नवे लेख (Latest Posts)

विंडोज एक्सपीचे पॅकअप

गेल्या ११ वर्षांपासून विंडोज एक्सपी ही कम्प्युटर युझर्सचीआवडती ऑपरेटिंग सिस्टीम झाली आहे . त्यानंतर विंडोजच्यानव्या एडिशन्स आल्या असल्या तरी एक्सपी एवढी लोकप्रियता कुणालाही मिळालेली नाही . त्यामुळेच कदाचितमायक्रोसॉफ्ट , अॅडोबसह इतर सॉफ्टवेअर कंपन्यांनी आता आपल्या नव्या सॉफ्टवेअरच्या एडिशन्स एक्सपीलासपोर्ट करणार नाहीत असे जाहीर केले आहे . त्यामुळे एक्सपीच्या युझर्सला नजिकच्या भविष्यात नव्या ऑपरेटिंगसिस्टीमबरोबर जुळवून घ्यावे लागणार आहे . गुगलनेही सर्व इंटरनेट एक्सप्लोअर धारकांना त्यांचा ब्राऊझर अपडेट करायला सांगितला आहे . इंटरनेटएक्सप्लोअरर १० येत्या २६ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार आहे . त्यानंतर म्हणजे १५ नोव्हेंबरपासूनइंटरनेट एक्सप्लोअर ८ किंवा त्यापूर्वीच्या एडिशन्सला गुगल अॅप्स सपोर्ट करणार नाहीत . त्यामुळे एक्सपीयुझर्सनी नवीन एक्सप्लोअरर इन्स्टॉल करायचा म्हटला तर मायक्रोसॉफ्ट ते करू देत नाहीय . इंटरनेटएक्सप्लोअररच्या नव्या एडिशन्स एक्सपीला सपोर्ट करणार नाही असे कंपनीने जाहीर करून टाकले आहे . यायुझर्सला फायरफॉक्स , ऑपेरा , क्रोम यासारखे ब्राऊझर इन्स्टॉल करण्याची सोय आहे . पण फोटोशॉप युझर्सला तर ही सोय देखील उपलब्ध नाही . फोटोशॉपची सीएस ६ ही एक्सपीला सपोर्ट करणारीशेवटची व्हर्जन असेल असे अॅडोबने जाहीर केले आहे . कारण फोटोशॉपच्या आगामी व्हर्जनसाठी मॉडर्न हार्डवेअरग्राफिक्स लागणार असून ते एक्सपीमध्ये नाहीत , असे कंपनीचे प्रोडक्स मॅनेजर टॉम होगार्टी यांनी म्हटले आहे .विंडोजच्या नव्या एडिशन्समध्ये हे फीचर्स उपलब्ध आहेत . ग्राफीक कार्ड , ग्राफीक ड्रायव्हर्समुळे थ्रीडी , ब्लर गॅलरी, लाईटींग इफेक्ट यासारखे फीचर्स विंडोजच्या नव्या एडिशन्स युझर्सला वापरता येतील . फोटोशॉपची नवीएडिशन कधी दाखल होणार हे कंपनीने जाहीर केले नसले तरी आगामी एडिशन एक्सपीला सपोर्ट करणार नाही हेजाहीर करून ग्राहकांना ऑपरेटिंग सिस्टीम बदलण्यासाठी वेळ देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे . यापूर्वीचअडोब लाइटरुमच्या अपडेटेड एडिशन्स एक्सपीला सपोर्ट करत नाहीत . नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ऑगस्टमध्ये विंडोज ७ च्या युझर्सच्या संख्येने विंडोज एक्सपीच्यायुझर्सला क्रॉस केले आहे . त्यामुळे आगामी काळात कराव्या लागणा - या बदलांची तयारी कम्प्युटर युझर्सनेही सुरूकेल्याचे दिसून येते आहे . 

अॅपल मॅप्स : आयफोन 5 मध्ये दोष

माटुंगा रेल्वे स्टेशन कुठे आहे ? असा प्रश्न मुंबईतील शेंबड्या पोराला जरी विचारला तरी तो त्याचे उत्तर देईल . मात्र जर कोणी तुम्हाला सांगितले की माटुंगा स्टेशन अरबी समुद्रात आहे तर तुम्ही मुर्खात काढाल . पण अॅपल कंपनीच्या आयफोन ५ मध्ये हा प्रकार घडला आहे .  आयफोन ५ साठी अॅपल कंपनीने तयार केलेल्या अॅपल मॅप्सया अॅप्लीकेशनमध्ये माटुंगा स्टेशनची नोंद अरबी समुद्रात झाली आहे . मुंबईची शान असणारा वांद्रे वरळी सागरी सेतूया अॅपमध्ये अस्तित्वातच नाही . सर्वाधिक आधुनिक म्हणून ओळखल्या जाणा- या या अॅपल मॅप्समध्ये मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशनची नोंद झालेली नाही . काही स्टेशन तर मूळ जागेपेक्षा खूप दूर असल्याचे दाखवण्यात आले आहे . अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्येही ( आयओएस सहा ) अनेक दोष आढळले आहेत .  आयफोन ५ हा स्टिव्ह जॉब्ज यांच्या मृत्यूनंतर अॅपलने तयार केलेला पहिला स्मार्ट फोन आहे . या फोनच्या सॉफ्टवेअरसाठी जॉब्ज यांचे मार्गदर्शन मिळालेले नाही . त्याचा फटका आयफोन ५ ला बसल्याची शक्यता व्यक्तहोत आहे . 

Page 411 of 420 1 410 411 412 420

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!