MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home सॉफ्टवेअर्स

गूगल क्रोमला दहा वर्षे पूर्ण : आता नवं डिझाईन, नवे पर्याय!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 4, 2018
in सॉफ्टवेअर्स, ॲप्स

गूगलचा सर्वात लोकप्रिय ब्राऊजर गूगल क्रोम आज दहा वर्षांचा होत आहे आणि त्यानिमित्त गूगलने बऱ्याच वर्षांनंतर आज क्रोमच्या यूजर इंटरफेस डिझाईनमध्ये बदल केला आहे! त्यांच्या प्रसिद्ध मटेरियल डिझाईन आधारीत पर्याय आता क्रोमवर उपलब्ध असतील! २ सप्टेंबर २००८ रोजी क्रोम ब्राऊजर विंडोज एक्सपीसाठी प्रथम उपलब्ध झाला होता.

काही वर्षांपूर्वी अगदी तळाशी असलेला गूगलचा हा ब्राऊजर त्या काळच्या सर्वांना मागे टाकत सध्या जगातला सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राऊजर आहे! इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, सफारी, ऑपेरा, एज या सर्वांना एकत्रित जरी धरलं तरीही क्रोमच्या एकूण वापरकर्त्यांच्या संख्येपेक्षा कमीच वापरकर्ते आहेत! डेस्कटॉप कॉम्पुटर्सवर ६५% आणि फोन्सवर ६०% हिस्सा आज एकट्या क्रोम ब्राऊजरकडे आहे! या यशाचं मुख्य कारण म्हणजे वेबसाइट उघडण्यास बऱ्याच प्रमाणात कमी वेळ घेणं आणि सोपं सुटसुटीत डिझाईन.

ADVERTISEMENT

नव्या अपडेटमध्ये बऱ्याच गोष्टी अधिक वेगवान होणार असून यामुळे एकंदर अनुभवात मोठा फरक पडेल असं गूगलकडून सांगण्यात येत आहे! नव्या लूकमध्ये टॅबचा आकार बदलला असून यामुळे अनेक टॅब्स उघडल्या असतील तर आयकॉन पाहून स्विच करणं सहज जमेल! असे बदल अँड्रॉइड व iOS वर सुद्धा पाहायला मिळतील! यासाठी क्रोम अपडेट करून घ्यावं लागेल…

  1. डेस्कटॉप/लॅपटॉप : उजव्या कोपऱ्यात तीन डॉट असलेला पर्याय > Help > About Chrome
  2. अँड्रॉइड स्मार्टफोन : प्ले स्टोरमध्ये Updates > Google Chrome > Update 
  3. आयफोन : अॅप स्टोरमधून गूगल क्रोम अपडेट करा.         

आता क्रोममधील ऑटो फील (AutoFill) अधिक उत्तमरीत्या काम करेल ज्यामुळे पासवर्ड्स, पत्ते, क्रेडिट/डेबिट कार्ड्सची माहिती साठवून गरजेनुसार वापरणं सोपं झालं आहे.

  • क्रोम आता नव्या पासवर्ड जनरेटरद्वारे स्वतः सुरक्षित पासवर्ड्स तयार करेल जे तुम्ही विविध साईट्सवर वेगवेगळे वापरून तुमची ऑनलाईन अकाउंट्स सुरक्षित करू शकता!   

क्रोमचा सर्चबार सुद्धा आता स्मार्ट झाला असून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला या बारमध्येच मिळून जातील! उदा. गणितं, व्याख्या, हवामान, भाषांतर यांची माहिती सर्च बारवरच मिळेल! तसेच तुम्ही २० टॅब्स उघडल्या असतील आणि नेमकी टॅब सापडत नसेल तर सर्च बारमध्येच स्विच टॅब द्वारे योग्य ती टॅब सुचवली जाईल!

  • क्रोमच्या होमपेज/स्टार्टपेजवर स्वतःची बॅकग्राऊंड इमेज सेट करता येईल! उजव्या कोपऱ्यात खाली नवा पर्याय ज्याद्वारे आपल्या कॉम्पुटरमधील हवी ती इमेज अपलोड करून आपण क्रोमची बॅकग्राऊंड म्हणून वापरू शकतो!

Fun Fact : मराठीटेकवरील सर्वात पहिली पोस्ट गूगल क्रोमबद्दलच होती!    

Tags: AppsBrowserChromeGoogleGoogle ChromeRedesign
Share40TweetSend
Previous Post

Honor 7S सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय!

Next Post

शायोमीचे नवे बजेट फोन्स सादर : Redmi 6A, 6 व 6 Pro

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Next Post
शायोमीचे नवे बजेट फोन्स सादर : Redmi 6A, 6 व 6 Pro

शायोमीचे नवे बजेट फोन्स सादर : Redmi 6A, 6 व 6 Pro

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech