गूगल गॅलरी गो : ऑफलाइन फोटो गॅलरी अॅप सादर!

अँड्रॉइड गो या गूगलच्या कमी क्षमतेच्या फोन्ससाठी असलेल्या प्लॅटफॉर्मवर विकसनशील देशांमध्ये स्मार्टफोन्सचा वापर वाढावा व एरवी न परवडणाऱ्या फोन्समध्ये असलेल्या सुविधा काही प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा गूगलचा प्रयत्न आहे. त्यानुसार त्यांनी आजवर गूगल गो, यूट्यूब गो, गूगल मॅप्स गो, फाइल्स गो अशा अॅप्सद्वारे कमी क्षमता असणाऱ्या फोन्सवर स्लो इंटरनेटवरही वापरता येईल अशी सोय दिली आहे! आता ‘गूगल फोटोज’ची ऑफलाइन आवृत्ती गूगल गॅलरी गो द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे गूगलच्या मशीन लर्निंगचा वापर यामध्येही करण्यात आलेला आहे!

हे नवं Google Gallery Go अॅप तुमचे फोटो व्यवस्थित वर्गीकरण करून दाखवेल. यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. या अॅपची साईज केवळ 10MB आहे! सोबत यामध्ये Auto Enhance सोय सुद्धा देण्यात आली आहे जी तुमचे फोटो एका क्लिकवर चांगले बनवते! बाकी नेहमीच्या फिल्टर्स, क्रॉप, रोटेट या सोयी तर आहेतच.

Download Gallery Go on Google Play Store

Search Terms Android Go Google Go Files Go Maps Go Gallery Go YouTube Go

Exit mobile version