MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

शायोमीचे नवे बजेट फोन्स सादर : Redmi 6A, 6 व 6 Pro

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
September 5, 2018
in स्मार्टफोन्स

शायोमीने रेडमी 4A, 5A च्या यशानंतर आज या मालिकेतील रेडमी 6A, रेडमी 6 आणि रेडमी 6 प्रो असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या स्वस्त स्मार्टफोनमध्ये आणखी चांगले पर्याय देऊन शायोमीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे.फ्लॅश सेलद्वारे उपलब्ध असणारे फोन्स सेल सुरु झाल्यानंतर अगदी काही वेळातच आऊट ऑफ स्टॉक होत असले तरी खरेदीसाठी ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद शायोमीला मिळाला आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या फोन्समध्ये जवळपास तीन पैकी एक फोन शायोमीचा आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

रेडमी 6A हा १९ सप्टेंबर, आणि रेडमी 6 प्रो ११ सप्टेंबर पासून अॅमॅझॉनवर उपलब्ध होईल तर रेडमी 6 हा १० सप्टेंबर पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. याबरोबरच mi.com आणि शायोमीच्या ऑफलाईन स्टोअरमध्ये सुद्धा मिळतील. हे तिन्ही फोन्स मेड इन इंडिया आहेत.

ADVERTISEMENT

Redmi 6A 
रेडमी 5A च्या तुलनेत या फोनमध्ये डिझाईन, परफॉर्मन्स, कॅमेरा मध्ये बदल करण्यात आले आहेत. या फोन सोबत 18:9 अस्पेक्ट रेशो डिस्प्ले, ड्युअल VoLTE ड्युअल standby, AI फेस अनलॉक, AI पोर्ट्रेट मोड असे फिचर्स आहेत. शिवाय ड्युअल सिम सोबत २५६GB पर्यंत मेमरी वाढविण्यासाठी अधिकचा स्लॉट उपलब्ध असेल. २०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत ३० लाख Redmi 5A ची विक्री झाल्याचे शायोमीकडून सांगण्यात आले आहे.

Redmi 6A Specifications:
डिस्प्ले : 5.45-inch (13.84cm) (1440х720)HD+ 18:9 Display
प्रोसेसर : Helio A22 (Upto 2.0 GHz – 12 nm quad-core processor)
रॅम : 2GB
स्टोरेज : 16GB (Expandable upto 256GB)
बॅटरी : 3000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 9.6 (Upgraded to MIUI 10 Based on ANdroid  8.1 Oreo)
कॅमेरा :  13MP
फ्रंट कॅमेरा : 5MP
रंग : Black, Blue, Gold, Rose Gold
सेन्सर : Proximity Sensor, Ambient Light Sensor, E-Compass, Accelerometer Sensor
इतर : Dual Sim + microSD Card Slot, EIS for video recording, GPS
किंमत : ₹५,९९९   (2GB+16GB)
            ₹6,९९९   (2GB+32GB)
लिंक   – अॅमॅझॉन / mi.com  १९ सप्टेंबर पासून उपलब्ध

Redmi 6
रेडमी 6A च्या तुलनेत आणखी सुविधा यामध्ये देण्यात आल्या असून या फोन सोबत फिंगर प्रिंट सेंसर, 18:9 अस्पेक्ट रेशो डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा, AI फेस अनलॉक, ड्युअल VoLTE ड्युअल standby, AI पोर्ट्रेट मोड यांसारखे फिचर्स आहेत.

Redmi 6 Specifications:
डिस्प्ले : 5.45-inch (13.84cm) HD+ (1440х720) 18:9 Diplay
प्रोसेसर : Mediatek Helio P22 (2.0GHz- Octa-core)
रॅम : 3/4GB
स्टोरेज : 32/64GB (Expandable upto 256GB)
बॅटरी : 3000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 9.6 (Upgraded to MIUI 10 Based on ANdroid  8.1 Oreo)
कॅमेरा :  12MP+5MP
फ्रंट कॅमेरा : 5MP
रंग : Black, Blue, Gold, Rose Gold
सेन्सर : Fingerprint, Proximity Sensor, E-Compass, Accelerometer Sensor, Ambient Light Sensor
इतर : Dual Sim + microSD Card Slot, EIS for video recording, GPS
किंमत : ₹७,९९९ (3GB+32GB)
            ₹९,४९९ (3GB+64GB)
लिंक  – फ्लिपकार्ट / mi.com  १० सप्टेंबर पासून उपलब्ध

Redmi 6 Pro 
नॉचसोबत हा फोन उपलब्ध आहे शिवाय Snapdragon 625 सारखा चांगला प्रोसेसर ही या फोनची खासियत आहे. याबरोबरच फिंगर प्रिंट सेंसर, 19:9 अस्पेक्ट रेशो डिस्प्ले, अधिक क्षमतेची बॅटरी, ड्युअल कॅमेरा, AI फेस अनलॉक, ड्युअल VoLTE ड्युअल standby, यांसारखे फिचर्स आहेत.

Redmi 6 Pro Specifications:
डिस्प्ले : 5.84-inch (14.8cm)FHD+ (2280х1080) 19:9 Display with Notch
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 625
GPU : Adreno 506
रॅम : 3/4GB
स्टोरेज : 32/64GB (Expandable upto 256GB)
बॅटरी : 4000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 9.6 (Upgraded to MIUI 10 Based on ANdroid  8.1 Oreo)
कॅमेरा :  12MP+5MP
फ्रंट कॅमेरा : 5MP
रंग : Black, Blue, Gold, Red
सेन्सर : Infrared, Proximity Sensor, Ambient Light Sensor, E-Compass, Gyroscope, Accelerometer Sensor
इतर : Dual Sim + microSD Card Slot, EIS for video recording, GPS
किंमत : ₹१०,९९९   (3GB+32GB)
            ₹१२,९९९   (4GB+64GB)
लिंक – अॅमॅझॉन / mi.com ११ सप्टेंबर पासून उपलब्ध 

वरील सर्व फोन्स शायोमीच्या ऑफलाईन स्टोअरमध्ये तसेच ऑफलाईन पार्टनरकडे  सुद्दा उपलब्ध असतील. तसेच फोन्सची किंमत भविष्यात रुपया डॉलरच्या तुलनेत घसरल्यास वाढण्याची शक्यता शायोमीकडून वर्तविण्यात आली आहे.

Tags: MiRedmiSmartphonesXiaomi
ShareTweetSend
Previous Post

गूगल क्रोमला दहा वर्षे पूर्ण : आता नवं डिझाईन, नवे पर्याय!

Next Post

गूगल असिस्टंट मराठी भाषेत कसा वापरायचा ?

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
गूगल असिस्टंट मराठी भाषेत कसा वापरायचा ?

गूगल असिस्टंट मराठी भाषेत कसा वापरायचा ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech