Cashless Archives - MarathiTech - मराठीटेक
एसटीच्या तिकीटाचं पेमेंट आता बसमध्येच UPI द्वारेही करता येणार!
होय. सरतेशेवटी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्वच प्रमुख आगारांमधील बसेसमध्ये UPI द्वारे पैसे देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात सुरुवात केली आहे. आजपर्यंत रोख पैसे देण्याचा किंवा आधीच तिकीट ऑनलाइन बुक करणे असे दोनच पर्याय होते. २५ ऑगस्ट २०२२ पासून याची काही स्थानकांममधील ठराविक बसेसमध्येच चाचणी सुरू होती मात्र आता जवळपास सर्व प्रमुख स्थानाकांमधील बसेसमधी ही सोय उपलब्ध होत आहे!
मात्र आता बसमध्येच वाहकांना ETI मशीन्स देण्यात आल्या असून याद्वारे आपण मशीनवरील QR स्कॅन करून आपल्या फोनमधील फोनपे, गूगल पे, Paytm UPI अशा कोणत्याही UPI ॲपमार्फत स्कॅन करून लगेच ऑनलाइन पैसे देऊन पेमेंट पूर्ण करू शकता! यामुळे लवकरच सर्व एसटी बसमध्येही कॅशलेस (रोख पैसे जवळ न ठेवता) प्रवास करता येईल!
ही सेवा आत्ता हळूहळू उपलब्ध करून देण्यात असल्यामुळे काही ठिकाणी हे मशीन उपलब्ध नसल्याने हा नवा पर्याय कदाचित मिळणार नाही असं होऊ शकतं. प्रवास करताना तो विचार करूनच सध्यातरी प्रवास करा. येत्या काही दिवसात/महिन्यात सर्वच बसेसमध्ये हे नक्की उपलब्ध होईल!
MSRTC च्या एसटी बसमधून प्रवास करताना UPI द्वारे कसे पैसे द्यायचे ?
कंडक्टर/वाहक आपल्याकडे आल्यावर कोणत्या ठिकाणी उतरायचं आहे आणि किती प्रवासी एकत्र आहोत ते सांगा.
त्यानुसार वाहक तुम्हाला तुमच्या तिकीटाची एकूण रक्कम सांगतील.
त्यांना तुम्ही UPI द्वारे पैसे देणार आहात असे सांगा.
मग ते तुम्हाला त्यांच्याकडील मशीन मध्ये ती रक्कम टाकून त्याचा QR कोड तयार करून तुम्हाला दाखवतील.
तुम्ही वापरत असलेल्या UPI ॲप मध्ये जाऊन Scan QR चा पर्याय निवडा आणि तो कोड स्कॅन करा.
आता रक्कम योग्य असल्याची खात्री करून पिन टाकून पेमेंट करा.
पेमेंट यशस्वी झालं असेल तर तुम्हाला मेसेज येईल आणि वाहक तुम्हाला तिकीट देतील.
तिकीटावर नेहमीच्या माहितीसोबत तुम्ही UPI मार्फत पैसे दिले असा उल्लेख असेल.
आता एसटीचं तिकीट बुक करण्यासाठी खालील पर्याय आहेत :
एसटी बसमध्येच : एसटी बसमध्येच कंडक्टर/वाहकांकडून ऐनवेळी तिकीट घेऊन त्याचे पैसे रोख किंवा आता UPI मार्फत फोनद्वारेही देता येतील.
महामंडळाच्या अधिकृत द्वारे : MSRTC Mobile Reservation App on Google Play
महामंडळाच्या वेबसाइटद्वारे : https://public.msrtcors.com/ticket_booking/index.php या लिंकवर जाऊन अकाऊंट रजिस्टर करून तिकीट बुक करत UPI/Debit Card/Credit Card/Wallet असे बरेच ऑनलाइन पर्याय वापरुन पैसे देता येतील. याद्वारे बुकिंग केल्यावर त्याची प्रिंट काढून किंवा याचा आलेला ईमेल कंडक्टरना दाखवून प्रवास करू शकता.
Redbus/Abhibus/MakeMyTrip/GoIbibo/Paytm असे बाहेरचे पर्याय वापरुनसुद्धा तिकीट बुकिंग करता येतं!  बुकिंग पूर्ण झाल्यावर याचा आलेला ईमेल कंडक्टरना दाखवून प्रवास करू शकता.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी प्रकाशित केलेलं पत्रक खाली वाचू शकता.
उपमहाव्यवस्थापक नि.स.क्र.१. २ व ३.
विभाग नियंत्रक,
रा.प. मुंबई/ पालघर / ठाणे/ रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग / पुणे/ सातारा / सांगली/ कोल्हापूर/ सोलापूर / नाशिक /धुळे/ जळगांव / अहमदनगर/छ. संभाजीनगर / धाराशिव / बीड / नांदेड / लातूर/ परभणी / जालना / नागपूर/ भंडारा /चंद्रपूर/ वर्धा / गडचिरोली / अकोला /अमरावती/यवतमाळ/ बुलढाणा विभाग.
विषयः- नवीन अॅन्ड्रॉईड ईटीआय मशिन द्वारे युपीआय पेमेंट बाबत.
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, रा.प. महामंडळात नवीन अॅन्ड्रॉईड ईटीआय मशिन सर्व आगारात कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित (Cashless) व्यवहार करण्यात येत आहे. रा.प. महामंडळातही रोकड विरहित (Cashless) सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. रा.प. महामंडळाद्वारे प्रथम टप्पा मध्ये युपीआय QR Code द्वारे पैसे घेण्याची कार्यपध्दती सुरु करण्यात येत आहे.
याच्या पुढील टप्प्यात डेबीट व क्रेडीट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा टप्प्यात उपलब्ध होणार आहे. तरी सद्यस्थिती वाहका द्वारे QR Code मार्फत व्यवहार करण्याची मानक कार्यपध्दती (SOP) सोबत जोडण्यात येत आहे. सदर व्यवहार करताना कोणतेही ट्रान्झेक्यशन फेल झाल्यास एअरटेल क्रमांकाद्वारे ४०० व इतर मोबाईल क्रमांकाद्वारे ८८००६८८००६ या क्रमांकास संपर्क करावा. तसेच ई-मेल wecare@airtelbank.com येथे संपर्क करावा. सदर क्रमांक हे २४ तास उपलब्ध आहेत.
तरी सर्व वाहकांना याबाबत अवगत करण्यात यावे. तसेच सदर मानक कार्यपध्दती (SOP) वाहकांच्या निदर्शनास आणुन देण्यात यावी व प्रवाशांना युपीआय QR Code द्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
सोबतः- मानक कार्यपध्दती (SOP). (पान ०१ ते ०६)
प्रतः-
१. वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांना वरील प्रमाणे माहिती व कार्यवाहीसाठी.
२. उपमहाव्यवस्थापक (मावतं) यांना वरील प्रमाणे माहिती व कार्यवाहीसाठी.
३. मे. ईबिक्स कॅश मोबिलीटी सॉफ्टवेअर इंडिया लि. यांना वरील प्रमाणे माहिती व कार्यवाहीसाठी.
एसटी महामंडळाचा अखेर कॅशलेस प्रवास सुरु…!💐
आता UPI द्वारे करता येणार आपल्या तिकिटाचे पेमेंट 👏🏻@msrtcofficial @CMOMaharashtra #avaliyapravasi#अवलियाप्रवासी pic.twitter.com/l9mKOzXx5z
— Rohit Dhende (@avaliyapravasi) December 9, 2023
The post एसटीच्या तिकीटाचं पेमेंट आता बसमध्येच UPI द्वारेही करता येणार! appeared first on MarathiTech - मराठीटेक.
कॅशलेस अर्थव्यवस्था आणि नवे पर्याय !
काही दिवसांपूर्वीच झालेल्या चलनबदलामुळे भारतातल्या अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल घडले आणि पुढेही घडतीलच! पूर्वकल्पना न देताना झालेल्या या बदलामुळे काळा पैसा उघडकीस आणण्यास आणि तो चलनातून बाद करण्यास मदत झाली असली तरी नव्या नोटांच्या तुटवड्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. एटीएम, बँकामध्ये नोटाबदलासाठी रांगा लागल्या. सध्या या रांगा बर्‍याच कमी झाल्या आहेत. मात्र याच काळात अनेक वर्षांपासून ज्याची गरज होती आणि जे प्रत्यक्षात आणणंसुद्धा शक्य होतं ते आता घडताना दिसत आहे. ते म्हणजेच कॅशलेस व्यवहार! तर आज पाहूया हा कॅशलेस इकॉनमी काय प्रकार आहे?, यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत?, आपल्यासाठी कोणते पर्याय योग्य ठरतील? याविषयी …
टीप : या लेखामध्ये विविध पर्यायांची थोडक्यात ओळख करून देण्यात आली आहे. त्यांच्या सविस्तर माहिती तसेच मार्गदर्शनपर व्हिडिओसाठी स्वतंत्र लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ते लेखसुद्धा नक्की वाचा.
सध्याच्या अर्थव्यवस्थेतील व्यवहार : सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर रोख पैशाचा म्हणजेच नोटांद्वारे व्यवहार होतात. ही पद्धत बर्‍याच वर्षापासून सुरू आहे. छापील नोटांच्या व्यवहारात भारत आघाडीवर. या पद्धतीचे तोटे चलनबदलाच्या निमित्ताने आपल्या समोर आले आहेतच. याबद्दल थोडक्यात माहितीसाठी यापूर्वीचा मराठीटेकवरचा लेख वाचा. अलीकडे गेल्या काही वर्षात प्लॅस्टिक मनी (डेबिट/क्रेडिट कार्डस) चा वापर वाढला आहे. तरीही ही पद्धत या व्यवस्थेमध्ये म्हणाव्या इतक्या मोठ्या प्रमाणात वापरली जात नाही.
कॅशलेस अर्थव्यवस्था : ह्या अर्थव्यवस्थेनुसार व्यवहारासाठी कॅश/रोख रक्कम वापरण्याऐवजी इतर पर्याय वापरले जातात जसे की प्लॅस्टिक मनी, इ वॉलेट, इंटरनेट बँकिंग. ज्यामध्ये छापील नोटांचा अजिबात समावेश नसतो. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेची भारताला नक्कीच गरज आहे. ही व्यवस्था मोठ्या प्रमाणात अंमलात आणणंसुद्धा शक्य आहे. भारतीयांमधील वाढलेला फोनचा वापर यासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहेच! या अर्थव्यवस्थेमुळे सर्व व्यवहार बर्‍यापैकी पारदर्शक असतील, सुरक्षित असतील आणि त्यामुळं काळ्या पैशाला/गैरव्यवहारांना थांबवण शक्य आहे! ह्या व्यवस्थेनुसार व्यवहार करणंसुद्धा सोपं असल्यामुळं लवकरच याचा मोठा प्रसार होईल असे चित्र या चलनबदलाच्या निमित्ताने का होईना पण दिसू लागले आहे.
कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे :
• छापील नोटांमधून होणारे गैरव्यवहारांना आळा बसेल!
• चलन व्यवस्थापन, नोटांच्या छपाईचा सरकारी खर्च वाचेल!
• बनावट नोटा छापण्याचे प्रकार बंद होतील!
• आयकर विभागाकडे प्रत्येक व्यवहाराची नोंद होईल!
• रोख रक्कम, सुटे पैसे जवळ बाळगण्याची गरज नाही!
