जागतिक इमोजी दिन : मायक्रोसॉफ्ट व गूगलच्या नव्या इमोजी!

व्हॉट्सॲप, मेसेंजर यांच्यामुळे इमोजी आताच्या काळात संदेश पाठवतानाच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत इतक्या की चक्क त्यांच्या साठी स्वतंत्र डे  सुद्धा साजरा केला जातोय…!  १७ जुलै हा इमोजी डे म्हणून २०१४ पासून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. इमोजीपीडियाच्या जेरेमी बर्ज यांनी प्रथम हा दिवस सुरु केला.

ही तारीख निवडण्याचं कारण ? ॲपलच्या कॅलेंडरसाठी असलेल्या इमोजीमध्ये १७ जुलै तारीख आहे म्हणून..!
आणि ॲपलने कॅलेंडर इमोजीमध्ये १७ जुलै निवडली आहे कारण iCal ॲपल मॅक कम्प्युटरवर १७ जुलै २००२ पासून उपलब्ध करून देण्यात आलं होतं!
आमच्या यापूर्वीच्या लेखामध्ये याबद्दल अधिक वाचू शकता : https://www.marathitech.in/2018/07/world-emoji-day.html

https://twitter.com/MicrosoftDesign/status/1415687598484373504

World Emoji Day च्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टने त्यांच्या नव्या विंडोज ११ मध्ये येणाऱ्या नव्या इमोजी डिझाईनची माहिती दिली आहे. नवी डिझाईन विंडोज ११ च्या डिझाईनला सुसंगत अशी तयार करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टने १८०० हून अधिक इमोजींना आता फ्लूएन्ट डिझाईनमध्ये समाविष्ट करून 2D ऐवजी 3D लूक दिला आहे. ह्या इमोजी विंडोज ११ सोबत मायक्रोसॉफ्ट ३६५ मध्येही पाहायला मिळतील.

आपल्या पैकी काही जणांनी जर बऱ्याच वर्षांपूर्वी विंडोज वापरलं असेल तर त्यामध्ये असलेली Clippy नावाची सोय आठवत असेल. त्या क्लिपीला मायक्रोसॉफ्टने ट्विटरवरील प्रतिसादानंतर पेपरक्लिप इमोजीची जागा देण्याचं ठरवलं आहे!

New Emojis for Android 12

या निमित्ताने गूगलनेही ९९२ इमोजींना नवं रूप दिलं आहे. गूगलच्या या नव्या रूपातील इमोजी अँड्रॉइड १२ मध्ये उपलब्ध होणार आहेत. सोबत गूगलच्या इतर सेवा जसे की जीमेल, यूट्यूब लाईव्ह चॅट, क्रोम ओएसमध्येही येत्या काही दिवसात या नव्या इमोजी दिसू लागतील.

Exit mobile version