MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

वन प्लस X आणि निन्टेडोची पहिली मोबाइल गेम …

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 29, 2015
in गेमिंग, स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
वनप्लस ही चीनी कंपनी मोबाइलच्या बाजारात एकदम नवखी तरीही त्यांनी अल्पावधीतच प्रचंड यश मिळवलं आहे. भक्कम फीचर्स असलेला फोन आणि किंमत कमी, क्वालिटी चांगली असल्यामुळे केवळ 2 मॉडेल्स सादर केलेल्या या कंपनीच्या मोबाइल्सवर अक्षरशः उड्या पडताना दिसत आहेत.

यापूर्वीचे वनप्लस 1 आणि वनप्लस 2 चांगलेच गाजले आहेत. मात्र या कंपनीचा फोन घेताना आपल्याला Invite सिस्टमनेच घेता येतो. ह्या सिस्टममध्ये आपल्याला प्रथम त्यांच्या वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करावं लागतं. त्यानंतर आपण हा फोन घेणार्‍या ग्राहकांच्या वेटिंग लिस्टमध्ये सामील होतो. जर आपला नंबर पुढे सरकत गेला तर आपल्याला वनप्लस हा फोन घेण्यासाठी Invite करतं. हा कोडे घेऊन Amazon वर जाऊन आपण फोन विकत घेऊ शकतो. नुकतीच त्यांनी invite 3 दिवसांतपर्यंत वैध राहील असं जाहीर केलय.(यापूर्वी केवळ 1 दिवस).    

तर या वनप्लस कंपनीचा नवा फोन आज सादर झाला. OnePlus X असं या मॉडेलचं नाव असेल. ज्या ग्राहकांना वनप्लस 2 परवडत नाही त्यांना चांगला पर्याय उपलब्ध झालाय. वनप्लस वन आणि टू यांची किंमत 20000 वर होती.

OnePlus X फीचर्स :

  • डिस्प्ले : 5″ फूलएचडी AMOLED Gorilla  Glass Body with Metal Sideline
  • प्रोसेसर : Snapdragon 801 
  • रॅम : 3GB,  स्टोरेज : 16GB + 128GB पर्यन्त वाढवता येणारं SDकार्ड स्लॉट    
  • सिम स्लॉट : डबल सिम 4G 
  • बॅटरी : 2525mAh 
  • कॅमेरा : 13MP + 8MP (F2.2)
  • OS : ऑक्सिजन ओएस (अँड्रॉइड 5.1.1)
  • किंमत : $249 (Rs.16999)

वनप्लस 2 असलेल्या मात्र या फोनमध्ये नसलेल्या गोष्टी : फिंगरप्रिंट सेन्सर, 4K रेकॉर्डिंग, यूएसबी टाइप C 

ह्या फोनसाठी काही पर्याय खाली देत आहोत. ह्यांची किंमत एकाच प्रकारात मोडते…. 
Asus Zenfone 2, Xiaomi Mi4, Moto X Play, Moto G3, Xperia M4,HTC Desire 820, Samsung J7/E7,
Huawei Honor 6, Lenovo Vibe X2, Yu Yureka +, Lumia 640XL…
आजची आणखी मोठी बातमी म्हणजे मारिओ ह्या गेमचे निर्माते निन्टेडो ह्यांनी त्यांची पहिली मोबाइल गेम सादर केली. इतके दिवस त्यांनी सर्व गेम्स Wii, Nintendo सारख्या गेम डिवाइसवरच ठेवल्या होत्या. आपल्यापैकी अनेकांनी मारिओ ही गेम नक्कीच खेळली असेल. त्यामुळेच अनेकांना या त्यांच्या गेमबद्दल उत्सुकता होती. या नव्या गेमचं नाव Miitomo असं आहे. ही गेम 2016 मध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये आपल्या मित्रांसोबत सोशलनेटवर्क सारख्या वातावरणात गेम खेळायची आहे. 
nintendo smartphone miitomo      
मात्र अनेकांना ह्या गेमची आयडिया अजिबात आवडली नसून ही बातमी आल्यापासून कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. गुंतवणूकदारांना ही गेम अजिबात आकर्षक नसल्याचं वाटत आहे त्यामुळे त्यांची पूर्ण नापसंती जाहीर झालीये. बहुतांश गेमर्सना निंटेंडो मारिओचं अँड्रॉइड व्हर्जन सादर करेल असं वाटत होतं. आता पाहूया Miitomo जेव्हा उपलब्ध तेव्हा यूजरचा कसं प्रतिसाद लाभतोय ते….     

          

Tags: GamingMarioNintendoOnePlus
ShareTweetSend
Previous Post

मायक्रोसॉफ्ट लुमिया 950, सर्फेस बूक, बॅंड, होलोलेन्स सादर

Next Post

विंडोज १० नोवेंबर अपडेट : कोर्टाना भारतात उपलब्ध

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Black Myth Wukong

Black Myth : Wukong गेमचे पहिल्याच दिवशी अनेक विक्रम!

August 21, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

Minecraft या गेमची फोनवरील आवृत्ती आता फक्त २९ रुपयांत!

January 25, 2024
Next Post
विंडोज १० नोवेंबर अपडेट : कोर्टाना भारतात उपलब्ध

विंडोज १० नोवेंबर अपडेट : कोर्टाना भारतात उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech