व्हॉट्सअॅपवर आता पाठवा स्टिकर्स! : स्टिकर्ससाठी वेगळं स्टोअरसुद्धा उपलब्ध!

बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु असलेलं ही स्टिकर पाठवण्याची सुविधा आता व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होत असून यामध्ये अनेक स्टिकर्सचा समावेश केलेला आहे! WeChat, Viber, फेसबुक मेसेंजर, हाईक अशा अॅप्समध्ये बऱ्याच वर्षांपासून उपलब्ध असलेले हे स्टिकर्स आता सर्वात लोकप्रिय अशा व्हॉट्सअॅपवर येत आहेत!

अनेक वापरकर्ते याबाबत सोशल मीडिया द्वारे मागणी करत मात्र दरवेळी नव्या इमोजीचा समावेश केला जायचा. आता हे स्टिकर्स चाचणी स्वरूपातील Beta आवृत्तीमध्ये उपलब्ध आहेत. ही स्टिकर्स डाउनलोड करण्यासाठी एक स्वतंत्र स्टोर व्हॉट्सअॅपमध्येच देण्यात आलेलं असून त्यामधून आपण आणखी स्टिकर्स घेऊ शकतो!
 स्टिकर्स ही सोय Beta व्हर्जन Version 2.18.329 वर असणाऱ्याना वापरता येते. इतरांना समोरच्या व्यक्तीने पाठवलेले स्टिकर्स पाहता येतील. काही दिवसात ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होईल.
हाईकप्रमाणे खास भारतीय वापरकर्त्यांसाठी अशी स्टिकर्स सध्यातरी दिसत नाहीयेत पण भारतातील वापरकर्त्यांची संख्या पाहता त्या प्रकारचे स्टिकर्स लवकरच येऊ शकतात.

व्हॉट्सअॅपवर गेल्या काही महिन्यात बऱ्याच सुविधा उपलब्ध झाल्या असून व्हिडीओ कॉल, ग्रुप कॉल, फक्त अॅडमिनलाच संदेश टाकता येण्याची सोय, अधिक ग्रुप मेंबर्स, डॉक्युमेंट्स पाठवण्याची सोय, पाठवलेला संदेश डिलीट करण्याची सोयदुसर्‍यांचे फॉरवर्ड केलेले समजणेअमर्याद गूगल ड्राइव्ह बॅकअप अशा काही ठळक गोष्टी सांगता येतील. मात्र यासगळ्या सोबत सध्या व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुककडून लवकरच व्हॉट्सअॅपमध्येही जाहिराती सुरु केल्या जाणार असल्याची चर्चा आहे. फेसबुक व इंस्टाग्रामला जोडण्याची सोय सुद्धा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून गोपनीयतेला धक्का पोहचू शकतो अशी शंका व्यक्त केली आहे.
search terms : whatsapp stickers on android how to use whatsapp stickers store
Exit mobile version