Tag: Fonts

फॉण्ट्सची गंमत

कम्प्युटरमध्ये टायपिंग करत असताना एरिअल , टाइम्सरोमन फार फार तर कॅम्बरिया आणि  मराठीसाठी मंगल अशा ठराविक फॉण्टच्या पलीकडे आपण कधीच विचार करत नाही . प्रत्यक्षात  कम्प्युटरमध्ये खूप फॉण्ट्स असतात . प्रत्येक फॉण्ट बनवण्यामागचा एक उद्देश असतो . हेफॉण्ट  बनवताना टायपोग्राफर्स त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असतात , त्यात आपल्या भावना उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो . वर्षाला असे शेकडो फॉण्ट्स बाजारात येत असतात . सुंदर अक्षर ज्याप्रमाणे आपले लक्ष वेधून घेते त्याप्रमाणेच सुंदर फॉण्टही आपले लक्ष वेधून घेत असतो . यामुळे  टेक जगतात फॉण्टला विशेष महत्त्व आहे . सरत्या वर्षात बाजारात आलेल्या वेबवर तसेच मोबाइलवर वापरता येतील अशा काही बेस्टफॉण्ट्स विषयी ...  नोटीसीआ  हा फॉण्ट कॉम्पटीबल टाइपचा आहे . टॅबलेटच्या स्क्रीनवर कोणतीही गोष्ट वाचताना सुसह्य  व्हावी यादृष्टीने हा फॉण्ट तयार करण्यात आला आहे . या फॉण्टमध्ये वळदार अक्षरे चांगल्या  प्रकारे दिसतात . यामुळे हा फॉण्ट्सला अनेकांनी पसंती दर्शविली आहे . या फॉण्टमधील  वळणदारपणामुळे नेहमीच्या मोठ्या फॉण्टला पर्याय मिळणार आहे , असे फॉण्ट बनवणाऱ्यांचे  म्हणणे आहे . यात फॉण्टचे चार प्रकार असतील . हे फॉण्ट गुगल वेब फॉण्टमध्येउपलब्ध  आहेत . हे चारही फॉण्ट्स मोफत उपलब्ध आहेत .  बॅरिओल  विविध वेबसाइट्स आणि विविध अॅप्समध्ये दिसणारा गोलाकार फॉण्ट हा बॅरिओल फॉण्ट आहे  . हा फॉण्ट रेग्युलर आणि इटॅलिक अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे . गोलाकार अक्षरांमुळे  कोणतीही मोठी गोष्ट छोट्या जागेत सेट करता येणे शक्य होत आहे . कोणत्याही वेबसाइटच्या  मोबाइल आणि टॅबलेट व्हर्जनमध्ये मोठे फॉण्ट वापरले की , अनेकदा आपल्याला त्या गोष्टी  वाचण्यासाठी स्क्रोल करावे लागते . या त्रास या फॉण्टमुळे कमी होतो आणि छोट्या स्क्रीनवरही  फॉण्ट तितकाच चांगला दिसतो , असे फॉण्ट क्रिएटरने स्पष्ट केले आहे .  ...

ADVERTISEMENT
error: Content is protected!