गूगलचं आज पहिलं AI डूडल : संगीतकार Johann Bach जयंती

आजचं गूगल डूडल जर्मन संगीतकार योहान बाख यांना समर्पित असून हे गूगलचं पहिलंच डूडल आहे ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence AI) वापर करण्यात आला आहे.

गूगल डूडल लिंक : https://g.co/doodle/xpm24r

Musician Johann Sebastian Bach

या संगीतकाराची ओळख प्रामुख्याने ऑगॅनिस्ट म्हणून होती. पाइप ऑर्गन्समधील किचकट भागांबद्दल त्यांना बरीच माहिती होती आणि ते दुरूस्तीसुद्धा करू शकायचे! हेच गूगलच्या डूडलद्वारे
दाखवणं हा गूगलचा प्रयत्न होता. यामध्ये स्वतःच्या ट्यून्स तयार करता येतील त्यांचं बाख यांच्या संगीतामध्ये रूपांतर गूगलच्या AI द्वारे केलं जाईल आणि तयार झालेली अंतिम ट्यून शेयर करता येईल! यासाठी गूगलने बाख यांच्या ३०६ कॉम्पोझिशन्सचा वापर केला आहे! याचा वापर करून तुमच्या आवडीचं संगीत तुम्ही तयार करू शकाल!

Search Terms : Google’s first ever AI doodle in memory of Musician Johann Sebastian Bach

Exit mobile version