MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

आठवी खिडकी विंडोज ८ ‘ मोबाइल नोकिया ल्युमिया

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 25, 2013
in स्मार्टफोन्स
डेस्कटॉप , लॅपटॉपमध्ये लोकप्रिय ठरत असलेल्या ‘ विंडोज ८ ‘ ची मोबाइल आवृत्ती नोकियाने बाजारात आणली आहे. नोकिया ल्युमिया ९२० , नोकिया ल्युमिया ८२० आणि नोकिया ल्युमिया ६२० हे तीन फोन नुकतेच लाँच केले आहेत. यातील ल्युमिया ९२० , ल्युमिया ८२० हे बाजारात उपलब्ध झाले असून , ल्युमिया ६२० फेब्रुवारीत बाजारात येणार आहे. कॅमरा आणि वायरेलस चार्जिंग ही या फोन्सची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. फोनमध्ये प्युअरव्ह्यू कॅमेरा असून , विंडोज ८मधील एका अॅपमुळे फोन वायरलेस चार्जिंग करता येऊ शकतो. 

यातील प्युअरव्ह्यू इमेजिंग हे नोकिया ल्युमिया ९२०चे खास वैशिष्ट्य आहे. तर नोकिया ल्युमिया ८२० हा स्टायलिश , मध्यम रेंजचा स्मार्टफोन आहे. छोटा असूनही तो सर्वोत्तम परफॉर्मन्स देतो. ल्युमिया ६२० हा फोन ल्युमियाच्या अत्याधुनिक फोनमधील सुविधा उपलब्ध करून देतो. या लाँचच्या वेळी बोलताना नोकिया इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि व्हाइस प्रेसिडण्ट पी. बालाजी म्हणाले , ‘ किमतीबरोबरच ग्राहकांना उत्तम अनुभव मिळावा यासाठी आम्ही तंत्रज्ञानामध्ये भरपूर गुंतवणूक करीत आहोत. ‘ 

* नोकिया ल्युमिया ९२० 

नोकिया ल्युमिया ९२०मध्ये प्युअरव्ह्यू इमेजिंग हे खास वैशिष्ट्य आहे. अॅडव्हान्स्ड फ्लोटिंग लेन्स टेक्नोलॉजीचा वापर केल्याने हा फोन प्रतिस्पर्धी फोनच्या तुलनेत पाचपट अधिक फ्लॅश देतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचे फोटो आणि व्हीडिओज घेता येतात. यात असलेल्या ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझरमुळे एखाद्या खोलीत किंवा अंधारातही चांगले फोटो घेता येतात. त्याजोडीला नोकिया ल्युमिया ९२० हा पहिला इंटिग्रेटेड वायरलेस चार्जिंग स्मार्टफोन आहे. 

* नोकिया ल्युमिया ८२० 

नोकिया ल्युमिया ८२०चा लूकही युनिबॉडी असून त्यामुळे मिळणारा अनुभव महागड्या ल्युमिया स्मार्टफोनसारखा आहे. याची शेल कव्हर्स बदलता येतात आणि ते आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. याला वायरलेस चार्जिंगची सुविधा वेगळी घ्यावी लागते. याची टचस्क्रीनही अधिक चांगल्या प्रकारची असून , त्याचा सहज वापर करता येऊ शकतो. यातील नोकिया क्लिअरब्लॅक डिस्प्ले तंत्रज्ञानामुळे प्रखर उजेडातही चांगली व्हिजिबिलिटी मिळते. 

* नोकिया ल्युमिया ६२० 

अधिक मजा आणि अधिक तारुण्याने भारलेल्या नोकिया ल्युमिया ६२०मध्ये नवीन ड्युअल शॉट कलर टेक्निक वापरण्यात आली आहे. या टेक्निकमुळे आकर्षक रंग आणि टेक्श्चर इफेक्ट साधता येतो. या फोनसाठी पाच बदलता येण्यासारखे शेल असून , यापैकी ग्राहक कोणतेही निवडू शकतात. नोकिया ल्युमिया ६२०साठी आपल्या आवडीच्या रंगाचे शेल निवडून फोनला आपली पर्सनल स्टाइल देता येईल. एनएफसी सपोर्टमुळे नोकिया ल्युमिया ६२०मध्ये कोणतीही माहिती सहज शेअर करता येते तसंच स्वीकारताही येते. 

नोकिया इंडियाचे विक्री निर्देशक व्ही रामनाथ म्हणाले , ‘ अधिकाधिक ग्राहकांपर्यंत जलद गतीने ल्युमिया अनुभव पोहोचवता यावा यासाठी आम्ही आमच्या भागीदारांबरोबर बोलणी करत आहोत. दोन नव्हे तर तीन उपकरणं एकाच वेळी बाजारात आणल्यामुळे आमच्या ब्रॅण्डची केवळ क्षमताच दिसत नाही तर भारतातल्या आपल्या ग्राहकांप्रती असलेले आमचे ऋणानुबंधही दिसतात. अॅक्सेसरीज आणि पार्टनरशिप्सच्या माध्यमातून घराबाहेर वायरलेस चार्जिंग करणे शक्य होणार आहे. त्यानंतर मेनस्ट्रिमसाठीही आम्ही वायरलेस चार्जिंग आणणार आहोत. या सर्व अभिनव गोष्टींमुळे एक गोष्ट स्पष्ट होते ती आता वेळ आहे नोकियाकडे वळण्याची. ‘ 
किंमत – नोकिया ल्युमिया ९२० – ३८ , १९९ रुपये 
नोकिया ल्युमिया ८२० – २७ , ५५९ रुपये 

ADVERTISEMENT
Tags: LumiaNokiaWindowsWindows 8
ShareTweetSend
Previous Post

सुरक्षा ‘अॅप’ल्याच हाती…महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी

Next Post

टीव्हीचा मेकओव्हर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Crowdstrike BSOD Windows

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!

July 19, 2024
नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

March 1, 2023
Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

September 21, 2022
Windows 11 ISO

विंडोज ११ आजपासून उपलब्ध : पात्र कॉम्प्युटर्सवर अपडेटला सुरुवात!

October 5, 2021
Next Post

टीव्हीचा मेकओव्हर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech