SMS करा, रेल्वे तिकीट मिळवा! Book rail tickets via a sms on mobile

रेल्वेचं रिझर्व्हेशन करायचंय?… सोप्पंय!… आपल्या खिशातल्या मोबाइलवरून आता तुम्ही कुठूनही तिकीट बुकिंग करू शकता… मस्करी वाटतेय?… नाही हो, हे १०१ टक्के खरंय… रिझर्व्हेशनची प्रक्रिया आता खरंच इतकी सोप्पी झालेय…

एसएमएसवर आधारित तिकीटविक्रीला रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते सुरुवात झाली. १३९ आणि ५६७६७१४ या क्रमांकावर ही सेवा उपलब्ध आहे. या सेवेमुळे रेल्वे रिझर्व्हेशनसाठी बुकिंग ऑफिसला जा, रांगेत उभे राहा, फॉर्म भरा आणि आपला नंबर यायची वाट बघत बसा, या कंटाळवाण्या प्रक्रियेतून लाखो प्रवाशांची सुटका होणार आहे.

ई-तिकिटिंगपाठोपाठ एसएमएसवरून तिकीट मिळण्याची नवीन सुविधा ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’तर्फे (आयआरसीटीसी) सुरू करण्यात आलेय. देशात इंटरनेटचा वापर करणारी जनता फक्त १० टक्के आहे. याउलट, ८० टक्के नागरिकांकडे मोबाइल आहे. त्यांना रेल्वे तिकीट मिळवणं सोपं व्हावं, या उद्देशानं ही एसएमएस तिकीट सेवा सुरू करण्यात आल्याचं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या सेवेसाठी स्मार्टफोन किंवा मोबाइल इंटरनेटची गरज नाही. मोबाइल बँकिंगच्या सहाय्याने प्रवाशांना तिकीट मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.

एसएमएसवरून तिकीट बुक करण्यासाठी आधी आयआरसीटीसी आणि बँकेत आपला मोबाइल नंबर नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर बँकेकडून ‘मोबाइल मनी आयडेंटिफायर’ आणि ‘ओटीपी’ ( वन टाइम पासवर्ड) मिळाल्यानंतर एका एसएमएसद्वारे मेल/एक्स्प्रेस क्रमांक , प्रवासाचे ठिकाण , प्रवासाची वेळ , दर्जा , प्रवाशांचे नाव नोंदवायचा असून त्यानंतर ‘आयआरसीटीसी’ कडून ट्रान्सॅक्शन आयडी मिळेल. बँकेकडून रक्कम वळती केल्यावर प्रवाशांना तिकीट मिळू शकेल. प्रवासादरम्यान तिकीट नोंदणीचा एसएमएस योग्य ओळखपत्रासह ग्राह्य मानला जाईल.

ही सेवा सर्वच मोबाइल सेवापुरवठादारांकडून दिली जाणार असून दोन एसएमएससाठी तीन रु. आणि बँकेकडून ५ हजारांपर्यंतच्या रकमेसाठी पाच रुपयांचे शुल्क आकारले जाईल.

एसएमएस तिकीट सेवेची वैशिष्ट्ये

* एसएमएसवरून तिकीट काढण्यासाठी इंटरनेटची गरज नाही
* एसएमएस केल्यावर एका मिनिटांत तिकीट मिळणार
* तिकीटाची प्रिंट काढायची गरज नाही. मेसेजच तिकीट म्हणून ग्राह्य
* प्रवाशानं फोटो ओळखपत्र सोबत बाळगणं गरजेचं

  1. For SMS Bookings, send a Booking SMS in specified format with information of Date of Journey, Class , Train Number and Passenger Details. You shall receive Seat Availability.
  2. In the second SMS make the Payment, which can be initiated in either two ways:-
  • Using Mobile Money Identifier MMID* and one-time password (OTP) as received from Bank for registered Mobile Number.
  • Using PrePaid Wallet Cards or mWallets.
  • Booking confirmation SMS is sent by IRCTC.
  • * MMID generation is a single click process available with more than 26 Indian Banks covering over 90% of the total banking subscriber base. The banks for the same are listed at    http://www.npci.org.in/bankmember.aspx

    * “OTP” is a One Time Password generated and provided by your respective bank.

     
  • USSD (Menu-based dialling)
  • USSD Services are currently offered by:-

  • Airtel Money

    – Airtel subscribers Dial *400# on their mobiles. Click here for details.

    1. Dial designated number, you shall receive a Menu Based Screen dialling. Select ‘book tickets’ option, select ‘reservation’ (user is prompted to enter his IRCTC user ID once only), enter details     (date of journey, station, train no, class, etc)
    2. Enter mPIN for authorizing payment through mobile wallet
    3. Booking confirmation SMS is sent by IRCTC

    To Know More Go To https://www.irctc.co.in/beta_htmls/SMS_USSD.html

    Exit mobile version