आयट्यून्स भारतात
देशातील मोबाइल आणि टॅबलेटधारकांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे पाहिजे असेल , तर ते अॅपलचा मार्ग चोखाळतात. भारतात एमपी३ प्लेयरच्या सुरुवातीच्या काळात तर आयपॉडची ...
देशातील मोबाइल आणि टॅबलेटधारकांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे पाहिजे असेल , तर ते अॅपलचा मार्ग चोखाळतात. भारतात एमपी३ प्लेयरच्या सुरुवातीच्या काळात तर आयपॉडची ...
जगातील सर्वांत मोठा मोबाइल प्लॅटफॉर्म कोणता , तर अँड्रॉइड असे म्हणावे लागले . या ओपन सोर्स मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्ममुळे इनोव्हेश करण्यास वाव मिळतअसून , परिणामी मोबाइल फोनच्या किमतीही कमी होत आहेत . यामुळे अॅपल कंपनीपुढे गुगल कंपनीच अँड्रॉइडही ऑपरेटिंग सिस्टिम वरचढ ठरत आहे . जगात विविध ठिकाणी पाठविण्यात येत असलेल्या फोनमध्ये चार फोनमागे तीन फोन हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचे आहेत . याबाबतची पुष्टीही आयडीसीने केली आहे . २००८ मध्ये गुगल कंपनीने अँड्रॉइड ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केली . तेव्हापासून स्मार्टफोनच्या विक्रीतही मोठी वाढ झाली असून , ही ऑपरेटिंग सिस्टिमच या वाढीचे मुख्य इंजिन आहे . लाँच झाल्यापासून प्रत्येक वर्षीअँड्रॉइड ही सिस्टिम वाढीच्या बाबतीत सरस ठरली आहे . दुसऱ्या तिमाहीत टॅब्लेट बाजारपेठेत अॅपल कंपनीचा हिस्सा ६५ टक्के होता आणि आता तो ५० टक्क्यांपेक्षा किंचित जास्त आहे . जागतिक पातळीवर विविध उत्पादकांकडून या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित डिव्हाइस तयार केली जात असून , त्यांच्या किमतीतही विविधता आहे . अँड्रॉइड स्मार्टफोनची निर्यात १३ . ६ कोटी युनिटवर पोचली आहे . गेल्या वर्षापेक्षा यात ९०टक्क्यांहून अधिक वाढ आहे . सॅमसंग गॅलेक्स एस३ या स्मार्टफोनने अॅपल कंपनीच्या आयफोन ४ एसला तिसऱ्या तिमाहीत मागे टाकत जगात सर्वाधिक विकला जाणारा फोन होण्याचा मान मिळाविला आहे , असे पाहणी अहवालत नमूद केले आहे . अॅपलपेक्षा इनोव्हेशनच्या बाबतीत अँड्रॉइडचा वेग अधिक आहे . अँड्रॉइडकडून जोरदार प्रयत्न सरू असून , अॅपल कंपनी बरीच मागे आहे , असे गार्टरनचे म्हणणे आहे . अँड्रॉइड हा ओपन सोर्सप्लॅटफॉर्म असून , वापरण्यास कोणतेही शुल्क द्यावे लागत नसल्याने अनेक कंपन्या या सिस्टिमचा आधार घेतडिव्हाइस डेव्हलप करीत आहेत . याचा फायदा हा अँड्रॉइडला मार्केट वाढण्याच्या रूपाने होत आहे . अँड्रॉइडप्लॅटफॉर्मवर अनेक पर्याय उपलब्ध असून बहुतेक पर्याय स्वस्तात मिळतात . हा प्लॅटफॉर्म वापरण्याकडे लोकांचाकल वाढत आहे . दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा असली , तरी त्याचा फायदा हा प्रॉडक्ट रास्त किमतीला प्रसंगी स्वस्तात मिळण्याच्या रूपाने होत आहे हे नक्की !
गत शुक्रवारी भारतात दिल्ली, मुंबई आणि बेंगळूरूसारख्या मोठया शहरांमध्ये आयफोन-5 मोठया उत्साहाने लॉंच करण्यात आला. देशातील दोन मोठे टेलिफोन ऑपरेटर ...
सप्टेंबर महिन्यात आय फोन फाइव्ह लॉन्च करताना , आपण लवकरच मिनी ऑयपॅड घेऊन येणार असल्याची खुशखबर अॅपलनं टेक - सॅव्ही तरुणांना दिली होती . आपला हा शब्द त्यांनी पाळला असून , मिनी आयपॅडचं दर्शन जगाला घडवले. नव्या मिनी आयपॅडची स्क्रीन फक्त ७ . ९ इंचांची आहे . याआधीच्या आयपॅडची स्क्रीन दहा इंचांची होती . ए - ५प्रोसेसर , पाच मेगापिक्सल कॅमेरा , एचडी व्हिडिओ चॅट ही नव्या मिनी आयपॅडची वैशिष्ट्ये आहेत . नव्या मिनी आयपॅडचे वाय - फाय मॉडेल ३२९ डॉलर (सुमारे १७ हजार ६७८ रुपये ) किंमतीचे आहे , तर थ्री जी मॉडेलची किमान किंमत ४५९ डॉलर सुमारे २५हजार २०० रुपये आहे . अॅपलच्या नव्या आयपॅडसाठी २६ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होत आहे . नवा मिनी आयपॅड टॅबलेट गूगलच्या नेक्सस - ७ टॅबलेटपेक्षा जास्त उत्तम आहे ; असे अॅपल कंपनीने सांगितले .कंपनीने मिनी आयपॅड टॅबलेट व्यतिरिक्त १३ इंची स्क्रीन आणि ० . ७५ इंची जाडीचे मॅकबुक प्रो देखिल लाँच केले. हे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके मॅकबुक प्रो आहे . अॅपलने मंगळवारी रात्री उशिरा सॅन जोन्स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिलिप शिलर ...
वॉशिंग्टन - जगभरातील स्मार्टफोन युजर्सचा आकडा एक अब्जाच्याही पार गेला आहे. अमेरिकेतील संशोधन आणि सल्लागार संस्था ‘स्ट्रॅटेजी अॅनालिस्ट्स’च्या अहवालात याबाबत ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech