मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे?

मोबाइल बँकिंग हा व्यवहार करण्याचा नवा मार्ग असून यामुळे रोख रक्कम जवळ बाळगण्याची किंवा साध्या कामासाठी बँकेमध्ये फेर्‍या मारण्याची गरज उरणार नाही. आता ही सुविधा जवळपास प्रत्येक प्रमुख बंकेमध्ये उपलब्ध असून मोबाइल अॅप्सद्वारे, एसएमएस द्वारे किंवा USSD द्वारेसुद्धा बँकिंगसाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत. याबद्दल आपण एसबीआय एसएमएस बँकिंगची प्रक्रिया पाहूया...

मोबाइल एसएमएस बँकिंगसाठी नोंदणीची प्रक्रिया :
१. प्रथम खालील प्रमाणे एक SMS तुमच्या फोनवरून पाठवायचा आहे.
<MBSREG>  हा एसएमएस 9223440000 या क्रमांकावर पाठवा. तुम्हाला एक एसएमएस येईल ज्यामध्ये एक यूजरआयडी व एमपीन दिलेला असेल.
२. आता सर्वात आधी तो आलेला एमपीन (MPIN) बदलावा लागेल.
त्यासाठी SMPIN <user id> <old  pin> <new pin>  असा मेसेज 9223440000 या क्रमांकावर पाठवा.
उदा. जर तुमचा userid abc123 व mpin 654987 असेल आणि तुम्हाला नवा mpin 654321 असा लावायचा आहे तर खालीलप्रमाणे पाठवावा लागेल...
SMPIN abc123 654987 654321
३. यानंतर खात्री करण्यासाठी SACCEPT <user id> <new pin> हा मेसेज 9223440000 या क्रमांकावर पाठवा.
उदा.  SACCEPT abc123 654321
४. हा मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला पिन बदलल्याचा मेसेज येईल. त्यामध्येच पुढील नोंदणीची कृती ATM मध्ये जाऊन करायची आहे. यासाठी तुमचा मोबाइल व एटीएम कार्ड घेऊन जवळच्या एटीएम केंद्रावर जा.
आता ह्याला तीन पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला सोयिस्कर वाटणारा पर्याय निवडा.
a. एटीएममध्ये जाऊन
b. नेटबँकिंगद्वारे ऑनलाइन वेबसाइटद्वारे
c. बँकेच्या शाखेमध्ये जाऊन
 
आम्ही पर्याय a उदारहरणादाखल देत आहोत.
५. आता एटीएम मशीनमध्ये नेहमीप्रमाणे कार्ड टाका, एटीएम पिन टाका.
६. आता मोबाइल बँकिंग (Mobile Banking) हा पर्याय निवडा
७. आता Registration हा पर्याय निवडा. आता तुमचा मोबाइल क्रमांक टाका
८. मोबाइल बँकिंगसाठी नोंदणी झाल्याचा एसएमएस बँकतर्फे मिळेल!

ही प्रक्रिया स्टेट बँक ऑफ इंडियासाठी असून इतर बँकांनी सुद्धा ही सुविधा उपलब्ध केली असून तुम्ही त्या त्या बँकबद्दल माहिती त्यांच्या वेबसाइटवर सहज पाहू शकता. जसे की axis बँकसाठी axis bank sms banking असा गूगल सर्च करा.
ह्याच सेवा SBI Freedom सारख्या अॅप्सद्वारे सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजेच पर्याय अनेक उपलब्ध आहेत. आपण आपल्या सोयीनुसार कोणत्याही मार्गाने व्यवहार करू शकतो.

इतर महत्वाचे लेख :
◾ कॅशलेस अर्थव्यवस्था आणि नवे पर्याय !
मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे? मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे? Reviewed by Sooraj Bagal on December 04, 2016 Rating: 5

1 comment:

  1. For һottest information you have to рay a quick visit thе web and on internet I found this web page aѕ a
    finest web sitе for most up-to-date updates.
    More Help : How To Lock Filеs From Scratch

    ReplyDelete

Powered by Blogger.