गूगल मीटमध्ये मार्च २०२१ पर्यंत मोफत अमर्याद व्हिडिओ कॉल्स करता येणार!

google meet free

लॉकडाऊनच्या वेळी वाढलेली मागणी लक्षात घेऊन गूगलने त्यांची व्हिडिओ कॉलिंग सेवा गूगल मीट सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली होती. मे महिन्यापासून फ्री यूजर्ससाठीही कोणतीही मर्यादा नव्हती. काल अनेक मराठीटेकसह अनेक न्यूज पोर्टल्सने गूगलने आधी दिलेल्या माहितीनुसार ३० सप्टेंबर नंतर गूगल मीटवर ६० मिनिटांची मर्यादा असेल असं सांगितलं होतं मात्र गूगलने रात्री एका ब्लॉग पोस्टद्वारे नवी माहिती जाहीर केली असून आता फ्री यूजर्स ३१ मार्च २०२१ पर्यंत वेळेच्या बंधनाशिवाय मोफत व्हिडिओ कॉल्स, मिटिंग्स करू शकतील असं सांगितलं आहे!

आता काही वेळापूर्वी गूगलचे प्रॉडक्ट मॅनेजर समीर प्रधान यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे अशी माहिती दिली आहे की फ्री यूजर्सना मार्च २०२१ पर्यंत मोफत व्हिडिओ कॉल्स करता येतील. म्हणजेच ३० सप्टेंबरला संपत आलेली मुदत आता ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. संभाव्य नाराजी लक्षात घेत गूगलने वेळीच यामध्ये बदल केला आहे.

लवकरच येणाऱ्या सुट्ट्यांमुळे आणि यंदा प्रवास करणं शक्य नसल्याने कुटुंब एकत्र येणाऱ्यासाठी, मिटिंग्स घेण्यासाठी आम्ही येणारे काही महीने गूगल मीटवर अवलंबून असणाऱ्याना मदत व्हावी या उद्देशाने अनलिमिटेड मीट कॉल्स (२४ तासांपर्यंत) सर्व जीमेल अकाऊंटवर ३१ मार्च २०२१ पर्यंत मोफत सुरू ठेवणार आहोत.

Google Meet

गूगलने अलीकडेच गूगल मीटमध्ये अनेक नव्या सोयीसुद्धा आणल्या आहेत. गॅलरी व्ह्यू जो एकावेळी ४९ जणांना स्क्रीनवर दाखवू शकेल. बॅकग्राउंड ब्लर पर्याय जो व्हिडिओ चॅट सुरू असताना आपली बॅकग्राउंड ब्लर करेल ज्यामुळे आपल्या मागे असलेल्या गोष्टी इतरांना स्पष्ट दिसणार नाहीत आणि त्या गोष्टी काही प्रमाणात गोपनीय राहू शकतील. अँन्ड्रॉईड व iOS मध्ये पाठमागे सुरू असणारा आवाज (Background Noise) काढून टाकण्याची किंवा कमी करण्याचीही सोय मिळत आहे.

G Suite आणि G Suite for Education सभासदांना इतर प्लॅन्स सोबत मिळणाऱ्या सेवा (उदा २५० जणांसोबत व्हिडिओ कॉल्स/मीटिंग रेकॉर्ड करण्याची सोय) मिळत होत्या त्या आता ३० सप्टेंबरलाच बंद होतील. त्यांची मर्यादा वाढवण्यात येणार नाही असं गूगलने सांगितलं आहे.

सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या सेवांमध्ये फ्री प्लॅनसाठी खालील प्रमाणे वेळेचं लिमिट आहे.

३१ मार्च २०२१ नंतर केवळ १ तासाचाच व्हिडिओ कॉल मोफत करता येईल. त्यानंतर ही लिमिट नको असेल तर आपल्याला पैसे मोजून अमर्यादित कॉल्सचा G Suite बिझनेस प्लॅन निवडावा लागेल.

Exit mobile version