नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

सिग्नल हे एक ओपन सोर्स, सुरक्षित मोफत मेसेजिंग ॲप आहे. व्हॉटसॲपच्या नव्या प्रायवसी पॉलिसीमुळे सिग्नल हे पर्यायी ॲप आता लोकप्रिय होत आहे. Elon Musk, Jack Dorsey, Edward Snowden यांनीही हे ॲप वापरण्यास सुचवलं आहे.

व्हॉटसॲपमधील सर्व सुविधा यामध्ये नसल्या तरी डेटा सुरक्षेबाबत हे सर्वोत्तम मेसेजिंग ॲप आहे. हे ॲप Signal Foundation ने तयार केलं असून यामध्ये व्हॉटसॲपचे संस्थापक सुद्धा सहभागी आहेत! 2017 मध्ये त्यांनी व्हॉटसॲपमधून बाहेर पडून हे फाऊंडेशन सुरू केलं. हे ॲप सर्वांसाठी पूर्णतः मोफत असून यामध्ये जाहिराती नाहीत. हे ॲप पुढे दानशूर व्यक्तींच्या मदतीवर (Donations) सुरू राहणार आहे.


सिग्नल Android, iOS वर ॲप्स आणि Mac, Windows, Linux वर सॉफ्टवेअर मार्फत उपलब्ध आहे.
Download Signal : https://signal.org/download

यासोबत आणखी एक पर्याय म्हणजे टेलिग्राम… https://telegram.org

How to use Signal App in Marathi

आजच्या व्हिडिओमध्ये पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं… Link : https://youtu.be/41TQY5ZElPQ

Exit mobile version