MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

ब्रिटिश फेसबुकला कंटाळले!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 23, 2013
in Social Media
ADVERTISEMENT

FBकुठल्याही गोष्टीचा एक काळ असतो. त्यानंतर सर्वच जण त्याला कंटाळतात.तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर ही वेळ फारच लवकर येते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी लाँच झालेला मोबाइल आज ‘ आऊट ऑफ प्रोडक्शन ‘ असतो. सोशल नेटवर्किंगच्या बाबतीतही वेगळी परिस्थिती नाही. एकेकाळी जोमात असलेल्या ऑर्कुटला आज कुणी विचारेनासं झालंय. फेसबुकवरही लवकरच ती वेळ येणार असं दिसू लागलंय. गेल्या महिन्यात तब्बल ९ लाख ब्रिटिश नागरिकांनी फेसबुकला भेट देणं सोडलं. मेक्सिको , इंडोनेशियामध्येही हाच ट्रेंड दिसून आला. त्यामुळे भविष्यात फेसबुकचंही ऑर्कुट होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

सोशलबेकर या अमेरिकन वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सध्या सुमारे फेसबुकचे ६ कोटी २७ लाख युझर्स असून , एकूण लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचे प्रमाण केवळ ५.३५ टक्के आहे. त्या तुलनेत अमेरिका (५३.९७ टक्के) , ब्रिटन (५२.६५ टक्के) , तुर्कस्तान (४१.५९ टक्के) , मेक्सिको (३५.५१ टक्के) या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात फेसबुक युझर्स जास्त आहेत. सर्वाधिक युझर्सचा विचार करता अमेरिका (१६ कोटी ७४ लाख) आघाडीवर असून त्या पाठोपाठ ब्राझिल (६ कोटी ५२ लाख) आणि भारत यांचा क्रमांक लागतो. याच ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे डिसेंबरअखेर ब्रिटनमध्ये फेसबुकचे ३ कोटी २८ लाख युझर्स होते. गेल्या महिन्यात त्यातील ९ लाख ४६ हजार युझर्स कमी झाले. नोव्हेंबरच्या तुलनेत त्यांची संख्या २.८८ टक्क्यांनी कमी झाली. तर अमेरिकेत ०.६९ टक्के आणि इंडोनेशियामध्ये ०.६१ टक्के युझर्स घटले. त्याचवेळी ब्राझिलमध्ये ३.१८ टक्के तर भारतात २.४७ टक्के आणि तुर्कस्तानमध्ये ०.९८ टक्के युझर्स वाढले. सोशलबेकर्सचे सीईओ जन रेझाब यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटनमधील १५ टक्के नागरिक १३ वर्षाखालील आहेत. मात्र त्यांना फेसबुक लॉग-इन करण्याची परवानगी नाही. तसेच ६५ पेक्षा अधिक वय असणारे साडेसोळा टक्के नागरिक असून , त्यातील केवळ ४ टक्के व्यक्ती फेसबुकचा वापर करतात.

युझर्सची संख्या कमी होण्यामागे फेसबुकवरील माहितीच्या प्रायव्हसीसंदर्भात असलेला गोंधळ किंवा फेसबुकचा आलेला कंटाळा या गोष्टीदेखील असतील अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी मात्र ही बाब फेटाळलेली आहे. ठराविक कालावधीनंतर अशा बातम्या येतच असतात. जाहिरातींसाठी दिलेल्या माहितीमधून ही माहिती घेतलेली असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. यामध्ये किती व्यक्तींपर्यंत जाहिराती पोहोचतात अशी माहिती दिली जाते. मात्र यावरून फेसबुकच्या युझर्समध्ये किती वाढ झाली हे निश्चित सांगता येणार नाही असेही ते म्हणाले. फेसबुक लवकरच एक नवे उत्पादन जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी प्रसिद्ध झाल्याने तातडीने फेसबुकने हा खुलासा केला. 

Tags: FacebookOrkut
ShareTweetSend
Previous Post

‘फेसबुक’ची नवी ‘सर्च क्रांती’

Next Post

सुरक्षा ‘अॅप’ल्याच हाती…महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Faceeook Reels Earn Money

Reels आता फेसबुकवरही उपलब्ध : पैसेसुद्धा कमावता येणार!

February 23, 2022
Next Post

सुरक्षा 'अॅप'ल्याच हाती...महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech