MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

स्मार्टफोन होणार ऑल इन वन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 14, 2013
in स्मार्टफोन्स
web.jpgइंटरनेट , मोबाइल संवादाच्या क्षेत्रात प्रगती होण्याबरोबरच संबंधित क्षेत्रांमधील तांत्रिक बाबींमध्ये लक्षणीयरित्या बदल झाला . कम्प्युटर , इंटरनेट क्षेत्रात मिनिटामिनिटाला अपडेट्स येत असतात . मोबाइल , स्मार्टफोनमध्येही सतत नवी व्हर्जन्स येत असतात . त्यातील तंत्रज्ञान आणि इतर फिचर्स अपडेट होताना कॅमेरा मात्र तितकासा प्रगत नव्हता .आता ही कमतरता दूर होणार असल्याने स्मार्टफोनला ‘ ऑल इन वन ‘ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . 

मोबाइल अथवा स्मार्टफोनमधील कॅमेरा ही कल्पना काही नवीन नाही . मात्र , या नव्या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यात फ्रेममधील कुठल्याही ऑब्जेक्टवर फोकस करता येणार आहे .त्यामुळे फोटोमधील एखादी ठराविक वस्तू स्पष्ट बघता येणारआहे . असा कॅमेरा येत्या काही वर्षांत तयार केला जाणार आहे. 

या क्षेत्रातील नवनवे शोध पाहिले , की मल्टिपरपझ तंत्रज्ञान बनवण्याकडे कंपन्यांचा ट्रेंड आहे , असे जाणवते .त्यातल्या त्यात स्मार्टफोनसारख्या तंत्रज्ञानाचा विचार केला , तर या एका स्मार्टफोनमध्येच इंटरनेट , फोन करण्याची सुविधा , फोटो काढण्याची सुविधा तयार आहे . जेणेकरून डेस्कटॉप कम्प्युटर , लॅपटॉप आदी बाबींना ‘चालता – बोलता ‘ पर्याय तयार होईल . आता नव्याने सांगितलेल्या या कॅमेऱ्याच्या पर्यायामुळे अत्याधुनिक कॅमेऱ्यांनाही कदाचित पर्याय तयार होईल . 

तोशिबा कंपनी या कॅमेऱ्यावर काम करत आहे . या कॅमेऱ्यासाठी पाच लाख छोट्या लेन्सेसचा वापर कंपनी करणार आहे . हा कॅमेरा केवळ स्मार्टफोनसाठी नसेल , तर टॅब्लेटमध्येही वापरता येणार आहे . वेगवेगळ्या ‘ फोकल लेन्थ ‘ने या लेन्सेस ‘ फिल्ड ऑफ व्ह्यू ‘ कॅप्चर करतील . यामुळे फोटोग्राफरना फोटोमध्ये नेमके कुठे फोकस करायचे , हे ठरवता येईल . एका किड्याच्या डोळ्याप्रमाणे या लेन्सची रचना तयार करण्यात आली आहे . ‘ कम्पाउंड लेन्स ‘त्यामध्ये बसवण्यात आल्या आहेत . या वर्षाअखेरीला व्यावसायिक स्तरावर स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या उत्पादनाला सुरुवात होईल . 

पाच वर्षांपूर्वी ‘ आयफोन ‘ च्या निर्मितीनंतर डिजिटल कॅमेऱ्यांच्या विक्रीत घट झाली होती . ‘ लिट्रो ‘ कंपनीकडून अशीच सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे . डिजिटल कॅमेऱ्याला तोडीस तोड सुविधा स्मार्टफोनमध्ये निघाल्यामुळे डिजिटल कॅमेऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे . 

ADVERTISEMENT
Tags: CamerasSmartphonesToshiba
ShareTweetSend
Previous Post

शॉपिंग ‘ऑन’लाइन

Next Post

असा वापरा अँड्रॉइड फोन

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post

असा वापरा अँड्रॉइड फोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech