सुरक्षित इंटरनेट दिन : गूगलच्या सूचना!

सोबत पासवर्ड चेकअप एक्स्टेंशन उपलब्ध!

Safer Internet Day हा दिवस ५ फेब्रुवारी रोजी InSafe तर्फे जगभर साजरा केला जातो. या दिवशी इंटरनेटवर सुरू असलेल्या विविध वेबसाइट्स, त्यांच्यामार्फत उपलब्ध होत असलेला कंटेंट आणि ते वापरणारे यूजर्स यांच्या सुरक्षिततेसंबंधी गोष्टींबाबत चर्चा होते.

फोनची सुरक्षितता : तुम्ही अँड्रॉइड यूजर असाल तर गूगल प्ले स्टोअरवरूनच अॅप्स, गेम्स डाऊनलोड करा. गूगल प्ले प्रोटेक्टमुळे तुमच्या फोन्सचं काम संरक्षण होत राहील. दररोज जवळपास ५००० कोटी अॅप्सचं स्कॅनिंग केलं जातं! यामुळे वाईट अॅप्सपासून फोन्सना वाचवणं शक्य होतं. तुम्ही फोनमध्ये गूगल अकाऊंट जोडलं असेल तर तुमचा हरवलेला फोन शोधण्यासही गूगल मदत करेल! android.com/find वर जाऊन फोन शोधू शकता, रिंग वाजवू शकता, त्यावरील डेटा पुसून टाकू शकता!

डेटा सुरक्षितता : गूगलच्या सर्व उत्पादनांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतलेली असल्याच सांगून सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी पर्याय उपलब्ध आहेत.
Settings > Apps & Notifications > Advanced > App Permissions मध्ये जाऊन कोणत्या अॅपला कोणत्या परवानग्या दिल्या आहेत ते पाहू शकता. जर एखाद्या अॅपने गरज नसताना परमिशन घेतली असेल ती रद्द करू शकता.

अकाउंट सुरक्षितता : गूगलने अकाउंटच्या सुरक्षेसाठी चेकअप करण्याची सोया दिली आहे ज्यामध्ये आपण दिलेल्या परवानग्या, पासवर्ड सुरक्षित आहे का, कुठे लॉगिन के\लेलं आहे असा गोष्टी पाहू शकतो!
• डेस्कटॉपवर असाल तर –
Google Account > Run Security Check
• फोनवर असाल तर –
Gmail App, tap Menu icon > Settings > tap ID > Manage Your Google Account > Run Security Check
• किंवा या लिंकवर भेट द्या http://g.co/securitycheckup

गूगलचं नवं एक्स्टेंशन : यापूर्वी हॅक पासवर्ड्समध्ये तुम्ही लावलेला पासवर्ड आहे का हे सांगण्यासाठी गूगलने नवं एक्स्टेंशन सादर केलं आहे! गेल्या काही वर्षात लीक झालेल्या पासवर्ड्स आणि यूजरनेमचा डेटाबेस गूगलने तयार केला असून तुम्ही सेट केलेला पासवर्ड जर यामध्ये सापडला तर त्याबद्दल लगेच वॉर्निंग दाखवली जाईल! हे एक्स्टेंशन बऱ्यापैकी have i been pwned? प्रकारेच काम करतं!
लिंक : Google Password Checkup

आमचे इंटरनेट, सोशल मीडिया सुरक्षेसंदर्भातील लेख नक्की वाचा
सोशल मीडियाबद्दल महत्वाची सूचना
आपले ऑनलाइन अकाऊंट (फेसबुक,जीमेल, ट्वीटर) सुरक्षित कसे ठेवायचे ?

Exit mobile version