अॅमेझॉन प्राइम डे : १५ व १६ जुलै दरम्यान ऑनलाइन शॉपिंग सेल!

प्राइम डे सेल सुरू झाला आहे!

अॅमेझॉनने २०१९ वर्षासाठी प्राइम डेच्या तारखा जाहीर केल्या असून यावेळी हा सेल जगभरात १५ व १६ जुलै २०१९ या दिवशी पार पडेल. हा प्राइम डे भारतातला तिसरा तर जगभरातला पाचवा असेल. विविध प्रकारच्या उत्पादनांवर अनेक ऑफर्स या निमित्ताने जाहीर करण्यात आल्या असून तब्बल १००० नवी उत्पादने या सेल दरम्यान सादर केली जाणार आहेत.

ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी लिंक : amazon.in/primeday

जगभरात ज्या ज्या ठिकाणी अॅमेझॉन उपलब्ध आहे तिथे हा प्राइम डे सेल सुरू करण्यात येत आहे. त्यांच्या वेबसाइट्सद्वारे ते दहा लाख डील्स आणत आहेत. भारतात अॅमेझॉन वनप्लस, अॅमेझॉन बेसिक्स, सॅमसंग, इंटेल सारख्या कंपन्या यावेळी त्यांची नवी उत्पादने प्रथमच उपलब्ध करून देणार आहेत.

या उत्पादनांसोबत अॅमेझॉन अनेक नवे चित्रपट व गाणी त्यांच्या प्राइम व्हिडिओ व प्राइम म्युझिक सेवे अंतर्गत उपलब्ध करून देत आहेत. १ जुलै पासून १४ जुलै पर्यंत रोज नाव चित्रपट उपलब्ध झालेला पाहायला मिळेल.

यावेळी HDFC बँक ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सूट मिळणार असून ही ऑफर क्रेडिट व डेबिट कार्डसाठी उपलब्ध असेल. सोबत अॅमेझॉनने त्यांच स्वतःचं अॅमेझॉन आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड आणलं असून त्यावर खरेदी केल्यास रिवार्ड पॉईंट्स दिले जातील.

अॅमेझॉन प्राइमची नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना तर आणखी अनेक ऑफर्स व सवलती मिळणार आहेत. अॅमेझॉन प्राइमची नोंदणी दरमहा १२९ किंवा वार्षिक ९९९ रुपयात उपलब्ध आहे. यामध्ये वेगवान डिलिव्हरी पर्याय, प्राइम व्हिडिओ, रिडिंग म्युझिक सेवांना मोफत अॅक्सेस दिला जातो.

Exit mobile version