• धनादेश वटन्याची वाट पहावी लागणार नाही त्यामुळं सर्व व्यवहार जलद!
• सुरक्षित व्यवहार आणि गरजेनुसार अनेक पर्याय उपलब्ध
आता ओळख करून घेऊया कॅशलेस अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायांची …
१. प्लॅस्टिक मनी (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड)
२. इंटरनेट बँकिंग
३. इ वॉलेट/ मोबाइल वॉलेट
४. यूपीआय UPI
५. मोबाइल बँकिंग व USSD
६. POS पॉइंट ऑफ सेल
७. आधार कार्ड द्वारे
१. प्लॅस्टिक मनी 💳: ह्या पर्यायामध्ये डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डचा वापर होतो. खातेदार बँक खात्याशी जोडलेल्या कार्डची बँककडे गरजेनुसार मागणी करतो.
डेबिट कार्ड : आधीच खात्यात असलेल्या रकमेतून व्यवहार/ खरेदीसाठी डेबिट कार्ड (PrePay)
क्रेडिट कार्ड : आधी व्यवहार/खरेदी नंतर महिन्याखेरीस बँकेने पाठवलेल्या बिलानुसार रक्कम बँकमध्ये जमा करण्यासाठी क्रेडिट कार्ड. (PostPay)
प्रत्यक्ष वापर करताना दोन्ही कार्डचा वापर सारख्याच पद्धतीने होतो. कार्डधारक एटीएम मशीनमध्ये जाऊन त्याचा सुरक्षित चार अंकी पिन टाकून पैसे काढू शकतो. दुकानांमध्ये खरेदी करू शकतो (कार्ड स्वाईप- कार्ड दुकानमधील मशीनमध्ये सरकवून). यानंतर बँकमधून त्या व्यक्तीच्या खात्यातून रक्कम थेट दुकानदाराच्या खात्यात जमा होते!  प्लॅस्टिक मनी म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे?
२. इंटरनेट बँकिंग 💻: या पर्यायामध्ये आधी बँककडे अर्ज द्वावा लागतो. त्यानंतर बँक तुम्हाला यूजर आयडी व पासवर्ड देते. याला तुमचं “ऑनलाइन बँक खातं” असंही म्हणता येईल. तो आयडी, पासवर्ड घेऊन तुम्ही तुमच्या बँकच्या इंटरनेट बँकिंग वेबसाइटवर जाऊन लॉगिन करायच की झालं खातं ऑनलाइन व्यवहारांसाठी तयार. खरेदी करताना इंटरनेट बँकिंग पर्याय निवडायचा, आपली बँक निवडायची, यूजर आयडी पासवर्ड टाकायचा, तुमच्या फोनवर आलेला OTP तिथे टाकायचा की झाली खरेदी (/व्यवहार)!
हा पर्याय सर्व पर्यायांमध्ये नक्कीच सर्वात सुरक्षित आहे! तुमच्या खात्यामधून कोणताही व्यवहार झाला की एक ईमेल आणि एक SMS सुद्धा येतो! तुम्ही ऑनलाइन/ऑफलाइन केलेल्या सर्व व्यवहारांची नोंद या वेबसाइटवर कधीही पाहू शकता ती स्टेटमेंट प्रिंट करू शकता! यालाच “नेटबँकिंग” सुद्धा म्हणतात.
३. इ वॉलेट/मोबाइल वॉलेट📱  : सोप्या शब्दात सांगायचे तर हे एक मोबाइलमध्ये असलेलं आभासी पाकीट! जे व्यवहारासाठी खर्‍याखुर्‍या पाकीटाची जागा घेऊ पाहतंय! या मोबाइल वॉलेटमध्ये आपण ठराविक रक्कम साठवू शकतो आणि ती कुठेही व्यवहारासाठी वापरता येते! ऑनलाइन व्यवहार (खरेदी/रीचार्ज/पैसे पाठवणे/इ) तसेच ऑफलाइन ठिकाणी जसे की किराणा विक्रेते, रिक्षा/टॅक्सी चालक, दैनंदिन विक्रेते (भाजी, पेपर,इ) यांना पैसे देण्यासाठी सहज करता येतो! या वॉलेटमध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्यामधून क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेटबँकिंग द्वारे पैसे भरायचे आणि ते पैसे नंतर वरीलप्रमाणे ठिकाणी Send Money / Receive Money असे पर्याय वापरुन वापरू शकता. हा पर्याय पूर्ण सुरक्षित असून तुमचं वॉलेट यूजर आयडी पासवर्ड यांनी सुरक्षित केलेलं असून तुमच्या वॉलेटमधून कोणताही व्यवहार झाला की एक ईमेल आणि एक SMS सुद्धा येतो!
याबद्दल अधिक वाचा मोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे?
४.  यूपीआय (Unified Payment Interface UPI) : यूपीआय हा एक नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यात याचा वापर अधिक केला जाईल अशी आशा आहे. या पद्धतीमध्ये यूजर आयडी/पासवर्ड/बँक खात्याचा क्रमांक, IFSC, यापैकी कशाचीही गरज नाही. यूपीआयमध्ये केवळ एका यूजरनेमचा वापर होतो ज्याद्वारे व्यवहार थेट बँकमधूनच पार पडतात! या यूजरनेमला VPA (व्हर्च्युअल प्रायवेट अॅड्रेस) म्हणतात. यामुळे पैसे पाठविण्याकरिता केवळ या नावाचाच करून काही क्षणात पैसे पाठवता येतात. यूपीआय व मोबाइल वॉलेट या दोन वेगळ्या गोष्टी असून यूपीआयमध्ये मोबाइल वॉलेट प्रमाणे रक्कम भरावी लागत नाही यासाठी थेट बँक खात्यामधूनच व्यवहार केला जातो! हे वापरण्यासाठी सध्या तरी तुमचा फोन तुमच्या बँक खात्याला मोबाइल/नेटबँकिंगमार्फत जोडलेला असावा. त्यानंतर तुम्ही तुमच्या बँकचं अधिकृत अॅप फोनमध्ये डाऊनलोड करा. तोच मोबाइल क्रमांक यूपीआयशी जोडा आणि व्यवहारासाठी ते अॅप तयार! याला ऑफलाइन पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. हा पर्याय तुमच्या फोनवरुन *99# डायल करून वापरता येईल!
याबद्दल अधिक जाणून घ्या मराठीटेकच्या या लेखामध्ये यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?
५. मोबाइल बँकिंग : हा पर्याय बेसिक फोन्स/इंटरनेट नसलेल्या फोन्ससाठी तयार करण्यात आला असून यामध्ये दोन उपपर्याय उपलब्ध आहेत. दोन्ही पर्याय वापरण्यासाठी प्रथम तुमचा फोन क्रमांक बॅंकमध्ये तुमच्या खात्याला जोडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला MMID, यूजरनेम व पासवर्ड दिला जाईल. ज्याद्वारे बँकेच्या निर्देशानुसार IMPS द्वारे खाते क्रमांक आणि IFSC कोडची माहिती SMS द्वारे पाठवून पैसे सहज पाठवता येतात. मोबाइल बँकिंग पद्धतीच वैशिष्य म्हणजे हा पर्याय अगदी कोणत्याही फोनवर ऑफलाइन म्हणजेच इंटरनेट नसताना वापरता येतो!
II. USSD द्वारे (NUUP) : सरकारतर्फे सर्व बँकांना सूचना देऊन *99# एकच क्रमांक निश्चित करण्यात आला असून याद्वारेसुद्धा खात्यातील शिल्लक तपासणे, पैसे पाठवणे हे व्यवहार करता येतात.
याबद्दल अधिक जाणून घ्या मराठीटेकच्या या लेखामध्ये मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे?
६. पॉइंट ऑफ सेल (POS) : ह्या पर्यायामध्ये आपण विक्रेत्याकडे वस्तु खरेदी करतो, त्यानंतर विक्रेता बिलची सांगून रक्कम त्याच्याकडील POS मशीनमध्ये कार्ड टाकून पिन दाबायला सांगतो. ह्यावेळी आपण प्लॅस्टिक मनीमध्ये पाहिलेलेच डेबिट/क्रेडिट कार्डच वापरतो. त्या मशीनमध्ये आपल कार्ड सरकवून (स्वाईप करून) पिन टाकला की आपल्या बँक खात्यामधून रक्कम लगेच विक्रेत्याच्या खात्यात जमा होते. लगेचच एक पावती प्रिंट करून मिळते. ही मशीन्स हल्ली सर्व ठिकाणी पहायला मिळतात जसे की दुकाने, थिएटर, पेट्रोल पंप, इ.
मध्ये नवा प्रकार म्हणजे NFC द्वारे फोन टॅपकरून पैसे जमा करणे (भारतात उपलब्धता खूप कमी).
याबद्दल अधिक जाणून घ्या मराठीटेकच्या या लेखामध्ये POS म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे
७. आधार कार्ड बँकिंग : Aadhaar Enabled Payment System (AEPS).  या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आधी तुमचं आधार कार्ड बँक खात्याला संलग्न करावं लागेल. त्यानंतर ज्या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत तिथे तुमचा आधार क्रमांक टाका व तुमच्या बोटाद्वारे फिंगरप्रिंट द्या लगेच व्यवहार पार पडेल! म्हणजेच आधार कार्डवरील क्रमांक आणि बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचं स्कॅन याद्वारे पैसे ट्रान्सफर, शिल्लक, पैसे काढणे, इ व्यवहार करता येतात. ही व्यवस्था सध्यातरी खूपच कमी ठिकाणी आहे.
कॅशलेस अर्थव्यवस्थेमध्ये घ्यायची काळजी :
• तुमचा पासवर्ड कोणालाही सांगू नका.
• तुमचा पासवर्ड कार्डवर किंवा कोठेही लिहून ठेऊ नका.
• तुमच्या अकाऊंटची माहिती (यूजरनेम/पासवर्ड/OTP/CVV) कोणालाही सांगू नका.
• तुम्हाला दहा लाखाच बक्षीस लागलं आहे, बँकमधून बोलत आहोत आयडी पासवर्ड सांगा वगैरे सांगून फोन करणार्‍यांना काहीही सांगू नका. असे फोन केवळ तुमची फसवणूक करण्यासाठी करण्यात आलेले असतात.
• कार्डचे डिटेल्स कोणत्याही साइटवर Save करू नका.
• ठराविक दिवसानंतर पासवर्ड/पिन बदलत रहा.
• नेटबँकिंग करताना Virtual Keyboard चा वापर करा.
लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे या प्रत्येक पर्यायाबद्दल स्वतंत्र लेख प्रसिद्ध करण्यात आले असून त्यांच्यासाठी लिंक्स खाली दिलेल्या आहेत. हे सर्व लेखसुद्धा नक्की वाचा…
इतर महत्वाचे लेख :
◾ मोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे?
◾ मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे?
◾ यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?
◾ NUUP म्हणजे काय? ऑफलाइन फोन बँकिंग (*99#)
◾ प्लॅस्टिक मनी, POS म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे?
सदर लेखामध्ये काही चूक आढळल्यास लगेच निदर्शनास आणून द्यावी .संपर्क
incoming search terms : cashless economy plastic money e wallet mobile smartphone POS credit debit cards banking
The post कॅशलेस अर्थव्यवस्था आणि नवे पर्याय ! appeared first on MarathiTech - मराठीटेक.