यूट्यूब अँड्रॉइड अॅपवर Incognito Mode आणि Dark Mode उपलब्ध!

ज्याप्रमाणे ब्राउजर वर आपण Incognito Mode वापरतो त्याप्रमाणे आता आपण YouTube अँड्रॉइड अॅपवर सुद्धा वापरू शकतो. गूगलतर्फे आता अँड्रॉइड अॅपवर ही सुविधा देण्यात आली आहे. आपण जेव्हा Incognito Mode वापरतो तेव्हा आपण कोणते व्हिडिओ पाहिले आहेत तसेच सर्च केले आहेत, याबद्दल कोणतीही माहिती साठवली जात नाही किंवा पाहता येत नाही. थोडक्यात आपली यूट्यूब हिस्ट्री साठवली जात नाही. Incognito Mode म्हणजेच गुप्त मोड जोपर्यंत सुरु असेल तोपर्यंत हिस्टरी सेव्ह होत नाही. 

Incognito Mode चालू करण्यासाठी तुम्हाला प्रथम अकाउंट वर जावे लागेल (उजव्या कोपऱ्यामध्ये क्लिक करून). त्यानंतर आपणास ‘Turn On Incognito’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण Incognito Mode मध्ये जाऊ. खालील बाजूस आपणास आता ‘You’re Incognito’ असे दिसेल.

जर आपणास एखाद्या विषयाबद्दल काही पाहायचे आहे परंतु गूगलने त्यासारखे व्हिडिओ पुन्हा सूचित(recommend) करू नये असे आपणास वाटत असेल तर अशा वेळेस हा पर्याय खूपच फायद्याचा ठरतो.

Incognito Mode मध्ये तुमचे Subscriptions तसेच Library आणि Inbox हे पर्याय उपलब्ध नसतील. Incognito Mode मधून बाहेर येण्यासाठी आपण अकाउंट वर क्लिक करून ‘Turn off Incognito’ पर्याय निवडून बाहेर पडू शकता. Incognito Mode हा VPN प्रमाणे नसून आपण केलेले ब्राउजिंग आपल्या ISP ला कळू शकते. जर तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल तर  तुम्ही कोणत्या साइट्स पाहत आहात हे तुम्हाला इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांना ठाऊक असतं. जर त्याना माहीत होऊ न देता वेबसाइट्स पाहायच्या असतील तर tor browser किंवा VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापराव लागेल.   

युट्युब अँड्रॉइड अॅपवर Dark Mode : मार्च महिन्यात युट्युबने अँड्रॉइड आणि iOS वर डार्क थीम आणणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर प्रथम iOS वर व आता अँड्रॉइडवर ही नवी थीम उपलब्ध होत आहे. डोळ्यांना रात्रीच्या वेळी कमी त्रास व्हावा व मेन्यू पाहणं सोपं जावं यासाठी हा डार्क मोड थीम पर्याय उपयोगी पडेल! डार्क मोड मध्ये मागील पांढऱ्या रंगाऐवजी करडा रंग दिसेल. ही थीम अद्याप सर्वाना उपलब्ध झालेली नाही.

search terms youtube android app ios app incognito mode dark mode theme  

Exit mobile version