अॅपल बनली आहे 1 ट्रिलियन डॉलर्स भागभांडवल असलेली जगातली पहिली कंपनी!

अॅपल काही क्षणांपूर्वीच जगातली पहिली ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅपिटल असलेली कंपनी बनली आहे. रुपयांमध्ये सांगायचं तर तब्बल ~ ६८ लाख कोटी रुपये भागभांडवल! अॅपलसोबत अल्फाबेट(गूगल), अमॅझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक या कंपन्यांमध्ये स्पर्धा होती! मात्र शेवटी अॅपलने बाजी मारत हा मान पटकावला आहे!

आयमॅक, आयपॅड, मॅकबुक, आयपॉड, आयफोन, अॅपल वॉच अशी उपकरणे आणि त्यांच्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर बनवणाऱ्या अॅपल कंपनीची स्थापना स्टीव्ह जॉब्ज आणि स्टीव्ह वॉझ्निअॅक यांनी १९७६ मध्ये केली होती. आजच अॅपलच्या शेअर्सनी $207.05 चा टप्पा ओलांडून ही किमया साधली आहे. काल उत्तम आर्थिक निकाल जाहीर झाल्यावर लगेच हा टप्पा ओलांडला गेला! २०११ नंतर सीईओ स्टीव्ह जॉब्जची जागा घेतलेल्या टीम कुक यांच्या नेतृत्वात अॅपलने तब्बल २०००% वाढ नोंदवली गेली आहे! 

Steve Jobs and Steve Wozniak

स्थापनेनंतर ४२ वर्षात अॅपलने हा टप्पा गाठला असून याआधी तब्बल ११७ वर्षांपूर्वी १९०१ मध्ये यूएस स्टीलने 1 बिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला होता.  पेट्रो चायनानेसुद्धा एका दिवसासाठी 1 ट्रिलियनचा टप्पा ओलांडला होता. तसेच जर आधीच्या ऑइल कंपन्यांचे सध्याच्या चलनामध्ये रूपांतर केल्यास या जुन्या कंपन्या कित्येक पटीने पुढे असतील मात्र या कंपन्या आता शक्यतो विभाजित झालेल्या आहेत. दरम्यान आमच्यासाठी झालेली वाढ जगभर सर्वत्रच मजबूत होती असं मत अॅपलचे आर्थिक प्रमुख लुका मास्त्री यांनी व्यक्त केलं! शेअर्समध्ये कालपासून झालेली वाढ आर्थिक निकाल जाहीर केल्यामुळे झाली असून वॉल स्ट्रीटमधील तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षासुद्धा अधिक चांगली कामगिरी नोंदवली आहे! गेल्या काही दिवसात झालेली वाढ आयफोन टेनच्या विक्रीमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे झालेला नफा यांचा परिणाम असल्याचं दिसून येतं. Apple (AAPL) Current Share Stats

अॅपलच्या या भागभांडवलाची इतक्यात तरी बरोबरी करणं शक्य होणार नाही मात्र येत्या काळात अमॅझॉन हा टप्पा गाठू शकेल मात्र तोपर्यंत अॅपलसुद्धा थोडी का होईना पुढे निघून गेलेली असेल! वॉल स्ट्रीटच्या नव्या अंदाजानुसार शेअर्सची किंमत $212 होईल त्यामुळे अॅपलचं मार्केट कॅपिटल 1.05 ट्रिलियन डॉलर्सवर पोहचेल!

search terms : Apple first company to cross $1 trillion market cap US nasdaq

Exit mobile version