MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल ??

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 2, 2012
in News

गेल्या काही दिवसांत गुगलच्या शेअरमध्ये १० टक्क्यांहूनअधिक घसरण झाली आहे . त्यामुळे कंपनीच्या मालमत्तेत २४ अब्ज डॉलरने घट झाली आहे . ही घट अशीच सुरू राहिली , तर येत्या काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल , अशी शक्यता विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत . 


गेल्या तिमाहीमध्ये गुगलच्या महसूलात केवळ १७ टक्क्यांची वाढ दिसून आली . २००९ नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या महसूलात २० टक्क्यांपेक्षा कमी वाढ दिसून आली आहे .एकेकाळी सर्च इंजिन क्षेत्रात याहूची आघाडी होती . पण हळुहळू या स्पर्धेतून याहू बाद झाले . येत्या ५ – ८ वर्षांत गुगलवरही तीच वेळ येऊ शकते , असे आयर्न कॅपिटल या हेज फंडाचे संस्थापक एरिक जॅक्सन यांनी म्हटले आहे . युजरने जाहिरातींवर क्लिक केल्यास गुगलला महसूल मिळतो . गेल्या तीन महिन्यांत त्यात १५ टक्के घट झाली आहे . त्यामुळे भविष्यात गुगलचा नफा आणखी कमी होईल , अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . अधिकाधिक ग्राहक मोबाइल अॅप्लिकेशन्सना प्राधान्य देत असल्याने जाहिरातदारही इंटरनेटवर आधारित जाहिरातींसाठी पैसे मोजण्यास तयार नाहीत . 


त्यातच जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये बायडूला प्राधान्य दिले जाते . मायक्रोसॉफ्टनेही काही महिन्यांपूर्वीच बिंगची नवीन आवृत्ती सादर केली होती . त्याचवेळी गुगलची रशियातील स्पर्धक यान्डेक्सने विकसनशील मार्केटमध्ये गुगलला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे . स्वतःकडील तज्ज्ञांचा वापर करून गुगलला आव्हान देण्याचे कंपनीने ठरविले आहे . त्यासाठी कंपनीने तुर्कस्तानपासून सुरुवात केली आहे . गेल्याच महिन्यात कंपनीने गुगलच्या क्रोमला आव्हान देण्यासाठी नवा ब्राऊझर लॉँच केला . त्यामुळे ऑपेरा तयार करणाऱ्या नॉर्वेजियन कंपनीने यान्डेक्ससोबत ब्राऊझर तंत्रज्ञान शेअर करण्यासाठी करार केला आहे . या ब्राऊझरवर कामकरण्यासाठी यान्डेक्स विविध अॅप्लिकेशन्स तयार करत असून सर्चच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल गोळा करण्याचा त्यांचा मानस आहे . 


एकेकाळी सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात ऑर्कुटचेच साम्राज्य होते . पण फेसबुकच्या उदयाबरोबरच ऑर्कूटचे साम्राज्य कमी झाले . आता ते जवळपास दिसेनासे झाले आहे . फेसबुकलाही आता ट्विटर , लिंक्डइनचा धोका जाणवतोआहे . फेसबुकच्या शेअरमध्ये होत असलेली घसरण थांबलेली नाही . त्यामुळे इतके दिवस टिकून असलेली गुगलचीसद्दी जाऊन गुगलला पर्याय निर्माण होईल आणि गुगल इतिहासजमा होईल , अशी विश्लेषक वर्तवत असलेली शक्यता पूर्णपणे खोटी ठरवता येणार नाही . शेवटी हे तंत्रज्ञानाचे जग आहे . त्यात दररोज नवीन काही येणारच … 

ADVERTISEMENT
Tags: GoogleSharesTrust
ShareTweetSend
Previous Post

स्मार्ट ‘विन्डोज ८’

Next Post

अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Google Year In Search 2024

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२४ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 16, 2024
Google Pixel 9 Series

गूगलची Pixel 9 सिरीज सादर : आता Gemini AI सह!

August 14, 2024
Next Post
अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech