MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

सुरक्षा ‘अॅप’ल्याच हाती…महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 24, 2013
in Security, ॲप्स
तरुणींवर होणाऱ्या अत्याचारांच्या विविध घटनांच्या बातम्या सातत्याने येत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जाऊ लागली आहे. समाजातील विविध घटकांबरोबरच टेक्नॉलॉजीनेही महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांनीही ‘ इन केस ऑफ इमरजन्सी ‘ ( आयसीई) नावाचे एक अॅप लाँच केले आहे. अशी ‘ सेव्ह अवर सेल्फ ‘ ( एसओएस) अॅप्स तुम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने मदत करू शकतात. 

……………….. 


महिलांची सुरक्षा हा प्रश्न सध्या खूप नाजूक बनला आहे. यावर विविध स्तरावर उपाययोजना सुरू झाल्या आहेत. पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. असे असले तरी , प्रत्येक ठिकाणी पोलिस असतीलच असे नाही. अशावेळी स्मार्टफोन तुमची मदत करू शकतो. अँड्रॉइड तसेच विविध ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सध्या विविध सुरक्षा अॅप्स उपलब्ध झाले आहेत. यातील काही अॅप्सची ओळख आपण करून घेऊ. 


फाइट बॅक 


हे अॅप खासकरून भारतातील स्त्रियांच्या सुरक्षेसाठी बनवले आहे. तुम्ही धोक्यात असताना हे अॅप जीपीएस ,एसएमएस , लोकेशन मॅप , जीपीआरएस , तसेच तुमच्या इमेल व फेसबुकद्वारे तुमच्या नातलगांना कळविते. यात पाच महत्त्वाचे नंबर अॅड करता येतात आणि ‘ पॅनिक ‘ चे बटन दाबताच त्या नंबरवर अलर्ट जातो यात तुमचे अचूक लोकेशनही त्यांना मिळते. महत्त्वाचे म्हणजे , हे अॅप फेसबुकवर त्या युजरच्या वॉलवरही मेसेज पोस्ट करते. त्यावर क्लिक करणाऱ्या तुमच्या मित्रालाही तुमचे अचूक लोकेशन समजणार आहे. या अॅपसाठी तुम्हाला फेसबुक स्टेटस नको असल्यास सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही हा पर्याय बंद करू शकता. 
* अॅप कुठे उपलब्ध 
अँड्रॉइड , ब्लॅकबेरी व नोकिया स्मार्टफोनवर 
युजर www.fightbackmoblie.com यावरून हे अॅप डाऊनलोड करू शकतात 
…. 
लाइफ ३६० फॅमिली लोकेटर 
हे अॅपदेखील जीपीएस तंत्रज्ञानावर चालते. याद्वारे तुम्ही तुमच्या घरातील लोकांना कायम कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. एसएमएस पाठवण्यासोबतच अनेक फिसर्चसचाही यात समावेश आहे. तुम्ही नेहमी फिरायला जाता ती ठिकाणे यात सेव्ह होतात. यामुळे तुमच्या घरातील व्यक्ती सध्या कोणत्या लोकेशनवर आहे. तो घरात आहे की ,नाही या संदर्भातील सर्व माहिती त्यांना मिळू शकते. यासंदर्भातील अॅलर्टस् वेळोवेळी घरातील इतर लोकांना मिळत असतात. 
अॅप कुठे उपलब्ध ? 
अँड्रॉइड , ब्लॅकबेरी व आयओएसवर… सर्व जावा एनेबल्ड फोनवर 
….. 
व्हीसल 
नावाप्रमाणेच हे अॅप व्हीसलसारखे काम करते. हे अॅप वापरण्यास अगदी सोपे आहे. संकटकाळात असताना फक्त या अॅपवर टॅप करायचे. आपण टॅप करताच फोनमधून जोरात व्हीसलचा आवाज सुरू होतो. तुमचा फोन सायलेंट मोडवर असेल तरीही हा आवाज ऐकू येतो. यामुळे संकटात असताना आजूबाजूने येणाऱ्यांचे लक्ष सहज वेधले जाईल. यासाठी तुम्हाला कोणत्याही डेटा कनेक्शन अथवा जीपीएसची गरज नाही. हा आवाज ऑन करण्यासाठी फक्त टॅप करायचे मग आवाज येण्यास सुरुवात होते. 
अॅप कुठे उपलब्ध ? सर्व जावा एनेबल्ड फोनवर… अॅडरॉइडवर उपलब्ध… 
… 
बी सेफ 
हे एक जीपीएसवर चालणारे अलार्म अॅप आहे. याद्वारे संकटकाळी तुम्ही यात अगोदर फीड केलेल्या नंबर्सवर अलर्ट जातात. तुम्ही यात तुम्हाला हवे तितके नंबर अॅड करू शकता. यात मोठे लाल रंगाचे ‘ एसओएस ‘ बटन असते. त्यावर फक्त टॅप करायचे आणि तुम्ही निवडलेल्या नंबरवर अॅलर्ट जातो. या अॅपची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ,यात रियल टाइम जीपीएस असावे ज्याद्वारे तुमचा मित्र परिवार तुमचे अचूक लोकशन मिळवू शकतात व तुम्हाला फॉलो करू शकतात. 
अॅप कुठे उपलब्ध 
अँडरॉइड , आयओएस , ब्लॅकबेरी फोन्स आणि टॅबलेटवर 
…… 
आयसीई 
सध्या तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. अशा तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग करता आला तरच आपण विकसित झालो असे म्हणता येईल. स्वतःच्या सुरक्षेसाठी असलेल्या हे एसओएस अॅप खरोखर उपयुक्त आहेत असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. स्मार्टफोनवर वापरता येणारे ‘ इन केस ऑफ इमरजन्सी ‘ ( आयसीई) हे अॅप मुंबई पोलिसांनी तयार केले आहे. यात चोरी , अपघात , दहशतवादी हल्ले , आग , ट्रेन अपघात आदींबद्दलही माहिती आपल्याला थेट पोलिसांना कळवता येते. याचे वैशिष्ट्य म्हणजे तुमचा अॅलर्ट सरळ पोलिसांकडे जातो. आपण ज्या विभागात असू त्या विभागातील पोलिस स्टेशन्स तसेच पोलिस व्हॅन्समध्ये या अॅपचा अॅलर्ट पोहचू शकतो. जेणेकरून तुमच्या आसपास असलेली पोलिस व्हॅन तुमच्यापर्यंत पोहचू शकते. 
अॅप कुठे उपलब्ध 
सध्या अँड्रॉइडवर , पण लवकरच सर्व फोन्सवर उपलब्ध होणार. 
………. 
सर्कल ऑफ ६ 
हे अॅप आयओएसवर उपलब्ध आहे. नावाप्रमाणे या अॅपमध्ये तुम्हाला विश्वासू अशा सहा जणांना अॅड करता येते. तुम्ही कोणत्याही संकटात असताना या सर्कलमध्ये तुम्ही आधीच सेव्ह करून ठेवलेला मेसेज व तुमचे लोकेशन त्यांना कळते. २०११मध्ये व्हाइट हाऊस टेक्नॉलॉजी स्पर्धेत याला ‘ बेस्ट अॅप अगेंस्ट अॅब्युज ‘ चे पारितोषिकही मिळालेले आहे. 
अॅप कुठे उपलब्ध 
अँड्रॉइड , ब्लॅकबेरी व नोकिया स्मार्टफोनवर 

>> वैभव राऊळ 

ADVERTISEMENT
Tags: AppsCircle Of 6Fight BackIceLife 360SafetySecurity
ShareTweetSend
Previous Post

ब्रिटिश फेसबुकला कंटाळले!

Next Post

आठवी खिडकी विंडोज ८ ‘ मोबाइल नोकिया ल्युमिया

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post

आठवी खिडकी विंडोज ८ ' मोबाइल नोकिया ल्युमिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech