MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 4, 2016
in HowTo, खास लेख
ADVERTISEMENT
यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI – Unified Payment Interface)

यूपीआय ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामुळे अनेक बँकाच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल अॅप्लिकेशन द्वारे एकत्र आणून सोयिस्कर पैसे पाठवणे, रक्कम भरणे, खरेदी एकाच ठिकाणी एकाच अॅपमध्ये उपलब्ध होते! सोबतच यामध्ये peer to peer रक्कम जमा करण्याची पद्धत ज्यामध्ये सोयीनुसार नियोजित दिवशी आणि गरजेप्रमाणे रक्कम पाठवली जाते.
यूपीआयमधून पैसे पाठवताना लॉगिनची गरज नाही, खातेक्रमांकांची गरज नाही, IFSC ची गरज नाही.
केवळ एका छोट्या यूजरनेम (वापरकर्त्याच नाव) ज्याला यूपीआयमध्ये VPA किंवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस म्हटलं जातं या VPA सहाय्याने कोणालाही अवघ्या काही सेकंदात पैसे पाठवता येतात!

यूपीआयची गरज काय ?
नेटबँकिंगसारख्या पद्धती इंटरनेटवर व्यवहार अधिक सुरक्षित बनवण्यासाठी सादर करण्यात आल्या. पण यावरून पैसे पाठवणे बर्‍यापैकी वेळखाऊ आणि सामन्यांच्या दृष्टीने अवघड आहे. त्यासोबतच बर्‍याच पर्यायांच्या गर्दीने नेमकी कोणती सेवा घ्यायची याविषयीसुद्धा गोंधळ उडतो! म्हणूनच एका सरळसोप्या पद्धतीची सुरुवात केली गेली असून याचं नाव यूपीआय असं आहे. ही पद्धत सर्व दिवशी कोणत्याही सुट्टीविना वापरता येते. आणि यासाठी तुमच्याकडे असलेल्या मोबाइलचा वापर केला जातो!

समजा तुम्ही जवळच्या दुकानामध्ये गेलात किंवा कोणाला पैसे खात्यावर पाठवायचे असतील तर त्यावेळी पैसे देताना तुम्हाला त्यांच्या खात्याची माहिती मिळवून बँकमध्ये beneficiary जोडावी लागते. त्याला वेळ लागू शकतो तसेच दरवेळी OTP टाका बसावा लागतो. प्लॅस्टिक मनी जसे की क्रेडिट/डेबिट कार्ड वापरताना तुमचा पिन सुरक्षित राहत नाही. मोबाइल वॉलेटला त्या वॉलेटमध्ये रक्कम भरावी लागते. या सर्वावर उपाय म्हणजे यूपीआय यामध्ये थेट बँकमधून व्यवहार होतो.


मोबाइल वॉलेट आणि यूपीआयमधील फरक : पेटीएमसारख्या मोबाइल वॉलेट आणि यूपीआयमधला फरक म्हणजे वॉलेटमध्ये बँकमधून रक्कम भरावी लागते मगच ते वॉलेट वापरता येते. तसेच वापर झाला नाही तर मोबाइल वॉलेटमध्ये पैसे बिनव्याजी तसेच पडून राहतात. मात्र यूपीआयमध्ये थेट बँकखात्यातून व्यवहार केला जातो. त्यामुळे निम्मा वेळ वाचून सहज पैसे पाठवता येतात! यूपीआय एकच्या बँक खात्यामधून सरळ दुसर्‍याच्या खात्यात जमा होतात.  
यूपीआयमुळे मोबाइल वॉलेट लगेच बंद होतील अशी परिस्थिती सध्या नसली तर भविष्यात यूपीआयचा वापर वाढीस लागून मोबाइल वॉलेटमध्येच यूपीआयचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे!

यूपीआयचे उपयोग :
सध्या यूपीआयद्वारे ती सर्व कामे करता येतात जी नेटबँकिंगने करता येतात! (पैसे पाठवणे, पैसे स्वीकारणे, रीचार्ज, बिल भरणा, तिकीट आरक्षण,खरेदी,इ.)
सध्या मोबाइल वॉलेट प्रसिद्ध असले तरी यूपीआयमधील सोपेपणा लक्षात येताच याचा वापर नजीकच्या काळात नक्कीच वाढेल आणि इतर ठिकाणी जसे की टॅक्सी, कॅब, रिक्षा अशा ठिकाणी सुद्धा यूपीआयचा वापर होईल.

यूपीआय कसे वापरायचे ?
I. मोबाइल अॅप (ऑनलाइन – इंटरनेट असताना)
II. USSD (ऑफलाइन-इंटरनेट शिवाय)

I. यूपीआय मोबाइल अॅप : यासाठी तुम्ही अॅप स्टोअरवर जाऊन तुमच्या बँकचं नाव टाकून पुढे UPI लिहा आणि सर्च करा. तुम्हाला बँकचं UPI अॅप दिसेल. उदा SBI UPI, Axis UPI, ICICI UPI, PhonePe, Google Tez इ. जवळपास सर्वच प्रमुख बँकांनी UPI अॅप्स सादर केली आहेत. याऐवजी फ्लिपकार्ट तर्फे सादर केलेलं PhonePe फोनपे हे अॅपसुद्धा वापरू शकता. जवळपास 25 हून अधिक यूपीआय अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. सर्वच अॅप सारखच काम करणार आहेत आणि यातलं कोणताही अॅप घेतलं तरी ते सर्वच बँक खाते धारकांना चालणार आहे!

“फोनपे” वापरण्याची पद्धत खाली दाखवली आहे. इतर अॅप्ससुद्धा थोड्याफार बदलाने असेच काम करतील.

टीप : ह्यास स्टेप्स मोठ्या वाटत असल्या तरी अजिबात अवघड नाहीत. स्पष्टता यावी म्हणून अधिक विश्लेषण केलं आहे. खरेतर या सर्व पायर्‍यांसाठी केवळ  पाच मिनिटाहून कमी कालावधी लागतो!  

१. सर्वात आधी PhonePe अॅप डाऊनलोड करा.
२. यानंतर तुमचा फोन क्रमांक टाका आणि verify करा. लक्षात ठेवा हा फोन क्रमांक तुमच्या बँकला जोडलेलाच असायला हवा आणि हाच कायम वापरला जाईल! Verify वर टॅप करताच SMS द्वारे OTP मिळेल. तो टाका आणि Verify करा.
३. यानंतर काही प्राथमिक माहिती जसे की तुमचं नाव, ईमेल आयडी विचारल जाईल तो टाका आणि नंतर एक चार अंकी पिन सेट करा. लक्षात ठेवा हाच पिन तुम्हाला दरवेळी वापरावा लागणार आहे. त्यामुळं काळजीपूर्वक पिन निवडा. I Accept वर टिक करा आणि Activate Account वर टॅप करा.
४. यानंतर तुमचा VPA निवडा. तुमचं नावच असलं पाहीजे असं नाही. तुमच्या मनाप्रमाणे लक्षात ठेवता येईल असे नाव निवडा. उदा. [email protected], [email protected]  नाव टाकल्यानंतर Create New VPA वर टॅप करा.
(लक्षात ठेवा हे नावच पुढे तुमच्या व्यवहारांसाठी वापरले जाणार आहे!)
 VPA [email protected] अशाच स्वरुपात असतील हे case sensitive नाहीत म्हणजे [email protected] व [email protected] एकच!
४. यानंतर तुम्हाला तुमची बँक निवडायला सांगितलं जाईल. आणि तुम्ही योग्य ती बँक निवडताच लगेच तुमचं अकाऊंट तयार होईल. जर तुमच्याकडे MPIN नसेल तर नवा तयार करा व SET PIN वर टॅप करा.
अन्यथा RESET MPIN निवडून जुना MPIN बदलून नवा लावता येईल.
(काही जणांना दरम्यान तुमच्या कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारले जातील व पिन विचारला जाईल. जर आधी MMID वापरला असेल वगैरे कारणास्तव, जे काही विचारले जाईल ते टाकत जा)
५. यानंतर तुम्हाला फोनपे सुरू झालेल दिसेल. आता तुम्ही कधी केव्हाही व्यवहार करू शकता!

वरील स्टेप्स थोडक्यात सांगायच्या तर अॅप डाऊनलोड करा, फोन क्रमांक टाका, फोनपेसाठी पिन, MPIN सेट करा झाल अकाऊंट तयार.
व्यवहार करताना चार अंकी फोनपे पिन आणि सहा अंकी MPIN यांची गरज पडते.

मराठीटेकचा यूपीआयबद्दल यूट्यूब व्हिडिओ नक्की पहा यूपीआय UPI Payment कसे वापरायचे?

यूपीआयद्वारे पैसे कसे पाठवायचे ?
वरील प्रमाणे यूपीआय अॅप इंस्टॉल करा आणि नंतर पुढे जा
१. आता Transfer Money खालील Send पर्याय निवडा.
२. आता तुम्हाला Contacts, VPAs, Bank Accounts असे तीन पर्याय दिसतील.
३. तुम्ही कसे पैसे पाठवणार आहात त्यानुसार पर्याय निवडा आम्ही उदाहरणार्थ VPA निवडत आहोत.
४. आता Add VPA वर क्लिक करून Beneficiary VPA मध्ये ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा VPA टाका व नंतर Verify वर क्लिक करा. त्यांचं नाव खाली आपोआप दिसेल! आता Confirm वर टॅप करा
५. आता किती रक्कम पाठवायची आहे ते टाइप करा व Send वर टॅप करा.
६. शेवटी तुम्हाला खात्री करण्यासाठी MPIN विचारला जाईल व लगेच पैसे ट्रान्सफर सुद्धा होतील!

वरील स्टेप्स थोडक्यात सांगायच्या तर पैसे पाठवताना अॅप उघडा > Phone Number & PhonePe पिन टाका > Send > VPA टाका Verify करा > रक्कम टाका > MPIN टाका > झाले पैसे ट्रान्सफर !!!

याचप्रमाणे तुम्ही रीचार्ज, खरेदी, बिल भरणा करू शकता! तुमच्या बँक खात्यामधील शिल्लक सुद्धा तुम्ही लगेच ह्या अॅप मध्येच तपासता येते!
पैसे स्वीकारण्यासाठी Request हा पर्याय निवडा. व ज्यांच्याकडून पैसे हवे आहेत त्याचा VPA निवडा. त्यांना तसा मेसेज जातो व ते लगेच तुम्हाला पैसे पाठवू शकतात!

यूपीआय वापरासाठी काही बँकच्या नियमांनुसार आधी एकदा बँक मध्ये तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवायला हवा. ज्यानंतर तुम्हाला MMID मिळेल. अधिक माहितीसाठी लेखाच्या संदर्भ घ्या : NCPI Registration Process
रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया केवळ एकदा करावी लागेल जी नवं कार्ड घेण्यासारखी किंवा नेटबँकिंग सुरू करण्यासाखीच आहे. याद्वारे तुम्हाला userid व mpin पुरवला जाईल. याबद्दल तुम्ही तुमच्या बँक शाखेमध्ये चौकशी करा आणि USER ID व MPIN मिळवा!

II. यूपीआय साठी ऑफलाइन पद्धत म्हणजे USSD द्वारे व्यवहार :
यूपीआयद्वारे ऑफलाइन व्यवहार NUUP (National Unified USSD Platform) म्हणता येईल.
USSD म्हणजे आपण बॅलन्स तपासण्यासाठी जसे *121# सारखे क्रमांक डायल करतो तेच.
USSD – Unstructured Supplementary Service Data
आरबीआयने सर्व बँक खातेधारकांसाठी एकच क्रमांक सादर केला असून तो *99# असा आहे.
यामध्ये सुद्धा MMID व MPIN ची गरज पडते.
पैसे पाठवताना तीन पर्याय उपलब्ध
a. MMID द्वारे : ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा मोबाइल क्रमांक व MMID लागतो.
b. खाते क्रमांकद्वारे : यामध्ये अकाऊंट नंबर, IFSC लागतो.
c. आधार क्रमांकाद्वारे : जर आधार कार्ड बॅंकला जोडले असेल तर हा पर्याय वापरता येतो.

बाकी यामध्ये अॅप इतक्या सोयी नसल्या तरी या पद्धतीच वैशिष्ट्य म्हणजे हे अगदी साध्या फीचर फोन पासून स्मार्टफोन पर्यन्त सर्वच फोनमध्ये चालतं. तेसुद्धा इंटरनेट शिवाय! त्यामुळं याचा उपयोग अनेकांना होऊ शकतो!
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संदर्भ NUUP Product Overview

भीम अॅप : आता सरकारतर्फे नवं अॅप भीम सादर करण्यात आलं असून यामधून सुद्धा यूपीआय द्वारेच व्यवहार केले जातात. याविषयी मराठीटेकचा व्हिडिओ नक्की पहा.
Bhim – Bharat Interface for Moneyडाऊनलोड लिंक : Bhim App on Google Play
व्हिडिओ लिंक : भीम अॅप कसे वापरायचे ?

गूगल तेझ अॅप : आता गूगलने सुद्धा यूपीआय अॅप सादर केलं असून सोपं व अधिक सोयी, सुरक्षित असं यूपीआय अॅप आहे. Tez UPI app by Google
 
इतर महत्वाचे लेख
 :

◾ कॅशलेस अर्थव्यवस्था आणि नवे पर्याय !

◾ मोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे?
◾ मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे? 
◾ प्लॅस्टिक मनी, POS म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे?
Tags: BankingNUUPPaymentsUPIUSSD
Share1TweetSend
Previous Post

प्लॅस्टिक मनी म्हणजे काय

Next Post

₹५०० व ₹१००० च्या नोटा चलनातून बंद : कारणे आणि परिणाम

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

UPI 123Pay Offline

UPI आता फीचर फोन्सवरही उपलब्ध : इंटरनेटशिवाय पैसे पाठवा : UPI123Pay

March 8, 2022
eRUPI

e-RUPI सादर : कॅशलेस पेमेंटसाठी नवा एसएमएस व्हाऊचर पर्याय!

August 2, 2021
Paytm Smart POS SoundBox 2.0

पेटीएमद्वारे फोनलाच बनवा स्मार्ट POS मशीन : SoundBox 2.0 सादर!

March 10, 2021
व्हॉट्सॲप पेमेंट्स आता उपलब्ध : UPI मार्फत व्हॉट्सॲपवरूनच पाठवा पैसे!

व्हॉट्सॲप पेमेंट्स आता उपलब्ध : UPI मार्फत व्हॉट्सॲपवरूनच पाठवा पैसे!

December 20, 2020
Next Post
₹५०० व ₹१००० च्या नोटा चलनातून बंद : कारणे आणि परिणाम

₹५०० व ₹१००० च्या नोटा चलनातून बंद : कारणे आणि परिणाम

Comments 8

  1. Android Leo says:
    6 years ago

    UPI is a best app for cashless economy

    Reply
  2. Ashok says:
    3 years ago

    नमस्कार
    आपण मराठीमध्ये खूप छान माहिती दिली आहे
    धन्यवाद

    Reply
    • Sooraj Bagal says:
      3 years ago

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.

      Reply
  3. Gayatri says:
    3 years ago

    Nice information and very simple language

    Reply
  4. Mahesh salve says:
    3 years ago

    Sir, upi ki paise hastantar ki karyapadhti kya ap bata sakte ho?

    Reply
    • Sooraj Bagal says:
      3 years ago

      We don’t have support in Hindi language. If you can speak in Marathi, Go ahead and ask your query again (in Marathi) by typing it in comment box

      Reply
  5. Vishal says:
    2 years ago

    Eka blog pasun kiti earning hote tumch ?
    Lagech paise miltat ka?
    Kiti views la kiti paise miltat?
    ……please replay kara

    Reply
  6. Dakshats Gopal says:
    2 years ago

    Khup mhahttvachi mahiti dilit Thank you so much

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
Amazon Prime Day India

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

July 22, 2022
Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!