व्हॉट्सअॅप, मेसेंजर यांच्यामुळे इमोजी आताच्या काळात संदेश पाठवतानाच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत इतक्या की चक्क त्यांच्या साठी स्वतंत्र डे सुद्धा साजरा केला जातोय…! १७ जुलै हा इमोजी डे म्हणून २०१४ पासून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. इमोजीपीडियाच्या जेरेमी बर्ज यांनी प्रथम हा दिवस सुरु केला ही तारीख निवडण्याचं कारण ?ॲपलच्या कॅलेंडरसाठी असलेल्या इमोजीमध्ये १७ जुलै तारीख आहे म्हणून..! आणि ॲपलने कॅलेंडर इमोजीमध्ये १७ जुलै निवडली आहे कारण iCal ॲपल मॅक कम्प्युटरवर १७ जुलै २००२ पासून उपलब्ध करून देण्यात आलं होतं!
भारतीय सोशल मीडिया विश्वामध्ये अनेक भाषांमध्ये वेगवेगळ्या इमोजी वापरल्या जातात. ट्विटरवर भारतीय डोळ्यात पाणी येईपर्यंत हसण्याची इमोजी 😂सर्वाधिक वापरतात आणि त्यानंतर ह्या 😍,🙏…!
तुम्हाला ठाऊक आहे का इमोजीची सुरुवात १९९८ च्या आसपास जपानी फोन्समध्ये करण्यात आली होती!
१९९५ च्या आसपास पेजर्स वापरले जायचे त्यावेळी जपानच्या NTT डोकोमोने एक इमोजी वापरली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. काही काळ 🙂 स्मायलीसुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. हळूहळू इमोजीच आज सर्वत्र पाहायला मिळते. फेसबुकवर ❤️ गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी दुपटीने वापरली गेली आहे! एकूण २८०० हुन अधिक इमोजीपैकी जवळपास सर्वच म्हणजे २३०० रोजच्या रोज वापरल्या जात आहेत! ७० कोटी इमोजी फेसबुक च्या पोस्ट्समध्ये दैनंदिन वापरल्या जात आहेत! नववर्षाच्या स्वागताला सर्वाधिक इमोजीचा वापर होतो. भारतात फेसबुकवर केकची 🎂 ही इमोजी सर्वाधिक वापरली जाते.
यावर्षीच्या इमोजी डे निमित्ताने अॅपलने आणखी नव्या इमोजी जाहीर केल्या आहेत. लेखामध्ये सुरूवातीला असलेल्या इमेजमध्ये दिसणार्या डाव्या उजव्या बाजूच्या इमोजीचा नव्याने समावेश केला जात आहे..!
search terms world emoji day marathi