MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

गूगल प्लस होणार बंद : सुरक्षेत त्रुटी असूनही गूगलने लपवली माहिती!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 8, 2018
in Security, Social Media

गूगल प्लसच्या लाखो यूजर्सचा गोपनीय डेटा गूगलकडून उघड पडला असून त्याबाबत गूगलने चक्क माहिती न देण्याचं ठरवत ही गोष्ट लपवून ठेवली! ही गोष्ट जाहीर केली असती तर कायदेशीर गोष्टींना सामोरं जावं लागलं असतं आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याची भीती असल्यामुळे गूगलने ही बातमी बाहेर येऊ दिली नाही असं सांगण्यात येत आहे. याबाबत वॉल स्ट्रीट जर्नलने माहिती प्रसिद्ध केली आहे.       

या घटनेवर उपाय म्हणून अल्फाबेट (ज्या कंपनीकडे गूगलची मालकी आहे) कंपनीतर्फे गूगल प्लस यूजर्ससाठी  कायमच बंद करत असल्याचं जाहीर केलं आहे! फेसबुकसोबत स्पर्धा करण्यासाठी २०११ मध्ये सुरु करण्यात आलेलं हे सोशल नेटवर्क कधीच फारसं वापरात आलं नाही आणि आता या घटनेमुळे का होईना गूगलने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे! गूगल प्लस गूगलच्या उत्पादनांमध्ये एक फसलेलं प्रॉडक्ट मानलं जातं.

ADVERTISEMENT

सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या काही त्रुटींमुळे २०१८ ते मार्च २०१८ दरम्यान बाहेरच्या डेव्हलपर्सना व्यक्तिगत प्रोफाईल्सना सुद्धा ऍक्सेस मिळत होता. याबाबत गूगलच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि त्यांच्या सर्वानुमते ही माहिती बाहेर जाऊ न देण्याचं ठरवून आजवर लपवून ठेवण्यात आली! जवळपास त्याच वेळी इतर कंपन्यांवर आरोप होत होते जसे की फेसबुकचं केंब्रिज अनॅलिटिका त्यामुळे आपलीही बदनामी होईल आणि लगेच कायदयाच्या कचाट्यात सापडू असं गूगलच्या कायदेतज्ञाना वाटलं.

गूगल + बंद करण्यासोबत गोपनीयता जपण्यासाठी अनेक बदल करण्यात येणार असून API मधील नव्या बदलांमुळे डेव्हलपर्सना अँड्रॉइड व जीमेल यूजर डेटा घेताना  मर्यादा येतील. इथून पुढे कॉल लॉग आणि SMS ची परवानगी मिळणार नाही!

अधिकृत माहिती : Protecting your data and sunsetting consumer Google+

search terms : google plus shutting down due to security lapses and exposed user data

Tags: GoogleGoogle PlusHackPrivacySecurity
Share22TweetSend
Previous Post

अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल १० ऑक्टोबरपासून सुरू : सर्वात मोठ्या ऑफर्स!

Next Post

मेड बाय गूगल २०१८ : नवे पिक्सल ३ स्मार्टफोन्स, होम हब, पिक्सल स्लेट सादर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post
मेड बाय गूगल २०१८ : नवे पिक्सल ३ स्मार्टफोन्स, होम हब, पिक्सल स्लेट सादर!

मेड बाय गूगल २०१८ : नवे पिक्सल ३ स्मार्टफोन्स, होम हब, पिक्सल स्लेट सादर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech