MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

वीज बिल भरा आता इंटरनेटने

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 27, 2012
in HowTo, News
वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना आता रांगेत उभे राहण्याची झंझट उरणार नाही, किंवा कार्यालय बंद झाले म्हणून उद्यावर बिल भरणा ढकलता येणार नाही. कारण,  लघुदाब वीज ग्राहकांसाठी इंटरनेटवरून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या किंवा सायबर कॅफेतून बिल भरता येईल. 

वीज कंपनीतर्फे ग्राहकांना दरमहा बिल देण्यात येते. बिल प्राप्त झाल्यावर ग्राहकांना ते वीज कंपनीच्या विविध भरणा केंद्रात स्वतः जाऊन भरावे लागते. तेथे काही वेळेस गर्दी असल्यास रांगेत ताटकळावे लागते. ग्राहकांचा वेळ वाया जातो. ही बाब लक्षात घेऊन आता वीज कंपनीतर्फे माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहक सेवेत सुधारणा करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व लघुदाब वीज ग्राहकांना बिले इंटरनेटवरून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व नेट बॅंकेने भरता येतील. महावितरण कंपनीने एचडीएफसी बॅंकेच्या साहाय्याने स्वतःची पेमेंट गेटवे सुविधा सुरू केली आहे.

कसे भराल बिल
इंटरनेटच्या माध्यमातून वीजबिल भरण्यासाठी महावितरणाच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जाऊन ग्राहक आपले बिल पाहू शकतात. बिलावर उपलब्ध असलेला ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट क्रमांक टाकून इंटरनेटद्वारे बिल कसे भरावे याची कार्यपद्धती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा आतापर्यंत एकूण 94 ग्राहकांनी लाभ घेतला आहे. याशिवाय या सुविधेच्या संदर्भात अधिक माहिती व तक्रारीसाठी महावितरण कंपनीने मुंबईतील प्रकाशगड मुख्य कार्यालयात एक विशेष सहाय्यता केंद्र सुरू केले आहे. या ग्राहक केंद्राशी [email protected] या इ-मेलवर संपर्क करू शकतात. 
ADVERTISEMENT
Tags: BillsElectricityInternetOnlinePayments
ShareTweetSend
Previous Post

पाणीपुरवठा तक्रार निवारण ‘इंटरनेट’वरून

Next Post

भारतीय बाजारपेठेत अद्ययावत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८००

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

आता गूगल पे SoundPod उपलब्ध : UPI पेमेंट अलर्ट्ससाठी नवा पर्याय!

आता गूगल पे SoundPod उपलब्ध : UPI पेमेंट अलर्ट्ससाठी नवा पर्याय!

February 23, 2024
आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Google Chrome Ver 100

गूगल क्रोमची १०० वी आवृत्ती नव्या लोगोसह उपलब्ध!

March 30, 2022
Next Post

भारतीय बाजारपेठेत अद्ययावत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८००

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech