भारत सरकारकडून टिकटॉक, कॅमस्कॅनरसह ५९ चीनी ॲप्सवर बंदी!

गेले काही आठवडे भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनी ॲप्सवर बंदी आणणार असल्याची चर्चा सुरू होती. आजवर त्यावर एकदाची कार्यवाही करत भारताच्या केंद्र सरकारने ५९ चीनी ॲप्सवर बंदी आणली आहे. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊजर, शेयरइट, कॅमस्कॅनर, झेंडर, पॅरलल स्पेस, वुईचॅट, Helo, Vigo, इएस फाइल एक्सप्लोरर, क्लीन मास्टर अशा प्रसिद्ध ॲप्सचा समावेश आहे. (पूर्ण यादी खाली दिलेली आहे.)

भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडत्व, संरक्षण, सुरक्षा यांना बाधा आणतील अशा ॲप्सबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचं PIB तर्फे प्रेस रिलीजमध्ये जाहीर करण्यात आलं आहे.

यामध्ये पब्जी मोबाइलचा समावेश केला गेला नाही याची अनेकजण तक्रार सध्या सोशल मीडियावर करत आहेत. पब्जी गेम मुळात चीनी नसली तरी पब्जी मोबाइल आवृत्ती टेनसेंट गेमिंग तर्फे डेव्हलप करण्यात आली आहे आणि ती कंपनी चीनी आहे.
तसेच यामधील काही ॲप्स यापूर्वीसुद्धा बॅन झाले होते मात्र त्यांना पुन्हा परवानगी देण्यात आली होती. यावेळी घालण्यात आलेली बंदी किती दिवस टिकेल हे येत्या काळात समजेलच…

Banned Chinese Apps Full List

येत्या काही दिवसात आम्ही या ॲप्सना पर्यायी सुरक्षित ॲप्सची यादी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामधील काही ॲप्स इतर देशातील डेव्हलपर्सनी तयार केले होते मात्र नंतर प्रसिद्ध झाल्यावर चीनी कंपन्यानी त्यांना विकत घेऊन त्यामध्ये मॅलवेयर, ॲड्स भरून टाकल्या आहेत. असं अजूनही काही ॲप्सबाबत येत्या काळात होऊ शकतं म्हणून आपण नेहमी अपडेट्सकडे लक्ष ठेवायला हवं…

बॅन करण्यात ॲप्सची यादी

TikTok, Shareit, Kwai, UC Browser, Baidu map, Shein, Clash of Kings, DU battery saver, Helo, Likee, YouCam makeup, Mi Community, CM Browser, Virus Cleaner, APUS Browser, ROMWE, Club Factory, Newsdog, Beauty Plus, WeChat, UC News, QQ Mail, Weibo, Xender, QQ Music, QQ Newsfeed, Bigo Live, SelfieCity, Mail Master, Parallel Space, Mi Video Call – Xiaomi, WeSync, ES File Explorer, Viva Video – QU Video Inc, Meitu, Vigo Video, New Video Status, DU Recorder, Vault- Hide, Cache Cleaner DU App studio, DU Cleaner, DU Browser, Hago Play With New Friends, Cam Scanner, Clean Master – Cheetah Mobile, Wonder Camera, Photo Wonder, QQ Player, We Meet, Sweet Selfie, Baidu Translate, Vmate, QQ International, QQ Security Center, QQ Launcher, U Video, V fly Status Video, Mobile Legends, DU Privacy.

Search Terms : 59 Chinsese apps such as TikTok, ShareIt, Helo, Vigo, UC Browser, CleanMaster, WeChat, Xender, Xiaomi apps, ES Explorer banned by Indian Government

Exit mobile version