गूगल प्लस पुन्हा हॅक : आता चार महीने आधीच बंद होणार!

गूगलने काही महिन्यांपूर्वी बंद करण्याचा निर्णय घेतलेलं सोशल नेटवर्क गूगल प्लस पुन्हा एकदा डेटा चोरीचं लक्ष्य ठरलं आहे. तीन महिन्यात दुसऱ्यांदा झटका बसल्याने गूगलने गूगल प्लस नियोजित वेळेच्या चार महिने आधीच एप्रिल महिन्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एव्हढी आघाडीची कंपनी असूनही गूगलला एव्हढ्या कमी कालावधीत दोनदा सुरक्षेबाबत अडचणी येतात हि नक्कीच आश्चर्याची बाब आहे!

ऑक्टोबरमध्ये गूगलने सांगितलं होतं की पाच लाख गूगल प्लस वापरकर्त्यांच्या बाबतीत घडलेली सुरक्षेतील त्रुटी उघड झाली होती आणि त्यात गूगलने ही माहिती बऱ्याच उशिरा माध्यमांसमोर आणली. यामुळे गूगल प्लस बंद करण्याचा निर्णय झाला होता. आता पुन्हा एकदा डेटा चोरी ज्यामध्ये यूजर्सचे नाव,  ईमेल, जन्मदिनांक, वय अशी Public म्हणून सेट न केलेली माहितीसुद्धा लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे! आणखी भर म्हणजे यावेळी तब्बल ५.२५ कोटी वापरकर्त्यांना फटका बसला आहे!

API मधील बगमुळे असं झाल्याचं गूगलकडून सांगण्यात आलं आहे. मात्र हा डेटाचा गैरवापर करता येणार नाही असंही म्हटलं आहे! हा बग दूर करण्यात आला असून जोवर साईट उपलब्ध आहे तोवर वापरकर्ते व्यवस्थित वापरू शकतील. (आता गूगल प्लस वापरण्यात किती जणांना स्वारस्य आहे हे त्यांनाच ठाऊक!)   

Exit mobile version