फोनपे एटीएम : फोनपेद्वारे रोख पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध!

प्रसिद्ध UPI व मोबाइल वॉलेट अॅप PhonePe मध्ये आता PhonePe ATM नावाची नवी सोय देण्यात आली असून यामुळे तुम्हाला तुमच्या फोनपे अॅपमार्फत रोख पैसे काढता येतील! २०१६ मध्ये सुरुवात झालेल्या या अॅपची मालकी आता फ्लिपकार्टकडे असून आता यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत जसे की पैसे पाठवणे, रीचार्ज, गॅस/वीज बिल भरणा, बस/रेल्वे/विमान तिकीट, हॉटेल्समधून पदार्थ मागवणे, सोन्याची खरेदी इ. आजवर आपण या अॅपद्वारे UPI चा वापर करून विविध ठिकाणी QR Code स्कॅन करून पैसे देऊ शकत होतो. आता तर यापुढे जाऊन या विविध ठिकाणी पैसे काढण्याचीसुद्धा सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.

फोनपे एटीएमद्वारे आपल्या खात्यातून रोख पैसे कसे काढायचे? (How to withdraw money from your account with PhonePe ATM?)

  1. तुमच्या फोनवर फोनपे अॅप उघडा
  2. खालील बाजूस Stores नावाची टॅब असेल ती निवडा
  3. आता PhonePe ATM चा पर्याय निवडा
  4. त्यानंतर Withdraw Now वर क्लिक करा
  5. त्यानंतर जवळपास उपलब्ध दुकाने दिसतील त्यापैकी एक निवडा आणि Withdraw Cash वर क्लिक करा
  6. नंतर तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत टी रक्कम बॉक्समध्ये टाइप करा
  7. ज्या अकाऊंटमधून पैसे काढायचे आहेत ते बँक अकाऊंट निवडा
  8. Pay to Withdraw पर्याय निवडा आणि तुमचा UPI PIN टाका
  9. आता तुम्ही ५ व्या स्टेप मध्ये निवडलेल्या दुकानात जा आणि ती रोख रक्कम घेऊन या!

या सुविधेसाठी फोनपेनी देशभरातील अनेक दुकानदारांसोबत भागीदारी केली आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी तर मदत होईलच शिवाय दुकानदारांना पैसे रोजच्या रोज बँकमध्ये भरण्याचा त्रास वाचेल असं फोनपे तर्फे सांगण्यात आलं आहे. आता प्रत्यक्षात किती दुकानदार त्यासाठी उत्सुक असतात हे वेगळा मुद्दा. फोनपेद्वारे पैसे/कॅश देण्यासाठीसुद्धा कितीजण तयार होतील हे येत्या काळात समजेलच… कारण याचं प्रमाण फार वाढलं तर त्या दुकानदारालाही तितकी कॅश पुरवणं शक्य होणार नाही. मात्र यानिमित्ताने काही प्रमाणात ग्राहक थेट दुकानात आल्यामुळे विक्रीसुद्धा वाढू शकेल!

Search Terms : How to withdraw cash from PhonePe ATM

Exit mobile version