणावत होती आणि त्याचा फायदा उठविण्यासाठी या कंपन्या सज्ज झाल्या आहेत . 

Page 10 of 10 1 9 10
ADVERTISEMENT
error: Content is protected!