टॉर ब्राउझर आता अँड्राईडवर उपलब्ध!

गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध असणारे टॉर ब्राउझर आता अँड्राईड प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध झाला आहे. टॉर ब्राउझर फॉर अँड्रॉइड (अल्फा) बिल्ड मध्ये हे अॅप उपलब्ध असून गूगल प्ले स्टोअरवरून तसेच टॉर प्रोजेक्टच्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल. टॉर ब्राउझर (Tor Browser) चा वापर केल्यास आपण थर्ड पार्टी ट्रॅकर्स त्याचबरोबर जाहिरातींना इंटरनेटवर आपणास फॉलो करण्यापासून रोखू शकतो. गोपनीयरित्या आपली ओळख समोर न आणता इंटरनेट वापरण्यासाठी या ब्राउजरचा प्रामुख्याने वापर होतो.

टॉर ब्राउझर अँड्रॉइडवर डाउनलोड करण्यासाठी लिंक – Tor For Android (Alpha) आणि Orbot

टॉरवरून आपण इंटरनेट वापरल्यास आपली ओळख सुरक्षित राहते. आपले लोकेशन, डिवाइस, ऑपरेटिंग सिस्टिम, आपण कोणत्या वेबसाइट्स ना आपण भेट दिली आहे इत्यादी टॉरचा वापर करून लपवता येते. आपण टॉर ब्राउझरचा वापर करत आहोत एवढीच माहिती संबंधित वेबसाइट, ISP (Internet Service Provider) किंवा हॅकर्सना समजते. टॉर ब्राउझर आपले लोकेशन ब्लॉक करते यामुळे आपण कोणत्या ठिकाणाहून इंटरनेटचा वापर करत आहोत समजू शकत नाही. तसेच जोपर्यंत आपण लॉगिन रूपात माहिती देत नाही तोपर्यंत कोणतीही वेबसाइट आपणास ओळखू शकत नाही

टॉरद्वारे आपले कनेक्शन तीन स्तरांमध्ये एन्क्रिप्ट केले जाते व जगातील वेगवेगळ्या सर्व्हर मधून जोडले गेल्यामुळे पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहते. मोठमोठे कॉर्पोरेट तसेच गव्हर्नमेंटद्वारे आपली ऍक्टिव्हिटी ट्रॅक करण्यापासून वाचण्यासाठी टॉर हे उत्तम माध्यम आहे. टॉरद्वारे पत्रकार, ब्लॉगर, कार्यकर्ते यांना गुप्तता पाळण्यास मदत होते.

आपण एखाद्या प्रॉडक्टबद्दल माहिती घेतली किंवा शॉपिंग साईटवर काही पाहिल्यास इंटरनेट वापरताना इतरत्र याबद्दलच्या जाहिराती आपणाला यामुळे दिसत नाहीत. त्याचबरोबर जर कोणत्या वेबसाइट ब्लॉक केल्या गेल्या असतील तर टॉरचा वापर करून त्यांनासुद्धा भेट देता येते.

टॉर बद्दल आणखी माहितीसाठी आपण हा व्हिडिओ पाहू शकताhttps://youtu.be/JWII85UlzKw

सध्या टॉर ब्राउझर वापरताना आपणास Orbot या प्रॉक्झी अॅपद्वारे वापरता येईल जे आपणास टॉर नेटवर्कला जोडेल. परंतु २०१९ च्या सुरवातीस उपलब्ध होणाऱ्या स्टेबल रिलीजमध्ये Orbot शिवाय वापरता यावा असा टॉर नेटवर्कचा प्रयत्न असेल.

टॉर ब्राउझर फॉर अँड्रॉइड फायरफॉक्स व्हर्जन ६० वर आधारित असून अँड्रॉइड जेली बिन (4.1) व पुढील डिवाइसेस साठी ते उपलब्ध असेल. काही दिवसांपूर्वी एडवर्ड स्नोडेनने हेवन अॅप गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी सादर केले होते.

search terms tor browser on android what is tor in marathi onion routing

Exit mobile version