प्रिझ्मा (Prisma) : खर्‍याखुर्‍या चित्राचा इफेक्ट देणारा फोटो एडिटर

Prisma अॅप मध्ये इफेक्ट दिलेले फोटोज 

Prisma हे अवघ्या एका महिन्यात अॅपलच्या iOS मध्ये अॅपच्या यादीत टॉपवर जाऊन पोहोचल आणि जगात सर्वत्र या नव्या फोटो इफेक्ट अॅपची चर्चा सुरू झाली. कित्येक देशात 10 लाखांहून अधिक लोक दररोज हे अॅप वापरत आहेत ! याच खरं वैशिष्ट्य म्हणजे यामधील कलेने समृद्ध – Artistic “फिल्टर्स”  या फिल्टर्समुळेच या अॅपमध्ये एडिट केलेले फोटो अगदी हुबेहूब प्रसिद्ध चित्रकारांनी बनवलेल्या चित्रांसारखे दिसतात !

 डाऊनलोड लिंक : Prisma on Google Play

गेला महिनाभर हे अॅप केवळ iOS वरच उपलब्ध होते मात्र आता अँड्रॉइडसाठी प्ले स्टोअर वरसुद्धा दाखल झाले आहे. यामध्ये Munk, पाब्लो पिकासो, Van Gogh, Levitan या महान चित्रकारांच्या चित्रांचा इफेक्ट अगदी सहज देता येतो. प्रिझ्माच्या वेबसाइटच्या दाव्यानुसार, हे अॅप न्युरल नेटवर्क आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विलक्षण जोडणी तयार करतं ! यामध्ये Impression, Curtain, Running in Storm, Mondrian, Tears, Composition असे विविध फिल्टर्स आहेत. 

ज्यावेळी प्रिझ्मा अॅप तुमच्या फोटोला कलाकृतीमध्ये बदलतं तेव्हा थोडा वेळ घेतं कारण ते फोटोला स्वतः बर्‍यापैकी समजून किती प्रमाणात फिल्टर लावायचा हे ठरवतं. आपण स्वतः फिल्टर किती प्रमाणात लावला गेलाय तीव्रता कमी जास्त करू शकतो! मशीन लर्निंग नावाच्या आणि Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) यांच्या जोरावर तंत्रज्ञान आणखी वेगाने पुढे सरकत आहे हे नक्की !  
हे अॅप 11 मिलियन वेळा डाऊनलोड केलं गेलय आणि अंदाजे 400 मिलियन फोटोजना यामुळे इफेक्ट देण्यात आले आहेत ! यामधून तयार केलेली कलाकृती आपण लगेच फेसबुक इंस्टाग्राम, व्हॉटसअॅपवर लगेच शेअर करू शकतो. खाली काही प्रसिद्ध माध्यमांचे रिव्यूज : 

  1. Verge :  “Prisma will make you fall in love with photo filters all over again”
  2. TechCrunch : “Artists beware! AI is coming for your paintbrush too…”
  3. Mashable : “Turning photos into artistic works of inspiration just got a lot easier”

काही बॉलीवुड, मराठी सेलेब्रिटीनी सुद्धा या अॅपचा वापर करत फोटोज शेअर केले आहेत.                
आलिया भट, जॉन अब्राहम, शाहीद कपूर, अनुष्का शर्मा, सिद्धार्थ चांदेकर, क्रांती व तेजस्विनी, प्रसाद ओक  

     

Exit mobile version