नवे लेख (Latest Posts)

काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल ??

गेल्या काही दिवसांत गुगलच्या शेअरमध्ये १० टक्क्यांहूनअधिक घसरण झाली आहे . त्यामुळे कंपनीच्या मालमत्तेत २४ अब्ज डॉलरने घट झाली आहे . ही घट अशीच सुरू राहिली , तर येत्या काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल , अशी शक्यता विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत .  गेल्या तिमाहीमध्ये गुगलच्या महसूलात केवळ १७ टक्क्यांची वाढ दिसून आली . २००९ नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या महसूलात २० टक्क्यांपेक्षा कमी वाढ दिसून आली आहे .एकेकाळी सर्च इंजिन क्षेत्रात याहूची आघाडी होती . पण हळुहळू या स्पर्धेतून याहू बाद झाले . येत्या ५ - ८ वर्षांत गुगलवरही तीच वेळ येऊ शकते , असे आयर्न कॅपिटल या हेज फंडाचे संस्थापक एरिक जॅक्सन यांनी म्हटले आहे . युजरने जाहिरातींवर क्लिक केल्यास गुगलला महसूल मिळतो . गेल्या तीन महिन्यांत त्यात १५ टक्के घट झाली आहे . त्यामुळे भविष्यात गुगलचा नफा आणखी कमी होईल , अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . अधिकाधिक ग्राहक मोबाइल अॅप्लिकेशन्सना प्राधान्य देत असल्याने जाहिरातदारही इंटरनेटवर आधारित जाहिरातींसाठी पैसे मोजण्यास तयार नाहीत .  त्यातच जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये बायडूला प्राधान्य दिले जाते . मायक्रोसॉफ्टनेही काही महिन्यांपूर्वीच बिंगची नवीन आवृत्ती सादर केली होती . त्याचवेळी गुगलची रशियातील स्पर्धक यान्डेक्सने विकसनशील मार्केटमध्ये गुगलला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे . स्वतःकडील तज्ज्ञांचा वापर करून गुगलला आव्हान देण्याचे कंपनीने ठरविले आहे . त्यासाठी कंपनीने तुर्कस्तानपासून सुरुवात केली आहे . गेल्याच महिन्यात कंपनीने गुगलच्या क्रोमला आव्हान देण्यासाठी नवा ब्राऊझर लॉँच केला . त्यामुळे ऑपेरा तयार करणाऱ्या नॉर्वेजियन कंपनीने यान्डेक्ससोबत ब्राऊझर तंत्रज्ञान शेअर करण्यासाठी करार केला आहे . या ब्राऊझरवर कामकरण्यासाठी यान्डेक्स विविध अॅप्लिकेशन्स तयार करत असून सर्चच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल गोळा करण्याचा त्यांचा मानस आहे .  एकेकाळी सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात ऑर्कुटचेच साम्राज्य होते . पण फेसबुकच्या उदयाबरोबरच ऑर्कूटचे साम्राज्य कमी झाले . आता ते जवळपास दिसेनासे झाले आहे . फेसबुकलाही आता ट्विटर , लिंक्डइनचा धोका जाणवतोआहे . फेसबुकच्या शेअरमध्ये होत असलेली घसरण थांबलेली नाही . त्यामुळे इतके दिवस टिकून असलेली गुगलचीसद्दी जाऊन गुगलला पर्याय निर्माण होईल आणि गुगल इतिहासजमा होईल , अशी विश्लेषक वर्तवत असलेली शक्यता पूर्णपणे खोटी ठरवता येणार नाही . शेवटी हे तंत्रज्ञानाचे जग आहे . त्यात दररोज नवीन काही येणारच ... 

गॅजेट अपडेट केव्हा कराल?

मोबाइल , टॅबलेट , लॅपटॉप खराब झाला , चोरीला गेला ,हरवला तर नवीन घेणे आपसूकच येते . पण काहींना नवेकोरे गॅजेटही अपडेट करण्याची घाई झालेली असते . केवळ काही मोजक्या फिचर्सकडे आकर्षित होऊन हा निर्णय घेतला जातो . हे अपडेशन करताना बरेच पैसेही खर्च केले जातात . पण खरंच त्यांची गरज आहे का ? हा विचार केला जात नाही . अशांसाठी तुमचे गॅजेट अपडेट केव्हा करायचे याच्या टिप्स ...  सर्वसाधारणपणे कुठल्याही उपकरणात ३ - ४ वर्षाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात बदल होतात . सामान्य नागरिकांनी तेव्हाच त्यात बदल करावा , असा सल्ला गार्टनरचे विश्लेषक मायकेल गार्टेनबर्ग यांनी दिला आहे .सुरुवातीच्या काळात लॅपटॉपही लोकांना हँडी वाटत होते . आता अल्ट्रा बुक आल्यावर त्याची गरज वाटू लागली .किंवा २जी आणि ३जी मोबाइलमधील फरकही स्विकारण्यासारखा आहे . पण थोडेफार बदल केलेलं मॉडेल , कमी- जास्त फिचर्स , कलर्स यासारख्या गोष्टींसाठी बदल करणे तितकेसे परवडणारे नाही . नवीन गॅजेट घेताना एक सूत्र कायम लक्षात ठेवायला हवे की , तुम्ही त्यासाठी मोजलेला पैसा पूर्ण वसूल झाला आहे याची खात्री तुम्हाला पटायला हवी .  स्मार्टफोन : प्रवासात मेल चेक करण्यासाठी तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तीनेक वर्ष तुम्ही तो अपडेट केला नाही तरी चालेल . पण सदासर्वदा तुम्ही स्मार्टफोनसोबत राहत असाल तर मग तुम्ही २० महिन्यात फोन अपडेट करण्याची गरज आहे . काही मोबाइल कंपन्यांच्या सिमकार्डसोबतच हँडसेटही विकतात . काही महिन्यांनी पुन्हा त्यांच्याकडे नवीन मॉडेल आलेले असते . पण अशावेळी जुन्या मॉडेलची गरज खरंच संपली का , नव्या हँडसेटसाठी किंमत मोजावी एवढे अपडेट्स त्यात आहेत का हे प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे .  टॅबलेट : टॅबलेट्सचा प्रमुख सर्फिंग , वापर गेम खेळणे , इ - बुक वाचन किंवा चित्रपट पाहण्यासाठी केला जातो .त्यामुळे तो वारंवार अपग्रेड करू नये असा सल्ला तज्ञ देतात . मॅकरुमर्स साइटचे संस्थापक अरनॉल्ड किम म्हणतात, आयपॅडच्या प्रत्येक नव्या मॉडेलमध्ये फारसे काही मोठे बदल नसतात . त्यामुळे तुमचा जुना आयपॅडच चांगलाआहे . आणि कितीही म्हटलं तरी मोबाइल , टॅबलेट आणि लॅपटॉप परस्परांचं काम पूर्ण क्षमतेने करू शकत नाही .त्यामुळे प्रत्येकाची गरज ही भासतेच .  लॅपटॉप : तुमचा दिवसातील पूर्ण वेळ लॅपटॉपसमोर जात असेल तर दर ३ वर्षांनी तुम्ही नवा लॅपटॉप घेण्यास हरकत नाही . पण दिवसातील काही तास किंवा फक्त फेसबुक , ट्विटर , चॅटिंगसाठी तुम्हाला लॅपटॉपची गरज असेल तर सध्या वापरत असलेला लॅपटॉप काय वाईट आहे ? किंवा सरळ कम्प्युटर वापरा . कम्युटरचा एखादा पार्ट खराब झाला तर बदलता येतो . स्पीड कमी झाला असेल तर रॅम वाढवून घ्या . संपूर्ण लॅपटॉपच बदलण्यापेक्षा ते कधीही परवडते .  .......................................  -------महाराष्ट्र टाइम्स  

स्मार्ट ‘विन्डोज ८’

स्मार्ट ‘विन्डोज ८’

बाजारात दररोज कितीही वेगवेगळी उपकरणे दाखल झाली तरी त्यामध्ये सर्वप्रथम पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे ऑपरेटींग सिस्टिम. मोबाईल, टॅब्लेट, पीसी यामध्ये...

आठवी खिडकी उघडली!

आठवी खिडकी उघडली!

कम्प्युटर , स्टायलसवर आधारित स्मार्टफोन , टचस्क्रीन फोन, टॅब्लेट पीसी , लॅपटॉप आदी सर्व आधुनिक युगातील संदेशवहन आणि माहितीसाठा करणाऱ्या गॅजेट्सना पूरक ठरणारी बहुचर्चित ' विंडोज ८ ' ही नवी ऑपेरेटिंग सिस्टिम गुरुवारी मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणली .  विंडोज यूजरना ' विंडोज ८ ' साठी अपग्रेड करणे शक्य होणार असून, तशी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .  या नव्या सिस्टिममुळे संधीची नवी खिडकी उघडण्याबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनी पुन्हा एकदा झेपावेल , अशी अपेक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) स्टीव्ह बालमेर यांनी व्यक्त केली . विंडोज अपग्रेडची सुविधा ३९ . ९९डॉलरपासून उपलब्ध असेल , असे कंपनीच्या विंडोज विभागाचे अध्यक्ष स्टीव्हन स्निफेस्की यांनी जाहीर केले  . गॅजेटप्रेमींसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे जगातील अग्रेसर आयटी कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'ने भारतात 'विंडोज- 8' लॉन्च केले आहे. गेल्या...

Page 397 of 413 1 396 397 398 413

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!