MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गॅजेट अपडेट केव्हा कराल?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 2, 2012
in News
ADVERTISEMENT
मोबाइल , टॅबलेट , लॅपटॉप खराब झाला , चोरीला गेला ,हरवला तर नवीन घेणे आपसूकच येते . पण काहींना नवेकोरे गॅजेटही अपडेट करण्याची घाई झालेली असते . केवळ काही मोजक्या फिचर्सकडे आकर्षित होऊन हा निर्णय घेतला जातो . हे अपडेशन करताना बरेच पैसेही खर्च केले जातात . पण खरंच त्यांची गरज आहे का ? हा विचार केला जात नाही . अशांसाठी तुमचे गॅजेट अपडेट केव्हा करायचे याच्या टिप्स … 


सर्वसाधारणपणे कुठल्याही उपकरणात ३ – ४ वर्षाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात बदल होतात . सामान्य नागरिकांनी तेव्हाच त्यात बदल करावा , असा सल्ला गार्टनरचे विश्लेषक मायकेल गार्टेनबर्ग यांनी दिला आहे .सुरुवातीच्या काळात लॅपटॉपही लोकांना हँडी वाटत होते . आता अल्ट्रा बुक आल्यावर त्याची गरज वाटू लागली .किंवा २जी आणि ३जी मोबाइलमधील फरकही स्विकारण्यासारखा आहे . पण थोडेफार बदल केलेलं मॉडेल , कमी- जास्त फिचर्स , कलर्स यासारख्या गोष्टींसाठी बदल करणे तितकेसे परवडणारे नाही . नवीन गॅजेट घेताना एक सूत्र कायम लक्षात ठेवायला हवे की , तुम्ही त्यासाठी मोजलेला पैसा पूर्ण वसूल झाला आहे याची खात्री तुम्हाला पटायला हवी . 


स्मार्टफोन : प्रवासात मेल चेक करण्यासाठी तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तीनेक वर्ष तुम्ही तो अपडेट केला नाही तरी चालेल . पण सदासर्वदा तुम्ही स्मार्टफोनसोबत राहत असाल तर मग तुम्ही २० महिन्यात फोन अपडेट करण्याची गरज आहे . काही मोबाइल कंपन्यांच्या सिमकार्डसोबतच हँडसेटही विकतात . काही महिन्यांनी पुन्हा त्यांच्याकडे नवीन मॉडेल आलेले असते . पण अशावेळी जुन्या मॉडेलची गरज खरंच संपली का , नव्या हँडसेटसाठी किंमत मोजावी एवढे अपडेट्स त्यात आहेत का हे प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे . 


टॅबलेट : टॅबलेट्सचा प्रमुख सर्फिंग , वापर गेम खेळणे , इ – बुक वाचन किंवा चित्रपट पाहण्यासाठी केला जातो .त्यामुळे तो वारंवार अपग्रेड करू नये असा सल्ला तज्ञ देतात . मॅकरुमर्स साइटचे संस्थापक अरनॉल्ड किम म्हणतात, आयपॅडच्या प्रत्येक नव्या मॉडेलमध्ये फारसे काही मोठे बदल नसतात . त्यामुळे तुमचा जुना आयपॅडच चांगलाआहे . आणि कितीही म्हटलं तरी मोबाइल , टॅबलेट आणि लॅपटॉप परस्परांचं काम पूर्ण क्षमतेने करू शकत नाही .त्यामुळे प्रत्येकाची गरज ही भासतेच . 


लॅपटॉप : तुमचा दिवसातील पूर्ण वेळ लॅपटॉपसमोर जात असेल तर दर ३ वर्षांनी तुम्ही नवा लॅपटॉप घेण्यास हरकत नाही . पण दिवसातील काही तास किंवा फक्त फेसबुक , ट्विटर , चॅटिंगसाठी तुम्हाला लॅपटॉपची गरज असेल तर सध्या वापरत असलेला लॅपटॉप काय वाईट आहे ? किंवा सरळ कम्प्युटर वापरा . कम्युटरचा एखादा पार्ट खराब झाला तर बदलता येतो . स्पीड कमी झाला असेल तर रॅम वाढवून घ्या . संपूर्ण लॅपटॉपच बदलण्यापेक्षा ते कधीही परवडते . 
………………………………… 

——-महाराष्ट्र टाइम्स  
Tags: CareGadgetsUpdates
ShareTweetSend
Previous Post

स्मार्ट ‘विन्डोज ८’

Next Post

अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Windows 10 May 2020 Update

विंडोज १० चं नवं अपडेट आता उपलब्ध : Windows 10 May 2020 Update

May 28, 2020
विंडोज १० मे २०१९ अपडेट उपलब्ध : लाईट थीमचा समावेश

विंडोज १० मे २०१९ अपडेट उपलब्ध : लाईट थीमचा समावेश

May 22, 2019

OnePlus 3/3T साठी अँड्रॉइड 8.1 सोडून थेट अधिकृत अँड्रॉइड P अपडेट मिळणार!

July 30, 2018

ओलाव्यापासून वाचवा ‘स्मार्टफोन’

June 22, 2014
Next Post
अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!