MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

फेसबुकवरून मोफत कॉल?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 20, 2013
in Social Media
एसएमएसपाठोपाठ फेसबुकने आता मोफत व्हॉइल कॉलिंगचीसुविधाही देण्याची तयारी सुरू केली आहे . सध्या कॅनडातीलस्मार्टफोन युझर्सना ही सुविधा देण्यात येत आहे . फेसबुक मेसेंजर अॅप अपडेट केलेल्यांना या माध्यमातून व्हॉइसओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल ( व्हीओआयपी ) सुविधा देण्यात येत आहे . 


फेसबुकने तीन जानेवारीपासून अपडेट केलेल्या मेसेंजर अॅपच्या माध्यमातून जगभरातील युझर्सना व्हॉइस मेसेजपाठविण्याची सुविधा देऊ केली आहे . या माध्यमातून व्हाइस मेसेज पाठविण्यासाठी + बटन प्रेस केल्यानंतरव्हॉइस मेसेज पाठविण्याची सुविधा सुरू होते . यात रेकॉर्ड बटन प्रेस ठेवल्यापासून रेकॉर्डिंग सुरू होते व त्याबटनावरून हात बाजूला केल्यास रेकॉर्डिंग बंद होते आणि मेसेज पाठवला जातो . बोट स्लाइड केल्यानंतर मेसेजरद्द करता येतो . याचबरोबर कंपनीने इंटरनेटवरून मोफत व्हॉइस कॉल देण्याचीही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीनेपावले टाकायला सुरुवात केली आहे . सध्या कॅनडातील आयफोन युझर्सवर या सुविधेची चाचणी घेण्यात येत आहे. त्यात अॅपवरील ‘ आय ‘ प्रेस केल्यावर फ्री कॉलचा पर्याय निवडता येतो . फेसबुक या कॉलसाठी कुठलेही शुल्कघेत नसले , तरी यासाठी युझरच्या डेटा प्लॅनमधील डेटा वापरला जातो . त्यामुळे रूढार्थाने यासाठी कुठलेही शुल्कद्यावे लागत नसले , तरी डेटा मात्र वापरला जातो आहे . 
सध्या सुमारे एक अब्ज ७ लाख फेसबुक युझर्स असून त्यापैकी ६० कोटी यूझर्स मोबाइलवरून फेसबुक वापरतात .त्यातील सुमारे ४७ कोटी लोक अॅपच्या माध्यमातून फेसबुक वापरतात आणि उर्वरित फेसबुकची मोबाइल व्हर्जनवापरतात . सुमारे १४ कोटी आयफोन युझर्स तर साडेचार कोटी आयपॅड युझर्स आयपॅडवरून फेसबुक वापरतात .त्यामुळेच सुरुवातीला कंपनीने त्यांच्यासाठी हे व्हर्जन चाचणीसाठी उपलब्ध करून दिले असावे , असा अंदाज आहे. 


आगामी काळात फेसबुक व्हिडिओ मेसेजिंगची सुविधाही देईल , अशी अपेक्षा आता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करूलागले आहेत . पण पारंपारिक नंबरवरून कॉल करण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करून फेसबुकच्या माध्यमातून कॉलकरण्याच्या नव्या प्रयत्नांसाठी ग्राहकांचे मन वळविणे मात्र कंपनीला कठीण जाईल , अशी शक्यता वर्तवली जातआहे . पण मोफत मिळणारी सुविधा पाहून ग्राहक याकडे आकर्षित होतील . त्यामुळे भविष्यात कुणाचाहीमोबाइलनंबर सेव्ह करण्याची गरज राहणार नाही . थेट फेसबुक फ्रेण्ड्समधून संबंधित व्यक्ती शोधायचा आणि थेटकॉल करायचा . 

ADVERTISEMENT
Tags: CallsFacebookVOIP
ShareTweetSend
Previous Post

वापरा, गुंडाळा, घेऊन जा… टॅब्लेट

Next Post

गुगलच्या भाषांतराचे अजब-गजब !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
जगातल्या पहिल्या सेलफोन कॉलला पन्नास वर्षं पूर्ण!

जगातल्या पहिल्या सेलफोन कॉलला पन्नास वर्षं पूर्ण!

April 3, 2023
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Next Post

गुगलच्या भाषांतराचे अजब-गजब !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech