एयरटेल इंटरनेट टीव्ही बॉक्स : डीटीएचसोबत स्ट्रिमिंग सेवाही वापरा!

भारती एयरटेल कंपनीतर्फे नवी इंटरनेट टीव्ही सेवा सादर करण्यात आली असून यामधील टीव्ही बॉक्सद्वारे डीटीएच वाहिन्या तर पाहता येतीलच सोबत नेटफ्लिक्स, एयरटेल टीव्ही, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब यासारख्या सेवांचे ऑनलाइन कार्यक्रमसुद्धा पाहता येतील! यामुळे नेहमीच्या वाहिन्यांसोबत ऑनलाइन कार्यक्रम, चित्रपट सहज त्याच बॉक्सद्वारे पाहू शकाल. एयरटेलची डीटीएच सेवा डिजिटल टीव्ही सोबत इंटरनेटची सेवा जोडून हा नवा एयरटेल इंटरनेट टीव्ही बॉक्स सादर करण्यात आला आहे.

हा बॉक्स डीटीएचचा सेट टॉप बॉक्स व अँड्रॉइड टीव्ही बॉक्स यांना एकत्रित करून बनवलेल उपकरण आहे. यामध्ये बिल्ट इन क्रोमकास्ट सेवा सुद्धा देण्यात आलेली आहे. ज्यामुळे आपल्या स्मार्टफोन्सवरील फोटो, व्हिडिओ, अॅप्स आपण टीव्हीवर सहज कास्ट करून पाहू शकू! हा इंटरनेट टीव्ही बॉक्स 4K स्ट्रिमिंग सपोर्ट करतो यामुळे नेटफ्लिक्ससारख्या सेवा 4K रेजोल्यूशनमध्ये वापरता येतील! डीटीएच सेवा नेहमीप्रमाणेच काम करेल तर ऑनलाइन सेवा वापरण्यासाठी मात्र स्वतःचं स्वतंत्र इंटरनेट कनेक्शन द्यावं लागणार आहे जे तुम्ही ब्रॉडबॅंड, वायफाय, हॉटस्पॉट हे पर्याय वापरुन देऊ शकाल.

Airtel Internet TV Specifications :
Dual-core ARM B15 BCM7252S chipset
Supported media formats : MPEG-2, MPEG-4, H.265, H.264, MC, VC-1, VP9, AVI, MP-4, FLV, 3GP, WMV, MOV, MP4, MKV
8GB internal storage (expandable up to 128GB with a microSD card slot)
Wi-Fi 802.11ac, Bluetooth 4.1, Ethernet, HDMI 2.0, 1xUSB 3.0, 1xUSB 2.0 and Optical SPDIF.
रिमोटमधील माइक वापरुन व्हॉईस कमांड्स देता येतील
टीव्हीच रेकॉर्डिंग करता येईल!
प्ले स्टोरवरून अॅप्स डाऊनलोड करता येतील!
गेम्स खेळता येतील ज्यासाठी ब्ल्युटुथद्वारे किबोर्ड माऊस जोडण्याचीही सोय!

Airtel Internet TV किंमत : या इंटरनेट टीव्हीची किंमत ₹३४९९ असून ही बॉक्ससाठीची किंमत असेल ज्यासोबत एक महिन्याचं Netflix व डीटीएच सेवेच Mega HD एक महिन्याचं पॅकेज मिळेल. वार्षिक प्लॅनमध्ये ७९९९ किंमत असणार आहे. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओसारख्या सेवेसाठी मात्र स्वतंत्र त्या त्या सर्विसच पॅकेज ग्राहकांना साहजिकच विकत घ्यावं लागेल. डीटीएच सेवा बंद केल्यास इतर सोयीसुद्धा वापरता येणार नाहीत व सेवा बंद केल्यावर पुढे टीव्ही बॉक्स परत करावा लागेल.

Exit mobile version