एडवर्ड स्नोडेनने सादर केलं हेवन अॅप : गोपनीयता आणि सुरक्षा!

इंटरनेट किंवा अशा संबंधित तंत्रज्ञान वापरणार्‍या व्यक्तींना त्यामधील सुरक्षा आणि गोपनीयता यांची खास काळजी घ्यावी लागते. ह्या गोष्टीची पत्रकार, कार्यकर्ते यांना जाणीव असली पाहिजे व त्यासाठी एडवर्ड स्नोडेन या सोपी सोय जी त्यांना कायम उपयोगी पडेल आणि संकटसंयमी त्यांना धोक्याची जाणीव करून देईल.
एडवर्ड स्नोडेन हा पूर्वी NSA या अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेत काम करत असे. तिथे लोकांना न सांगता त्यांच्यावर पळत ठेवली जात असल्याचं त्यानं जगासमोर उघडकीस आणलं होतं. त्यावेळी मोठा गदारोळ माजला होता. अमेरिकेच्या संस्थेवर व सरकारवर सुद्धा टीकेचा वर्षाव सुरु झाला होता. त्यानेच अशा गोष्टी उघड करणाऱ्या लोकांना उपयोगी पडेल अशा सुविधा जोडून हेवन अॅप सादर केलं आहे.
फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन, सर्व सेन्सर्स यांचा वापर करून आजूबाजूला सुरु असलेल्या घडामोडींची जाणीव करून देत राहील. कॅमेराद्वारे घरी नकळत झालेली हालचाल, आवाज याविषयी कळवून सावध करेल! थोडक्यात सामान्य यूजर याचा वापर घरी नसताना घर फोडून कोणी प्रवेश केला तर त्याविषयी कळवेल.
Download Haven on Google Play

हेवन कोणत्याही अँड्रॉइड फोनला motion, sound, vibration आणि light detector बनवेल आणि चोरांवर लक्ष ठेवता राहील. हा प्रकल्प ओपन सोर्स असल्यामुळं कोणीही यामध्ये योगदान देऊ शकतो याचा कोड मोफत उपलब्ध आहे. यामध्ये टॉर सारख्या तंत्राचा वापर करून आणखी गुप्ततेने काम करता येईल!
हेवन अधिकृत वेबसाइट

search terms Edword Snowden launches new app Haven for privacy 
एडवर्ड स्नोडेनने सादर केलं हेवन अॅप : गोपनीयता आणि सुरक्षा! एडवर्ड स्नोडेनने सादर केलं हेवन अॅप : गोपनीयता आणि सुरक्षा!   Reviewed by Sooraj Bagal on December 23, 2017 Rating: 5

1 comment:

  1. Hi, extremely nice effort. everybody should scan this text. Thanks for sharing.

    ReplyDelete

Powered by Blogger.