अवघ्या आठ हजार रुपयात भारतात लॉन्च झाला APPLE TV
'अॅपल'ने आपला APPLE TV भारतीय बाजारात नुकताच लॉन्च केला आहे. या टीव्हीच्या बेसिक मॉडेलची किंमत 8295 रुपये इतकी आहे. ग्राहकांना ...
'अॅपल'ने आपला APPLE TV भारतीय बाजारात नुकताच लॉन्च केला आहे. या टीव्हीच्या बेसिक मॉडेलची किंमत 8295 रुपये इतकी आहे. ग्राहकांना ...
तंत्रज्ञान स्मार्ट झालं आणि एकाच उपकरणात अनेक उपकरणं सामावून घेण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. आता हेच बघा ना , एखाद्याला खुशाली कळवण्यासाठी उपयोगात ...
तुमचा टीव्ही तुम्हाला इडियट बॉक्स वाटतो का ? वाटत असेल तर त्याला तुम्ही आता ' स्मार्ट बॉक्स ' बनवू शकता. यासाठी थोडा खर्च करावा लागेल , पण या ...
पूर्वी पत्ता विचारायचा झाला , की रस्त्यावरील एखाद्याव्यक्तीला गाठले जायचे . आजही तसे होते पण सध्याच्या युगात पत्ता किंवा एखादे ठिकाण शोधण्याकरिताइंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे ... पूर्वी एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे झाल्यास त्या ठिकाणीजायचे कसे ? जवळची खूण काय ? असा तपशील गोळा करावा लागे . मात्र , आता इंटरनेटवर सर्च करायचाअवकाश की तेथे कसे जायचे , जवळचा रस्ता कोणता आदी माहिती काही क्षणांतच मिळते . ' जीपीएस ' वर आधारित मोबाइल असल्यास इंटरनेटच्या साह्याने मॅपचे अॅप्लिकेशन सुरू करून संबंधित ठिकाणीपोचता येऊ शकते . कागदावरील मॅपचे थोडक्यात नकाशांचे व्हर्च्युअल रूप सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुगलनेआपल्या मॅप्सच्या सर्व्हिसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले . अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारितमोबाइल फोनमध्ये गुगलच्या मॅप्सचे अॅप दिलेले असते . नसल्यास ते डाउनलोड करून घेणे उपयोगाचे ठरू शकते. गुगलच्या मॅपच्या आधारे अनेक लोकांनी त्यांची घराचे पत्ते अॅड केले आहेत . त्यामुळे गुगल मॅपवरून संबंधितव्यक्ती कोठे राहते किंवा संबंधित व्यक्तीचे ऑफिस कोठे आहे , हे कळते . मात्र , आयफोन बनविणाऱ्या अॅपलकंपनीने ' गुगल मॅप ' सुविधा आयफोनवरून काही महिन्यांपूर्वी काढून टाकली होती . अॅपलने स्वतःची मॅपसर्व्हिस सप्टेंबरमध्ये सुरू केल्याने हे पाऊल उचलण्यात आले होते . पूर्वी अॅपलच्या आयफोनमध्ये गुगल मॅपचे प्री - लोड अॅप येत होते . ते बंद करण्याच्या कंपनीच्या या निर्णयासग्राहकांकडून तीव्र विरोध झाला . अखेर अॅपल कंपनीने आयफोनवर गुगलची फ्री मॅप सुविधा पुन्हा उपलब्ध करूनदिली आहे . चाळीस देशांत तिचा अॅक्सेस करणे शक्य असल्याचे कंपनीने स्पष्ट केले . गुगलने आकाशातून दिसणारेदृश्य , टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन हे नवे फीचर उपलब्ध केले आहे . ही सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर डाउनलोडच्या बाबतीतही अॅपल अॅप स्टोअरवर गुगल मॅपिंग अॅपला सर्वाधिक मागणी होती . गुगल मॅप अॅपलच्याउत्पादनावर उपलब्ध झाला आहे . यूजर पब्लिट ट्रान्झिट इन्फॉर्मेशन यावर पाहू शकणार आहे ; तसेच लाइव्हट्रॅफिक अपडेटबरोबर स्ट्रीट व्ह्यू फीचरचाही यात समावेश करण्यात आला आहे . यामुळे यूजरना विविध प्रकारचीमाहिती आपल्या गरजेनुसार जाणून घेता येणार आहे . गुगलचे मॅप किती लोकप्रिय आहे , हे अॅपलच्या ग्राहकांच्यामागणीवरून कळू शकते . अॅपल या कंपनीची गुगल ही स्पर्धक कंपनी आहे . मात्र , असे असतानाही यूजरचीमागणी पूर्ण करण्यासाठी अॅपलला पुन्हा ही सर्व्हिस उपलब्ध करून देण्याची दखल घ्यावी लागली आहे .
देशातील मोबाइल आणि टॅबलेटधारकांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे पाहिजे असेल , तर ते अॅपलचा मार्ग चोखाळतात. भारतात एमपी३ प्लेयरच्या सुरुवातीच्या काळात तर आयपॉडची ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech