Tag: History

यूट्यूब अँड्रॉइड अॅपवर Incognito Mode आणि Dark Mode उपलब्ध!

ज्याप्रमाणे ब्राउजर वर आपण Incognito Mode वापरतो त्याप्रमाणे आता आपण YouTube अँड्रॉइड अॅपवर सुद्धा वापरू शकतो. गूगलतर्फे आता अँड्रॉइड अॅपवर ही ...

वाचा कोणी आणि कसे बनवले अ‍ॅन्ड्राइड

आज अ‍ॅन्ड्राइड हा शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कित्येक स्मार्टफोन्स आज त्यांच्या ब्रांडच्या नावाने नाही तर अ‍ॅन्ड्राइड नावाने ओळखले जातात. ...

महिन्याला 1 अब्ज भेट देणा-या युझर्संचा ‘युट्यूब’ झाला आठ वर्षांचा

जगातील सर्वाधिक गर्दीचे संकेतस्थळ म्हणजे युट्यूब. त्याने  मंगळवारी(ता.21) आठ वर्षपूर्ण केली. यूट्यूबचा प्रारंभ  मे 2005 मध्‍ये झाला. इंटरनेट युगात प्रत्येक ...

विंडोजची निळाई : मायक्रोसॉफ्ट विंडोज

' मायक्रोसॉफ्ट विंडोज ' हा शब्द कधीही कम्प्युटर नहाताळलेल्या व्यक्तीलाही माहिती असेल . मायक्रोसॉफ्टनेएमएस - डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर , १९८५ रोजी ' विंडोज ' नामक ऑपरेटिंग सिस्टिम आणली .१९८४ मध्ये सादर झालेल्या ' अॅपल ' च्या ' मॅकिंटॉश ' ला मागे टाकत विंडोजने पर्सनल कम्प्युटर ( पीसी )बाजार काबीज केला आहे . ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वदटक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे . पर्सनल कम्प्युटर , ' विंडोज ७ ', सर्व्हरसाठी ' विंडोज सर्व्हर २००८आरटू ' व मोबाइल फोनसाठी ' विंडोज फोन ८ ' या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत . आता मायक्रोसॉफ्ट' विंडोज ब्ल्यू ' या नावाने नवीन ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणत आहे . यानिमित्ताने मायक्रोसॉफ्टच्याऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाचा अक्षय पेंडभाजे यांनी घेतलेला हा आढावा .  विंडोजचा इतिहास  विंडोजचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला सप्टेंबर १९८१ पर्यंत मागे जावे लागते , जेव्हा ' इंटरफेसमॅनेजर ' हा प्रकल्प सुरू झाला . तो ' विंडोज ' या नावाने नोव्हेंबर १९८३ मध्ये घोषित झाला खरा , पण नोव्हेंबर१९८५ पर्यंत ' विंडोज ' प्रकाशित झाली नाही . ' विंडोज १ . ० ' चे बाह्यावरण ' एमएस - डॉस एक्झिक्युटिव्ह 'नावाचा प्रोग्रॅम होता . कॅल्क्युलेटर , कॅलेंडर , कार्डफाइल , क्लिपबोर्ड दर्शक , घड्याळ , कंट्रोल पॅनल , नोटपॅड ,पेंट , रिव्हर्सी , टर्मिनल , राइट हे इतर पुरवलेले प्रोग्राम होते .  विंडोज ३ . ० व ३ . १  विंडोज ३ . ० ( १९९० ) व ३ . १ ( १९९२ ) या ऑपरेटिंग सिस्टिम खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्ट्या यशस्वीहोत्या . अॅपल विरुद्ध विंडोज या युद्धाच्या सुरुवातीला अॅपलच्या ओएसला टक्कर देण्यासाठी विंडोजने नवीनजीयूआय , इंटेलचा ८०२८६ आणि ८०३८६ या सीपीयूना चांगला सपोर्ट या गोष्टी ३ . ० मध्ये , तर ३ . १ मधेविंडोज राजिस्ट्री , ट्रू टाइप फॉन्ट्स , मिनीस्वीपर या गोष्टींचा समावेश केला . विंडोज ३ . १ च्या दोन महिन्यांतएक लाख कॉपीज विकल्या गेल्या .  विंडोज ९५  ' विंडोज ९५ ' ऑगस्ट १९९५ साली प्रकाशित झाली . चार दिवसात एक लाख कॉपीज विकल्या गेल्या , असे हेओएस होते . यात विंडोजने पहिल्यांदाच स्टार्ट बटणचा समावेश केला होता .  विंडोज ९८  मायक्रोसॉफ्टचे दुसरे प्रकाशन ' विंडोज ९८ ' जून १९९८ साली प्रकाशित झाले . मायक्रोसॉफ्टने १९९९ सालीयाचीच दुसरी आवृत्ती प्रकाशित केली . तिचे नाव विंडोज ९८ , सेकंड एडिशन होते . ' विंडोज ९८ एसई ' हात्याचा शॉर्टफॉर्म . या ओएसला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला . थीम सपोर्ट , थंबनेल्स , वन - क्लिकलाँच , गेमिंग साठी डायरेक्ट एक्स ६ . १ , अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात करण्यात आला होता .  विंडोज एमई  फेब्रुवारी २००० मध्ये ' विंडोज २००० ' बाजारात आले . या पाठोपाठ लगेजच विंडोज मिलेनियम एडिशन (एमई ) बाजारात आली . ' विंडोज एमई ' ने ' विंडोज ९८ ' कडून गाभा अद्ययावत केला असला , तरी ' विंडोज२००० ' कडूनही काही पैलू अद्ययावत केले व ' बूट इन डॉस मोड ' हा पर्याय काढला .  विंडोज एक्सपी  ' विंडोज एक्सपी ' खासगी कम्प्युटरवर ( गृह , व्यापारी , मीडिया केंद्रांसह ) चालणारी ओएस आहे . २४ ऑगस्ट२००१ रोजी ती प्रथम कम्प्युटर उत्पादकांना मिळाली . कम्प्युटरवर प्रस्थापित केलेली आणि वापरण्याससोयीस्कर अशी ही विंडोजची सध्याची सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम आहे . ' एक्सपी ' हे नाव'experience' याचा शॉर्टफॉर्म आहे . निर्मितीपूर्व काळात तिचे सांकेतिक नाव ' व्हिसलर ' असे होते . ' विंडोजएक्सपी ' ची रिटेल विक्री २५ ऑक्टोबर २००१ ला सुरू झाली . जानेवारी २००६ मध्ये ' विंडोज एक्सपी ' च्या४० कोटीहून अधिक प्रती वापरात होत्या , असे एका आयडीसी विश्लेषकाचा अंदाज आहे . ' एक्सपी ' नंतर 'विंडोज व्हिस्टा ' व्यावसायिकांना ६ नोव्हेंबर २००६पासून व सामान्य जनतेला ३० जानेवारी २००७ पासूनमिळू लागली . ...

Page 1 of 2 1 2
ADVERTISEMENT
error: Content is protected!