भारतात लॉंच झाला ब्‍लॅकबेरी Z10 स्‍मार्टफोन, नोकियाचे चार नवे हॅन्डसेट

ब्‍लॅकबेरीने अतिशय महत्त्वाकांक्षी स्‍मार्टफोन BB Z10 भारतात लॉंच केला आहे. पूर्णपणे टचस्‍क्रीन यंत्रणेवर आधारीत असलेला हा फोन अमेरिकेपूर्वी भारतात लॉंच करण्‍यास ब्‍लॅकबेरीने पसंती दिली. ब्‍लॅकबेरीने या फोनची किंमत 43490 रुपये ठेवली आहे. ऍपलचा आयफोन आणि सॅमसंगच्‍या गॅलक्‍सी नोट श्रेणीतील स्‍मार्टफोनला हा फोन टक्‍कर देणार आहे.


दुसरीकडे नोकियानेदेखील दोन नविन स्‍मार्टफोन सादर केले. सिम्बियनला बाय बाय केल्‍यानंतर नोकियाने विंडोज मोबाईल प्‍लॅटफॉर्म स्विकारला आहे. त्‍यावर आधारीत ल्‍यूमिया 720 अ‍ाणि ल्‍युमिया 520 हे दोन फोन वर्ल्‍ड मोबाईल कॉंग्रेसमध्‍ये सादर केले. याशिवाय नोकियाने 105 आणि 301 हे दोन स्‍वस्‍त हॅण्‍डसेटही सादर केले आहेत.
ब्‍लॅकबेरी Z10 
हॅण्‍डसेटमध्‍ये 4.2 इंचाची हाय डेफिनेशन डिस्‍प्‍ले स्‍क्रीन आहे. रिझॉल्‍यूशन 1290*768 पिक्‍सेल एवढे आहे. याचे खास वैशिष्‍ट्य म्‍हणजे या हॅण्‍डसेटमध्‍ये 2 जीबी रॅम वापरली असून इंटरनल मेमरी 16 जीबीची आहे. तसेच त्‍यात ब्‍लॅकबेरीची नवी ऑपरेटींग सिस्टीम ‘ब्‍लॅकबेरी-10’ आहे. हॅण्‍डसेटमध्‍ये 1.5 GHz ड्युअल कोर प्रोसेसर आहे. हॅण्‍डसेटमध्‍ये तब्‍बल 70 हजार अप्‍लीकेशन्‍स आहेत.


य‍ाशिवाय 8 मेगापिक्‍सल कॅमेरा, 2 मेगापिक्‍सल फ्रंट कॅमेरा आहे. दोन्‍ही कॅमेरा हाय डेफिनेशन आहेत. त्‍याद्वारे 1080 पिक्‍सेल एचडी व्हीडिओ शूट करु शकतो.


हा फोन अमेरिकेत लॉंच करण्‍यापूर्वी भारतात सादर करण्‍यात आला आहे. तसेच ब्रिटन आणि कॅनडामध्‍ये हॅण्‍डसेटची विक्री सूरू आहे.
भारतात लॉंच झाला ब्‍लॅकबेरी Z10 स्‍मार्टफोन, नोकियाचे चार नवे हॅन्डसेटनोकिया ल्‍युमिया 720


नोकियानेही नवा स्‍मार्टफोन बाजारात आणला आहे. ल्‍युमिया 720 हा विन्‍डोज 8 मोबाईल प्‍लॅटफॉर्मवर चालणारा हॅण्‍डसेट आहे. याचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे, अतिशय संवेदनशील टच स्‍क्रीन, जी ग्‍लोव्‍ह्ज घातल्‍यानंतर वापरू शकतो. 8 जीबी इंटरनल मेमरी असून 64 जीबीपर्यंत वाढविण्‍याची क्षमता आहे. तसेच 7 जीबी फ्री स्‍काय ड्राईव्‍ह स्‍टोरेजही देण्‍यात आला आहे.


कॅमेरा 6.7 मेगापिक्‍सलचा आहे. एलईडी फ्लॅशही देण्‍यात आला आहे. 1.3 मेगापिक्‍सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरी 2000 एमएएच क्षमतेची आहे. याची किंमत जवळपास 18000 रुपये असेल.
नोकिया ल्‍युमिया 520


नोकियाने हा एक बजट विन्‍डोज फोन आहे. या फोनमध्‍ये 4 इंचाची एलसीडी आयपीएस टचस्‍क्रीन, 1 GHz ड्युअल कोर प्रोसेसर, 8 जीबी इंटरनल मेमरी, 5 मेगापिक्‍सल कॅमेरा आहे. 64 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. तसेच 1430 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. या फोनची किंमत सुमारे 10 हजार रुपये राहील.
नोकिया 301


हा फोन सिम्बियन एस-40 ऑपरेटींग सिस्‍टीमवर आधारीत आहे. सिम्बियनवर आधारीत हा नोकियाचा अखेरचा हॅण्‍डसेट राहील. त्‍यात सोशल नेटवर्कींग अप्‍लीकेशन्‍स आहेत. डिस्‍प्‍ले 2.4 इंचाचा आहे. 3.2 मेगापिक्‍सल कॅमेरा आहे. इंटरनल मेमरी 256 एमबी असून 32 जीबीपर्यंत वाढविण्‍यात येऊ शकते. सिंगल आणि ड्युअल सिम अशा दोन्‍ही प्रकारांमध्‍ये हॅण्‍डसेट सादर करण्‍यात आला आहे. दुसरे वैशिष्‍ट्य म्‍हणजे दिर्घ बॅटरी बॅकअप. स्‍टॅण्‍डबाय मोडवर 39 दिवसांपर्यंत बॅटरी चालू शकते. Youtube Support
नोकिया 105


नोकियाचा हा फोन डस्‍ट आणि वॉटरप्रूफ आहे. बॅटरी 35 दिवसांपर्यंत चालू शकते. यात एफएम रेडिओ आणि फ्लॅश लाईटही दिला आहे.
Exit mobile version