होळी ‘अॅप’

प्रत्येक सणाच्यानिमित्ताने नव्याने काही तरी येत असतचं. इतकी वर्षे नव्या वस्तू बाजारात येत होत्या , आता अॅप्सही बाजारात येऊ लागले आहेत. नोकियाने विंडोजवर चालणारे काही अनोखे अॅप्स विंडोज मार्केट प्लेसवर बाजारात आणले आहेत. यातील काही इंटरेस्टिंग अॅप्स… 



होळीः या अॅपमध्ये तुम्हाला होळीच्या संदर्भात सर्व सविस्तर माहिती देण्यात आली आहे. देशभर विविध प्रकारे साजऱ्या करण्यात येणाऱ्या या सणाची माहिती , त्यातील परंपरा , हा सण साजरा करण्याच्या पद्धती आदींची माहिती यात देण्यात आली आहे. हे अॅप विंडोज मार्केट प्लेसवर मोफत उपलब्ध आहे. 


ट्यून टू होळीः हिंदी चित्रपटांमध्ये होळीची अशी काही विशेष गाणी आहेत. या गाण्यांचे अनोखे कलेक्शन असलेले हे अॅप ‘ मार्केटप्लेस ‘ वर उपलब्ध आहे. मजा , मस्ती आणि विविध रंगीत गाण्यांचा अनुभव या अॅपच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो. 


हॅपी होळीः आपण विविध रंगांचे मिश्रण करून आपल्या मोबाइलच्या स्क्रीनवर रंगसंगती तयार करू शकतो. ही रंगसंगती आपण आपल्या मित्रांशी विविध माध्यमातून शेअर करू शकतो. यात आपण आपल्या मित्राच्या फोटोवर रंग लावूनही तो फोटो त्याला शेअर करू शकतो. 


मॅजिक फिंगरः होळीच्या निमित्ताने विविध रंगांचा वापर करून तुम्ही विविध संदेश तयार करू शकता. यासाठी नोकियाने खास मॅजिक फिंगर नावाचं अॅप बाजारात आणलं आहे. यात तुम्ही तुमच्या आवडीचे रंग वापरून तुमच्या फोनवर एखादं सुरेख चित्र तयार करू शकता. हे चित्र तुम्ही सोशल नेटवर्किंग साइट्स आदीच्या माध्यमातून आपल्या मित्रांशी शेअर करू शकता. 


कलोरिफायः या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह केलेले फोटोंमध्ये विविध रंग भरू शकता. यामध्ये ग्रेस्केल , यूज शेड्स असे विविध फोटोशॉपचे अॅप्स उपलब्ध आहेत. 


फन कॅमेराः हे अॅप सुरू करून तुम्ही फोटो काढला तर त्याला विविध प्रकारचे इफेक्ट्स देऊन तुम्ही फोटो काढू शकतात. यात काढण्यात आलेला फोटो २०४८ बाय २०४८ पिक्सेलपर्यंत मोठा होऊ शकतो. यात एक शटर बटण आहे , याचा वापर करून एकाचवेळी तुम्ही फोटो काढूही शकता आणि शेअरही करू शकता. 

Exit mobile version